असे भास होती

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2024 - 02:36

असे भास होती

असे भास होती उन्हासावलीचे कळेना कुठे तो उभा ठाकलो
अकस्मात सारे उभे अंतरंगी खुळावे कसा मी नभी रंगलो

रमावे तरी येथ नाही असे की नसे राम येथे पुरा गुंतलो
निघावे तरी स्वैर जावे कुठे मी जगावेगळ्या या घरी थांबलो

नसे गीत ना सूर काही जरासे कसा यात का व्यर्थ नादावलो
असे भास निर्जिव होती कशाला सुरावेगळा फक्त भांबावलो

कळेना जिवाला खरे काय भासे मृगांबू न सारे किती शोष तो
कसा भास तो स्पर्शताचि जिभेला कसा शांत होता पुन्हा जागलो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!

सुमंदारमाला पाळायचेच असले तर :

निर्जिव चे निर्जीव

आणि

स्पर्शताचि चे स्पर्शताची

करावे लागेल

(बाकी, ही गझलही आहेच पण तंत्रानुसार, आशयानुसार गझलेतर कविता आहे). (गझलेत किमान पाच शेर असावेत हा संकेत असतो हा भाग वेगळा)

छान!