नाच

माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2020 - 18:52

सर्वसाधारणपणे लहान मुले रडत रडत जन्माला येतात, मी नाचत नाचत आलो...
अशी काहीतरी फुशारकी मी मारेन असे कोणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. किंबहुना नाचाचा "न" माझ्या अंगात कुठल्या वयात निपजला हा एक संशोधनाचा विषय ठरेल.

ज्या ज्युनिअर सिनिअर केजीच्या बालवाडी वयात आपण नाचाच्या नावावर काहीssही उड्या मारल्या तरी घरच्यांना काय आपला बाबू नाचतो म्हणून कौतुकच वाटते त्या वयात देखील मी हातपाय फारसे हलवल्याचे आठवत नाही. प्राथमिक शाळेतही शारीरीक शिक्षणाच्या नावाखाली आगे मूड, पीछे मूड म्हणत होणार्‍या कसरती आणि मूड मूड के ना देख, मूड मूड के वर होणारा नाच हे माझ्यासाठी एकसमानच होते.

विषय: 
शब्दखुणा: 

पुरुषांचे नाचाचे वर्ग (क्लास) असतात काय?

Submitted by परत चक्रम माणूस on 24 July, 2019 - 10:45

बऱ्याच दिवसांपासून मला नाच शिकायची इच्छा आहे. पुरुषांसाठी नाचाचे कोणते प्रकार आहेत. भरतनाट्यम सारखे प्रकार सोडून, बाल्या डान्स सोडून. आणि असे क्लास अस्तित्वात आहेत का, कुणी अशा ठिकाणी शिकलं आहे का. सालसा वगैरे प्रकार काय आहे.
छान छान प्रतिसाद लिहा व आपण छान प्रतिसाद लिहालच ही अपेक्षा.
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 

किंग खान बरोबर नाचु या.

Submitted by अमा on 9 January, 2019 - 14:38

व्हॅलेंटाइन्स डे वीकेंडला फुकेत मध्ये एका पार्टीला जाय चे आहे. त्या साठी तयारी म्हणून आंख मारे च्या स्टेप्स बघायला युट्युब उघडले. साइडला माबो असतेच. शाहरुख खान ला नाचता येते का असा एक प्रश्न एका बाफ वर वाचला. त्या अनुषंगाने आठवायला सुरुवात केली तर प्ले लिस्ट मध्ये
फेवरिट केलेली गाणी सापडली. त्याच्या बरोबरीने आपण जीवनातल्या किती दशकांमध्ये नाचलो आहोत ते लक्षात येउन मग खालची लिस्ट केली.

१) मेहंदी लगा के रखना. डोली सजाके रखना: चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे:

विषय: 

दिपिका पदुकोन जन्माला यावी.... पण शेजारच्या घरात

Submitted by अर्चना सरकार on 29 July, 2017 - 12:25

त्या दिवशी एका मैत्रीणीच्या घरी गेले होते. एकत्र कुटुंब सुखी कुटुंब असे साधारण वातावरण होते. तिचा मोठा भाऊ, त्याची बायको, त्यांची एक मुलगी आणि एक मुलगा, त्यांचे आजी-आजोबा असे सारे एकत्र दिवाणखान्यात गप्पा मारत बसलो होतो. समोर टिव्ही चालू होता. टिव्हीवर गाणी लागली होती. बहुधा "लव आज कल" किंवा "कॉकटेल" सिनेमातील गाणे होते. त्यात दिपिका पदुकोन नाचत होती. सोबत त्या मैत्रीणीची साधारण चार-पाच वर्षांची भाची नाचत होती. भाचा तिच्यापेक्षा लहान असल्याने नुसतेच टाळ्या पिटत होता. सारेच कुटुंबीय एंजॉय करत होते. एकंदरीत चांगले वातावरण होते.

शब्दखुणा: 

नाच रे मोरा नाच

Submitted by तन्मय शेंडे on 27 June, 2014 - 23:32

मोर म्हंटलं की पावसात नाचणार्या मोराचं चित्र डोळ्यासमोर उभ रहातं..नाचणारा मोर फारचं क्वचित बघायला मिळतो...पण अश्या मोराचं दर्शन म्हणजे केवळ आनंदाची उधळणचं.

भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याला परदेशात नाचताना पाहून माझ मन पण नाचू लागलं Happy

कंट्रीसाईड मध्ये ड्राईव्ह करत असताना, एका फांदीवर मोर दिसलां असं वाटलं. पहिले तर विश्वासचं नाही बसला म्हटलं ईथे कूठून आलेत मोर..भास झाला असावा. असं म्हणतो न म्हणतो तोच एक मोर शिळ ठोकत समोर आला.
Peacock4.jpg

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नाच