डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.

Submitted by पुरंदरे शशांक on 7 August, 2023 - 11:26

डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.

आपल्या मायबोलीवर वैद्यकीय विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करणारे डाॅ.कुमार 1 - हे आपणा सर्वांना सुपरिचित आहेतच.

याच डाॅ.नी हार्ट अॅटॅकवर शिक्का मोर्तब करणारे ट्रोपोनिन यावर एक लेख इथे लिहिलेला आहे - जो मी आधीच वाचलेला होता.

मला (शशांक पुरंदरे) जेव्हा काही महिन्यांपूर्वी घरीच हार्ट अॅटॅक आला तेव्हा त्या वेदनांच्या तीव्रतेमुळे मला पूर्णपणे कळलेले होते की हा हार्ट अॅटॅकच आहे. पण ज्या रुग्णालयामधे माझा ईसीजी व बीपी तपासले तेथे हे दोन्हीही नाॅर्मल आल्याने तेथील डाॅ. हे ह्रदय दुःख हे काहीतरी मानसिक स्ट्रेसमुळे झालेला त्रास आहे असे म्हणत राहिले. तासाभराने परत काढलेला ईसीजी ही नाॅर्मल आल्याने व मी पूर्ण वेदनामुक्त होऊन माझ्या पायावर उभा राहिल्याने तर ते डाॅ. हा हार्ट अॅटॅक नाहीच्चे यावर ठाम होते.

पण मी मात्र तो ट्रोपोनिनचा लेख वाचलेला असल्याने ती टेस्ट कराच म्हणून हटून राहिलो. पण ती टेस्ट हार्ट अॅटॅकनंतर सहा तासांनी करायची असते म्हणून डाॅ.नी मला घरीही पाठवले. व जेव्हा रात्री दहाच्या सुमारास मी ती टेस्ट तिथेच केली तेव्हा ती स्ट्राँग पाॅझिटिव आली व मला लगेच cardiac i. c. u. तच हलवले.

वैद्यकीय दृष्ट्या मी तसा स्टेबल असल्याने लगेचच दुसर्‍या दिवशी अँजिओग्राफी केली ज्यात ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यात चार मेजर ब्लाॅकेजेस आढळले. त्यामुळे त्यात चार स्टेंट टाकून माझा जीव डाॅ.नी वाचवला.

हे सगळे त्या ट्रोपोनिनमुळेच लक्षात आले. या करता या डाॅ.कुमार यांचा तर मी आजन्म ऋणीच आहे.
असेच वैद्यकीय विविध विषयांवरचे लेख लिहून डाॅ.नी सर्व सामान्यांचे प्रबोधन करीत रहावे ही डाॅ.ना नम्र विनंती.

सर्व मायबोलीकरांना उत्तम आरोग्यासाठी ह्रदयपूर्वक अनेक शुभेच्छा.
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः

धन्यवाद !
--------------------------------------------------------
डाॅ.कुमार1 यांचा लेख
ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब https://www.maayboli.com/node/65025

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे! खरोखरच कुमार सरांचे आभार मानावे तितके कमी!
आता तब्येत चांगली आहे ना? तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

खरच डॉक्टर तुमचे कितीदा तरी आभार मानायला हवे या आरोग्य सेवेसाठी...
आता पुन्हा एकदा तुमचा तो लेख वाचायला हवा.
शशांकजी खूप धन्यवाद तुमचेही कारण तुम्ही डॉक्टरांचा लेख नुसता वाचून सोडून दिला नाही. तुमचे उदाहरण त्या लेखाचं आणि इतर अशाच लेखांचं महत्व अधोरेखित करते.
तब्बेतीची काळजी घ्या... उत्तम आरोग्यासाठी खूप शुभेच्छा...

डाॅक्टर तुम्हाला शत शत नमन...

वा शशांक, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा.
डॉ कुमार,असेच लेखन करत राहा.

शशांकजी तुमच्या उत्तम आरोग्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना आणि शुभेच्छा.
डॉ.कुमार ह्यांचे अभ्यासपूर्ण लेख किती जणांना किती प्रकारे उपयोगी पडतात, ह्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचे आभार.

अरे बापरे! खरोखरच कुमार सरांचे आभार मानावे तितके कमी!
आता तब्येत चांगली आहे ना? तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा.>>>>>+१
काळजी घ्या ...

