शर्टाचे रंगांतर

Submitted by BLACKCAT on 24 December, 2019 - 05:02

नेट वरून एक शर्ट मागवला, तिथे चित्रात हिरवा दिसला,
पण आला तर निळा.

unnamed_0.png

त्याला हिरवा कसा करणार ?
शेवटी कुकरमध्ये हळद उकळून त्यात तो शर्टही उकळून काढला

unnamed.png

झाला हिरवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही करून बघा

हा धागा त्यासाठीच आहे , कपड्यांचे रंग कसे बदलावेत

मला पूर्ण शुभ्र सफेद शर्ट आवडतो
कुकरला लावायला लागत नाही
रेडीमेड दिसतो तसाच प्रत्यक्षात येतो

अर्र!! निळाच बरा होता ओ.
चांगला आवडीच्या रंगाचा कपडा असेल तर त्याचा रंग बिघडवायचा बदलायचा असेल तर त्यावर आला शिंपडायचा. अतिशय घाण रंगाचे डाग होतात. Sad

मागे एकदा... कुकरमध्ये लिंबू टाकून तांबे-पितळेची भांडी घासुन स्वच्छ केल्याचा व्हिडीओ पाहीला होता.... Lol Lol Lol

कुकरमध्ये हळद उकळून त्यात तो शर्टही उकळून घायचा म्हणजे - प्रकरण फार रंगबदलू आहे.

हा धागा राजकारणावर/धर्मावर नाही असं समजून लॉजिकल प्रतिसाद देतो.
१. नेटवरून कुठल्याही प्रकारच्या कपड्याना रिटर्न पिरेड असतो, अशा वेळी जर रिक्वेस्ट टाकली, तर कुठल्याही प्रकारे प्रश्न न विचारता रिटर्न घेऊन पैसे रिफंड होतात. रिप्लेसमेंट रिक्वेस्ट देखील असते.
२. हळद टाकून रंग हिरवा होईल, हे लॉजिक समजण्यापलीकडे आहे. पोपटी देखील झाला नाही.

पोपटी झाला आहे.

निळा शरतही आवडला म्हणून परत केला नाही

निळा+पिवळा=हिरवा हे लॉजिक असावं Happy
पण रंग कसातरीच झालाय. एका बाजुची कॉलर तर रंगलीपण नाही. उगीच चांगलं शर्ट वाया. हा जर वापरलंत तर वाया म्हणता येणार नाही.

निळा+पिवळा=हिरवा हे लॉजिक असावं.
>>>>>>>>>>>>>>
मिश्रणाला हे लॉजिक नक्कीच लागू होत.
कोरड्या पक्क्या रंगावर रंग फासण्याला????????

ओके... त्या रंगाला पोपटी समजूयात.
शर्ट घालण्यालायक उरला असेल, अशी आशा करतो.

गंमत बघा. याच शर्टला परत एकदा साबणाच्या पाण्यात टाकून धुतला किंवा कुकरला लावला तर त्याचा रंग भगवा /विटकरी होईल. हळद आणि साबणाची रासायनीक क्रिया होऊन भगवा विटकरी रंग होतो.

तसेही तो निळा शर्ट कुकरला घालून रंगवण्यापेक्षा अंगावर घालून खंडोबाच्या यात्रेला गेला अस्ता तर भरपूर हळद फुकटात मिळाली असती आणि गडद पोपटी रंगासोबत शर्ट थोड़ा पवित्रही झाला असता. तसेही त्या शर्टाचा ब्रैंड मोक्ष आहे Wink

नेटवर हळद , बीट वगैरे वापरून शर्ट रंगवले आहेत,

जास्तीची हळद धुवून गेली आहे

आता आहे तो सोल्युबल कलर धाग्यात राहिलेला

Uhoh
Directly green oil paint वापरायचा होता. Gas आणि हळद, पाणी कशाला वाया घालवायच.. Proud

इईई ! चांगला ग्रे की ब्ल्यू कलर होता की. हळदीने अगदीच वाट लावली आहे आणि एकसारखा रंग पण लागला नाही, कॉलर नीट रंगली नाही.
तुम्हाला रंगरेंज फॅब्रिक कलर वापरतात ते माहीत नव्हतं का?

