नाच रे मोरा नाच

Submitted by तन्मय शेंडे on 27 June, 2014 - 23:32

मोर म्हंटलं की पावसात नाचणार्या मोराचं चित्र डोळ्यासमोर उभ रहातं..नाचणारा मोर फारचं क्वचित बघायला मिळतो...पण अश्या मोराचं दर्शन म्हणजे केवळ आनंदाची उधळणचं.

भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याला परदेशात नाचताना पाहून माझ मन पण नाचू लागलं Happy

कंट्रीसाईड मध्ये ड्राईव्ह करत असताना, एका फांदीवर मोर दिसलां असं वाटलं. पहिले तर विश्वासचं नाही बसला म्हटलं ईथे कूठून आलेत मोर..भास झाला असावा. असं म्हणतो न म्हणतो तोच एक मोर शिळ ठोकत समोर आला.
Peacock4.jpg

एका माणसाची प्रॉपर्टीत हे मोर होते. त्यांनी पाळले होते, पण त्यांना पिंजर्यात ठेवलं नव्हत...

तोर्यात बसलेला मोर.
Peacock.jpg

हा फक्त पाहायचा आणि अनूभवायचा सोहळा...किती हे रंग, किती छटा आणि आणि मोहक चालं.....
Peacock2.jpg

या मोराने लांढोरीला पटवण्यासाठी चांगलीच फिंडींग लावली होती...या व्हिडिओ मध्ये कळेल.

लांढोर काही रिस्पोन्स देत नाही म्हंटल्यावर, हिरमूसला बिचारा ...नाच गाण थांबवून तिच्या मागे लागला Happy
Peacock3.jpg

आणि तिच्या सोबत सन बाथ घेत पहूडला...
Peacock8.jpg

असाचं काही वर्षापूर्वी नाचणारा मोर कास पठारला जाता असताना दिसला होता..सातार्याजवळ. जंगलात नाचणारा मोर !!
Peacock1.jpg

न्यू जर्सी मध्ये सध्या चेरी पिकींचा सिझन आहे, आम्ही चेरीच्या वनात गेलो असता हा पांढरा मोर नाचताना दिसला...पहिल्यांदाच पांढरा मोर पाहिला ते सूध्दा ध्यानी-मनी नसताना...मोराचा पांढरा रंग हा एका प्रकारचा आजार आहे, पिगमेंट्स कमी असतात... पांढरा कावळा, रॉबीन पण असतात, त्याच्यात पण पिगमेंट्स कमी असतात.
Peacock5.jpg

पांढरा नाचणारा मोर मला तर स्वप्नवत वाटतो.
Peacock6.jpg

धन्यावाद,
तन्यय शेंडे
https://www.facebook.com/Tanmay.Photography

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ एम जी... कसला चमकदार मोरपंखी, हिरवा रंग आहे..

पंखावरचा एकेक डोळा जिवंत दिस्तोय... सिंपली ऑसम!!!!!!!

मस्तच फोटो.. मोराला बघून स्ट्न व्हायला होतं. कॅमेरा हातात असला तरी फोटो काढायचे भान रहात नाही मला तरी.
गोव्यात काही जागी या दिवसात हमखास मोर दिसतात. कोल्हापूर सांगली रस्त्यावर पण दिसतात. पांढरे मोर
राणीच्या बागेत आहेत. मला नीट आठवत असेल तर गॉन विथ द विंड चित्रपटातही आहेत.

छान..

अप्रतिम !! कुठे दिसले हे मोर ? न्यू जर्सीत ?
इथे हॅमिलटन जवळ एक गार्डन ऑफ स्क्लप्चर्स आहे, तिथे पण मोर आहेत.
पांढरा मोर ब्रायडल वाटतो आहे एकदम Lol इथल्या एखाद्या डिझायनर वेडिंग मधे मस्त दिसेल असे वाटले Happy

मी सॅनफ्रॅन्सिस्को झू मध्ये पाहिले होते असेच पिसारा फुलवून नाचणारे मोर. फोटोही आहेत काढलेले. पांढरा मोर पहिल्यांदाच पाहिला.

फोटो अप्रतिम. पिसारा फुलवलेल्या मोराचा खूप आवडला. मानेचा रंग, पिसांचा रंग केवळ शब्दातीत.
पण मोर म्हणजे मोरपंखी हवाच म्हणून पांढर्‍या मोरापेक्षा निळा मोरच जास्त आवडला.

मस्त फोटॉ आहेत. पांढरे मोर ओरिसाच्या झूमध्ये पाहिले होते. तो गाईड म्हनालेला की ही वेगळी प्रजाती आहे. (चुभूदेघे)

इथे चेन्नईमधे घराजवळच्याच एका कार्तिकेयाच्या देवळांत दोन पाळीव मोर आणी लांडोरी आहेत. तिथे अधूनमधून लेकीला खेळवायला घेऊन जाते, पण फोटो कधी काढले नाहीत.

मस्त फोटो, तन्मय Happy

पण मोर म्हणजे मोरपंखी हवाच म्हणून पांढर्‍या मोरापेक्षा निळा मोरच जास्त आवडला.>>>>>+१ Happy

सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद !!

मला तरी दोन्ही मोर आवडले... दोघांचा ही रुबाब वेगळा Happy

maitreyee : धन्यवाद
तूमच्या घराच्या जवळच आहे फार्म - Terhune Orchards,Princeton.
पांढरा मोर ब्रायडल वाटतो आहे एकदम >> +१, अगदी

दिनेश : धन्यवाद.
रत्नागीरी, देवरुख, संगमेश्वर भागात देखिल दिसतात मोर....जून-जूलै महिन्यात हमखास.
पांढर्या मोरावरुन सफेद हाती चित्रपट आठवला Happy शाळेत दाखवला होता.

वि. सू. काव्यमय शीर्षक असलेल्या बींबींचा मी हल्ली धसका घेतला आहे >>> हा हा...नविन पानावर क्लीक केल्यास काव्यात्मक शीर्षक असलेले विनोदी धागेच दिसतात हल्ली... Happy

असाचं काही वर्षापूर्वी नाचणारा मोर कास पठारला जाता असताना दिसला होता..>>>>>>तन्मय, कुठल्यावर्षी काढलाय हा फोटो? सप्टेंबर २०११ का?

जिप्सी
तो फोटो सप्टेंबर २०१० ला काढलाय....सातार्याहून कास ला जोतो त्या रस्त्यावर...६ मेगामिक्सेल कॅमेरा होता तेव्हा Happy

तो फोटो सप्टेंबर २०१० ला काढलाय..>>>>>ओक्के. Happy अरे अशाच प्रकारचा फोटो, सातार्‍याहुन कासला जाताना आम्ही सप्टेंबर २०११ला काढलेला. Happy

Pages