>>>आता पुन्हा एकदा तुमचा तो लेख वाचायला हवा.>>>
सहमत!
औषधोपचार / शल्यक्रिया वगैरे करुन रुग्णांना बरे करणारे अनेक डॉक्टर्स पाहिले आहेत, पण आपल्या लेखनातून आरोग्यविषयक जनजागृती करणारे कुमार सर एकमेवाद्वितीयच म्हणायचे!
कुमार सर आपले ज्ञानदानाचे कार्य असेच चालू राहो अशी कळकळीची विनंती आणि पुरंदरे साहेब हा अनुभव शेअर करण्यासाठी आपले आभार आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

डॉक्टर कुमार यांची मलाही खूप मदत झाली आहे.

रच्याकने, माझी ओपन हार्ट सर्जरी होऊन आता सहा महिने झाले तरी खूप स्ट्रेस येतो, मला खरंच परत एकदा तो लेख वाचायला हवा

वा शशांक, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा.
डॉ कुमार,असेच लेखन करत राहा.>>+१

आपणांस भावी आरोग्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

मायबोलीवरचा वावर ज्ञानाची क्षितिजे तर रुंदावतोच पण शिवाय कुमार सरांसारख्या मायबोलीकरांमुळे आपण किती भाग्यवान आहोत याचीसुद्धा अशी प्रचिती आणून देतो. कुमार सरांविषयी आदर प्रचंड दुणावला _/\_

वा शशांक, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा.
डॉ कुमार,असेच लेखन करत राहा.>>> अगदी अगदी.

शशांकजी तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा, काळजी घ्या.

डॉक्टर कुमार तुम्हाला दंडवत खरोखर.

डॉ. कुमार१ यांचे आभार!!!

@ शशांक पुरंदरे, तब्येतीची काळजी घ्या. शुभेच्छा.

सर्व वाचकांचे मनापासून आभार...

केवळ त्या लेखामुळेच माझा जीव त्या दिवशी वाचला हे अगदीच खरंय.
डाॅ. च्या आजन्म ऋणातच आहे. ___/\____

शशांकजी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो.
आपण तर आधी पासूनच कुमारजींचे फॅन आहोत. आता त्यावर शिक्कामोर्तब. कुमारजी असेच आरोग्यज्ञान प्रसवत रहा.

वा! खरंच खूप छान वाटलं वाचून... एक आगळावेगळा प्रतिसाद म्हणून कायम लक्षात राहील.
वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा. >>> +१

((शशांकदादा, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा. )) +1

डॉ. कुमार आपण करत असलेले जाणीव, जागृती व प्रबोधन खूप मोलाचे आहे.

वा शशांक, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा.
डॉ कुमार,असेच लेखन करत राहा.... अगदी अगदी!

पुरंदरे शशांक, लिंक आणि अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद!
डॉ. कुमार, मौल्यवान माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद!

मी कुमार१ लिहितो आहे :

@ शशांक
सर्वप्रथम तुमचे एका जीवघेण्या संकटातून वाचल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!!

तुम्ही लिहीलेल्या प्रसंगात तुम्ही दाखवलेले प्रसंगावधान सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत कौतुकास्पद आहे. आता पथ्यपाणी सांभाळून औषधे नियमित घ्यालच. लवकरात लवकर पूर्ण तंदुरुस्त व्हा आणि पूर्वीच्याच जोमाने मायबोलीवर तुमच्या उत्तमोत्तम भावस्पर्शी कविता सादर करा. आम्ही सर्वजण त्या वाचण्यास उत्सुक आहोत.
तुमच्या लेखातील
"ह्रदयपूर्वक अनेक शुभेच्छा" हे वाक्य भलतेच आवडले आहे.
तुम्हाला तंदुरुस्ती आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

त्याचबरोबर माझ्यासारख्या इच्छुक लेखकांसाठी वैद्यकीय लेखनाचे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोली प्रशासकांचेही मनापासून आभार !
मला लेखनासाठी सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या आणि इथे सहभागी झालेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार !
….
लेखातील खालील वाक्यामुळे :
"पण ती टेस्ट हार्ट अ‍ॅटॅकनंतर सहा तासांनी करायची असते म्हणून डाॅ.नी मला घरीही पाठवले"

वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यावरील सविस्तर वैद्यकीय स्पष्टीकरण स्वतंत्र प्रतिसादात लिहितो.

… पुढे चालू….

जेव्हा हार्ट अटॅकचा संशय येण्यासारखी लक्षणे रुग्णामध्ये दिसत असतात तेव्हा डॉक्टरांनी ताबडतोब रक्तावरील ट्रोपोनिनची चाचणी करायची असते. जर ती पॉझिटिव्ह आली तर रोगनिदान पक्के होते. परंतु जर का ती निगेटिव्ह असेल आणि लक्षणे असतीलच, तर मग ती चाचणी त्यानंतर तीन आणि नंतर सहा तासांनी पुन्हा करायची असते.

