शशक १- बोल - जाई.

Submitted by जाई. on 28 August, 2025 - 14:02

सकाळची धांदल सुरू झाली होती. पातेल्यात चुरचुरलेली फोडणी, सासर्‍यांची पूजा,सासूच मंद्र सप्तक ते नवर्‍याची हे कुठे ते कुठे अशी सर्वव्यापी रेंज. जोडीला ता,वा, का, आ,बा अशी सुरावट. हे ऐकतच तिचे हात यंत्रवत काम करत होते . मनात देवाची आळवणी चालू होती. सगळे उपाय करून झाले होते आणि नवीन चालू होते . पैसापरीस पैसा जात होता पण यश नव्हतेच. 

अशातच विजेसारखे ते शब्द तिच्या कानात घुसले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.

ते बोल ऐकताच पिठाच्या हातानेच डोळ्यात पाणी आणून तिने घट्ट मिठी मारली त्याला . "आई” “आई” म्हणत समोरचं बाळ निरागसपणे टाळ्या वाजवत होत. ४ वर्षाच्या भगीरथ प्रयत्नाला आज आवाज फुटला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! Happy
४ वर्षे.. हृदयस्पर्शी,

मस्त.
मुख्य वाक्य बोल्ड केले तर बरं.( फु. स.)

छान

वाह!