राम

राम होय

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 10 June, 2019 - 13:24

राम होय
******
अमूर्ताचा गाभा
प्रेमाचिया ओघा
भक्तांचिया लोभा
राम होय ॥

शब्दातीत सत्य
मनाच्या अतित
दिसण्या किंचित
राम होय ॥

निर्गुणाचे शून्य
आकार लेवून
सगुणी सजून
राम होय ॥

इंद्रियावगम्य
प्रज्ञा प्रावरण
प्रेमाला भुलून
राम होय ॥

विश्वाचे कारण
विश्वाला व्यापून
उरे शब्द दोन
राम होय ॥

लौकिका सोडून
जाणीवी जगून
विक्रांतचे स्वप्न
राम होय ॥

शब्दखुणा: 

मंदिर वही बनायेंगे ... घडामोडी वेगात !

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 February, 2018 - 16:17

मंदिर वही बनायेंगे..
पर तारीख नही बतायेंगे..
म्हटलं तर वर्षानुवर्षे राममंदिराचे घोंगडे भिजत पडलेय. मोदी सरकार आले आणि आशा निर्माण झाली. तरी गेले तीनेक वर्षे टोलवाटोलवीच चालू होती. पण आता गेल्या काही काळात घडामोडींनी वेग पकडल्याचे दिसत आहे. २०१९ निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदी आणि जीएसटीने उद्भवलेल्या लोकक्षोभावर उतारा म्हणून सरकारला या एका वचनपूर्तींची नितांत गरजही आहेच. त्यामुळे सरकारतर्फे यंदा ठोस प्रयत्न होण्याची शक्यता आहे. केस कोर्टात आहे. तिथून निकाल लागायची शक्यता वर्तवली जात आहेच. पण आता कोर्टाच्या बाहेरही सेटलमेंट होण्याची लक्षणे दिसत आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

कसे रामराया

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 10 January, 2013 - 09:32

कसे रामराया तुम्हाला पाहावे
गुणांच्या गुढाला कसे आकळावे || १
कळेना तरी शोधण्या मीच धावे
पडोनी प्रयासी पुन्हा नी झटावे || २
असे का हि क्रीडा कुणाची कळेना
अश्या थोर काजा कुणी का धजेना || ३
कशी भ्रांती कैदाशिणी घोर माया
गुंडाळूनि ठेवे पदासी जगा या || ४
असे या जगाचे तुम्ही राम स्वामी
तरी का भिकारी तुझे भक्त आम्ही ||५
अहो धाव घाला जना वाचवावे
तुची सांग आम्ही कुणा बोलवावे || ६
पडो देह आता तुला शोधतांना
असे लांछना भोग ते भोगतांना ||७

शब्दखुणा: 

शबरीधाम

Submitted by मंदार-जोशी on 9 November, 2010 - 02:34

रामायणातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शबरी आणि तिची उष्टी बोरे खाणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांची गोष्ट. शबरीचा आश्रम जिथे होता त्या ठिकाणाला भेट देण्याचा नुकताच योग आला. पण त्या आधी शबरी कोण होती, रामाला भेटण्याआधी तिचं आयुष्य यांबद्दल थोडंस पाहूया.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - राम