म्हणजेच, रुग्णालयात लक्षणे असलेला रुग्ण दाखल होता क्षणीच ती चाचणी करणे महत्त्वाचे- नव्हे अत्यावश्यक- आहे.
या संदर्भात कुठलाही गैरसमज राहू नये म्हणून वैद्यकीय साहित्यातील मूळ इंग्लिश वाक्य खाली उदहृत करतो :

The American College of Cardiology/American Heart Association (ACC/AHA) and the European Society of Cardiology (ESC) guidelines recommend cardiac troponin as the only cardiac biomarker that should be measured at presentation (म्हणजेच, रुग्णालयात लक्षणे असलेला रुग्ण दाखल होता क्षणीच) in patients with suspected MI, due to its superior sensitivity and accuracy.

If initial levels are negative, additional measurements at 3 to 6 hours after symptom onset, is recommended.
*********

डॉक्टर कुमार यांचे आभार!
शशांकजी तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! हा लेख देखील डॉक्टर करत असलेल्या जनजागृतीसाठी पूरकच आहे. तेव्हा त्यासाठी तुमचे आभार!

डॉ कुमार यांच्याविषयी आदर होताच, तो दुणावला. अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर ते माहितीपूर्ण लेखन करत असतात. आपल्या व्यावसायिक कामाच्या पलीकडे लोकांचं प्रबोधन करणं ही अतिशय स्तुत्य बाब आहे. ते करत असलेलं कार्य किती अनमोल आहे हे या प्रसंगावरून अधोरेखित झालं.

शशांक पुरंदरे, तुम्ही देखील सजग राहून योग्य त्या तपासण्या केल्या याबद्दल चांगलं वाटलं. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो याकरिता अनेक शुभेच्छा.

आभार आणि सहमत.
आजार झाला की डॉक्टरकडे जायचं आणि बरं होऊन परत यायचं एवढंच करून बरेच थांबतात. तर काहींना उत्सुकता असते की हा रोग काय आणि त्यातही कोणते प्रकार आहेत, त्यातला मला कोणता झाला. शिवाय आणखी बरेच काही. पुस्तके,दिवाळी अंक यांतून माहिती येते पण ती किती साठवणार? शिवाय अपडेट्स? प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. इकडे मायबोली ओनलाइन संस्थळावर त्यातून सुटका होते. माहिती मिळतेच शिवाय कुमारसर लगेच उत्तरही देतात विस्तृत.
लेखक, तुम्हाला शंका येऊन ती चाचणी करायला लावून उपाय मिळवू शकलात लगेच.
ह्रदयावर हल्ला करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात त्या दूर कराव्या लागतात, तसेच प्रत्यक्ष तिथेही खोट निर्माण होते. हे सर्व हल्ले अगोदरच्या पाच दहा वर्षांत सुरू राहून आपल्या नकळत किल्ला ढासळत असतो. तो अगदीच ढासळला की आपण आडवे होतो. पण १)ते हल्ले समजण्याची गरज आहे. २)एकदा ह्रदय ढासळलं की ते पूर्वीसारखं सक्षम होत नाही असं समजून आहे. ते खरं आहे का?

क्र(१) वर बरेच लेख आले आहेत. ,पाय दुखू लागणे,दमायला लागणे वगैरे.
क्र(२)बद्दल जाणून घ्यायचं आहे.

लेखक, आपण लवकरच बरे होऊन हिंडु फिरू लागाल शुभेच्छा.

काका, तुमच्या सजगतेबद्दल विशेष कौतुक आणि तुम्हाला आरोग्यदायी वाटचालीसाठी शुभेच्छा! कुमार सरांचे सर्वच लेख अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहेत. कुमार सर, मनापासून आभार.

कुमार१ लिहितो आहे :
@VB
तुमच्या प्रतिसादामुळे तुमची ओपन हार्ट सर्जरी
झाल्याचे समजले. तुम्हाला सुद्धा तंदुरुस्तीसाठी मनापासून हृदयपूर्ण शुभेच्छा !

बरेच दिवस तुमचा इथे वावर का नव्हता ते समजले.

@ srd
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मी शांतपणे वाचन करून पुढच्या आठवड्यात द्यायचा प्रयत्न करतो. ते उत्तर मूळ Troponin च्या धाग्यावरच देणे सयुक्तिक राहील.

तिकडे मला angina या विषयावर वैद्यक परिषदेतून मी जे काही नवे शिकलो त्याचीही भर घालायची आहे.

Pages