मुक्त

आयुष्य..............

Submitted by यतीन on 12 July, 2020 - 02:07

आयुष्य..............

भरती ओहोटी असाच याचा थाट
ईच्छा म्हणजे महासागराची लाट

वाहत्या रस्त्याला काचखळ्यांचा नाट
कुडींतील लतेला थिरकण्याचा घाट

चक्राकार भुवयावर ताणाचा थयथयाट
किलमषाच्या तव्यावर धुर्तांचे पोळपाट

विचारांना अमिषांचा लागलाय चाट
करत्या कर्माला हवाय विश्वासाचा पाट

यश

शब्दखुणा: 

चारोळी - बडे!

Submitted by यतीन on 16 March, 2020 - 02:26

ना कद मे बड़े ना पद मे बडे!
फिर भी हर जगहे आडे खड़े!!

बाते जादा करके मुँह तोड पड़े!
खून गरम मगर दिमाखसे सड़े!!

यश

शब्दखुणा: 

खिसा..........

Submitted by यतीन on 14 February, 2020 - 05:10

खिसा..........
एक अजब रसायन, खिसा असला तर भरलेले हवा, रिकामा तर नको अन् त्यातला त्यात तो हवे तेच भरलेला हवा, प्रत्येक च्या मनात हिच भावना असते खिसा तर हवाच आणि तोही हव्या त्या गोष्टीनी भरलेला असावा......

म्हणुनच खिसा हे अजब रसायन आहे,
खिसा असले तर तो हवे ते भरवायला पळवतो अन् नसले तर ते का नाही याची काळजी करायला लावतो.
बर खिसा असल्यावर तो कापला जाऊ नये म्हणून आणखीच तो काळजी घ्यायला लावतो.

शब्दखुणा: 

बोचरे वागणे

Submitted by यतीन on 25 January, 2020 - 03:45

तुझे हे बोचरे वागणे कळत नाही
धुंद ते, का हवा धुंद कळत नाही

निर्मोही बाबांच्या घरी नको ते छंद
धंद ते, का नाद खुळा कळत नाही

कपडे ऊंची, त्यांची ओळख नेत्यांची
धवल ते, का काळे धुके कळत नाही

साखरपेरणी ची केली गोडबतावणी
वाणी ती, का गाऱ्हाणी कळत नाही

अत्तराचा फाया मारू मदमस्त झाले
मस्त ते, का ते मस्तवाल कळत नाही

विचारांना सांगितले आहेत मळभ
मळ ते, का काळे ढग कळत नाही

कार्या करण्या अडकलो फेऱ्यात
फेरा तो, का फरफट कळत नाही

यशापयशच्या पायर्‍या मोजू कशा
तर्काधारितांनी कधीच गणले नाही

© यश

शब्दखुणा: 

नकोस फिरू माघारी

Submitted by यतीन on 10 January, 2020 - 01:05

घे भरारी घे तू भरारी
नकोस फिरू माघारी

मुक्त करून तराफा पाण्यावरी
आनंद डोह लहरूदे पैलतीरी

जनमानसाच्या आवाजाला
टोच लाव तू करारी

भेदून वैर विचारांना
सुरूंग लाव तू जिव्हारी

वचनाच्या खैरातीत
घे जगण्याची सुपारी

शब्दखुणा: 

सखेद विचार

Submitted by यतीन on 13 December, 2019 - 02:23

सध्याला आपल्या मायबोली परिवारात

अनेक कवी- कविता, गझल पाडतात,
काही लोक त्यांच्या कविता, गझल पाडतात,
आणि मायबोली कर त्यांना चाहते नसतील तर त्या पार हाणून (दुर्लक्ष करून) पाडतात
ज्यांना चाहते जास्त त्यांना तेवढेच लाईक पण जास्त मिळतात
त्यांच काव्य चांगले असो किंवा नसो......

असो.....

माझा मुद्दा असा आहे की ज्यांचे काव्य किंवा गझल चांगल्या असतील तर त्यांना नक्कीच दाद मिळाली पाहिजे आणि कोणाचे थोडेफार चांगले नसेल तर त्यांना ही दाद देता चांगले करण्याचा सल्ला दिला पाहिजे, मग तेही तयार होतील.

शब्दखुणा: 

सत्य मानले सूर्योदयाला

Submitted by यतीन on 13 December, 2019 - 02:15

सत्य मानले सूर्योदयाला
खोटे न जाता अस्ताला

सत्याला गर्तेत ढकलून
खोटे लागलो पचवायला

आभाळ दाटून आले
मन दबकले काळोखाला

समजूत काढता सूडाची
"स्व" तंत्राला खोडून काढला

मझ कस कधी जमेल
स्वातंत्र्याचा झेंडा फडकावयला

दुःख डोंगरा एवढ्या
काळ ही सोकावला

इच्छा आकांक्षाच्या मेरूला
अस्ताच्या अंधारात दडवला

उंच विचारांची उंची भरारी
घेता येईल का या गरूडाला

शब्दखुणा: 

सत्य मानले

Submitted by यतीन on 4 December, 2019 - 02:00

सत्य मानले सूर्योदयाला
खोटे न जाता अस्ताला

सत्याला गर्तेत ढकलून
खोटे लागलो पचवायला

आभाळ दाटून आले
मन दबकले काळोखाला

समजूत काढता सूडाची
"स्व" तंत्रला खोडून काढला

मझ कस कधी जमेल
स्वातंत्र्याचा झेंडा फडकावयाला

दु:ख डोंगरा एवढ्या
काळ ही सोकावला

इच्छा आकांक्षाच्या मेरूला
अस्ताच्या अंधारात दडवला

उंच विचारांची उंची भरारी
घेता येईल का या गरूडाला

@ -यश-

शब्दखुणा: 

मी नसता......

Submitted by यतीन on 28 September, 2019 - 02:06

मी नसता......
नयन पाणवता धीर दे मनाला।
उसासा घेता शांत कर श्वासाला।।
एकांतात आठवणींना दे उजाळा।
पान पालटायला वेळ दे नियतीला।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।

लाही लाही होता पावसाची ओढ लागली।
सय तुझी येता विरह तो जाणवू लागली।।
दिस उजाडता तो "दिन" होऊनही मावळला।
नको विसरू जीवनाच्या या रहाटगाडग्याला।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।

शब्दखुणा: 

सय

Submitted by यतीन on 23 September, 2019 - 08:40

वय झाले की बोलणारे मन.........*

पिकलेल्या पानांच्या देठाला सुगंध सुटला।
आठवणीच्या खा-या पाण्याचा कालवा फुटला।।

ओंजळीतील सय सुद्धा उसाचा घेत स्थिरावली।
मुठभर जिंदगी पण आभाळा सारखी दिसू लागली।।

यश

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मुक्त