काय म्हणुन चांगला शर्ट खराब केला असेल . Sad रंगवायची एवढी हौस होती तर प्लेन पांढरा शर्ट घेवून तो रंगवायचा होता. आँ ? :ओओ:
हे वरील प्रकरण, स्वयंपाक करताना समथिंग वेंट राँग आणि हळ्द जास्त पडली अस वाटतय.
ब्लॅककॅट घरी कुणाला दाखविला का हा पराक्रम ? बदडून काढतात बघा आता. Lol

प्रयोग म्हणून चांगले आहे.
पण मुळातच हळदीने बनलेला शेड आवडला नाही.पुढच्या वेळी बीट ने गुलाबी करून बघता येईल.

धाग्याच नाव बदलुन "मायबोलीकरांचे प्रयोग" अस करा.. इतर नमुने असतील तर त्यांना आपली कला सादर करायला वाव मिळेल. Wink Proud

पुढचा शर्ट खराब करण्यासाठी शुभेच्छा! Wink Proud

धाग्याच नाव बदलुन "मायबोलीकरांचे प्रयोग" अस करा.. इतर नमुने असतील तर त्यांना आपली कला सादर करायला वाव मिळेल. ....... Submitted by मन्या ऽ on 25 December >>>>

मायबोलीकरांचे अतरंगी प्रयोग"
किंवा
अतरंगी मायबोलीकरांचे नवनवीन प्रयोग"

दोन्ही रंग यक्कक्ककक्क वाटले.

तुरुंगात कैद्यांना साधारणअसा ड्रेस कोड असतो ही हिंदी पिक्चर बघूनबघून केलेली ज्ञानप्राप्ती आहे.

पहिला रंग च चांगला होता.
तुम्ही प्रयोग केला आणि फासला.
तेव्हा रिझल्ट माहिती असेल तरच प्रयोग करत चला.
अंदाज फसला की सर्व हातातून निघून जाते.
जसे एवढं चांगला shirt काही कामाचा राहिला नाही

> शर्ट मला आणि सर्वाना आवडला > झालं तर मग Happy

खरंतर फोटोत (किंवा प्रत्यक्षात) केवळ शर्ट बघितला तर असं शक्यतो कोणाला वाटत नाही पण
त्या वरच्या निळ्या रंगापेक्षा नंतरचा पोपटी रंगाचा शर्ट भारतीय गव्हाळ वर्णाच्या पुरुषांना 'बराच' चांगला दिसतो.

पुढच्या वेळी ऑनलाइन मागवलेलं काहीही आवडलं नाही तर परत करून टाका आणि दुसरं काहीतरी मागवा किंवा पैसे परत घ्या.

याच शर्टला परत एकदा साबणाच्या पाण्यात टाकून धुतला किंवा कुकरला लावला तर त्याचा रंग भगवा /विटकरी होईल>>>>>>

असे बहुतेक होणार नाही. हळद लागलेला कपडा साबणाच्या मिश्रणात टाकला की भगवा/विटकरी होतो हे खरे आहे पण तो पाण्यात खळखळून धुवून साबणाचा सर्व अंश काढून टाकला की परत हळदीच्या रंगाचा होणार.

मला तर वाटतंय शर्ट जुनाच आहे... उगाच काहीतरी चर्चा घडवून आणायची म्हणून हा धागा प्रपंच असावा... कारण माझ्या मते कुठलाही शहाणा माणूस असा उपद्व्याप करणार नाही..

Turmeric is considered a fugitive dye. Fugitive dyes fade over time but can always be re-dyed. It is also very pH sensitive so you should always wash it in PH neutral soap. ... Most natural dyes need a mordant to bond with fiber (metallic salt like alum) but turmeric will dye fibers with out one.
http://www.herbstalk.org/blog/dyeing-with-turmeric

मीही आधी शर्ट मिठाच्या गरम पाण्यात बुडवून ठेवला होता, मग डाय केला.

नेटवर व्हिनेगर , मीठ आणि तुरटी असे ऑप्शन दिले आहेत. आधी गरम पाण्यात घालून एखादा तास बुडवून ठेवायचे

भगवाधारी कुठे , लाल पिवळ्याच्या मध्ये का ?

( समुद्रात मात्र भगवा हा संरक्षक रंग आहे , कारण निळ्या रंगाचा भगवा हा कॉन्ट्रास्ट रंग आहे , त्यामुळे समुद्र , जहाज , विमान इथले सेफ्टी स्विमिंग सूट भगवे असतात , जेणे करून सर्च साठी आलेल्या हेलिकॉपटरणा व जहाजाना तरंगणारे भगवे बिंदू अगदी दुरूनही दिसू शकतात )