श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ९ - माऊलीविरचित भक्त लक्षणे ..
तयांचें आम्हां व्यसन | ते आमुचें निधिनिधान | किंबहुना समाधान | ते मिळती तैं ....
अर्थात - माऊलीविरचित भक्त लक्षणे ......
तो पहावा हे डोहळे | म्हणौनि अचक्षूसी मज डोळे | हातींचेनि लीलाकमळें | पुजूं तयातें ||२२३||
दोंवरी दोनी | भुजा आलों घेउनि | आलिंगावयालागुनी | तयाचें आंग ||२२४||
श्रीमद भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायाला "भक्तियोग" अशी यथार्थ संज्ञा आहे - कारण
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च |
परवा म्हणजेच २४ एप्रिल रोजी सायनला एक कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. निमित्त होते 'दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' वितरण. अर्थात आम्ही त्यानंतर आयोजित केलेले उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचे तबला वादन ऐकायला म्हणून गेलो होतो. परंतु आधीचा पुरस्कार प्रदान सोहळा न बघता नुसते तबला वादन ऐकायचे असे करणे आम्हाला पुरस्कार मिळणाऱ्या दिग्गजांचा अपमान होईल असे वाटले आणि त्यामुळे बरोब्बर वेळेत पोहोचणे आम्ही चुकवले नाही.
मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाचायला आवडेल?
केवळ लेखकासाठीच नव्हे, तर विक्रेते, प्रकाशक लेखक वाचक या सर्वांसाठी हा प्रश्न विचारला आहे.
वाचकांना नक्की काय वाचायला आवडेल यामध्ये कुठले विषय आवडतील? कूठल्या घटनांवर लिहिलेलं आवडेल? कुठला जॉनर आवडेल.
खरं तर हा नंदिनी यांनी विचारलेला हा प्रश्न.
http://www.maayboli.com/node/48005?page=1

"जाने कैसे सपनेमे खो गयी अखियां, मै तो हूं जागी, मेरी सो गयी अखियां"
जगप्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेले अनुराधा चित्रपटातील हे गीत कदाचित आपणही गुणगुणला असाल !
कधीकधी डॉक्टरांना मात्र काही पेशंटकडून ही अशीच विचित्र तक्रार ऐकावी लागते आणि त्या तक्रारीमागे दडू शकलेला असतो एखादा जीवघेणा आजार!
भाग २७ - http://www.maayboli.com/node/47410
************************************************************************************
आता दर दोन दिवसांनी मला आजी सोबत बोलता येऊ लागलं. अर्थात रफिक पुढ्यात असतानाच.
वेडीच माणसं इतिहास घडवतात… इतिहास घडतो तो वेड्याच माणसांकडून.…. इतिहास जर घडवायचा असेल तर कुठलं ना कुठलं वेड हे रक्तात मुरवून घ्यावंच लागतं.… वगैरे वगैरे विधानं वक्तृत्व स्पर्धेतून हमखास उच्चारली जातात. अगदी तारस्वरात जर ही विधानं केली गेली तर हमखास टाळ्या पण मिळतात. आणि कदाचित बक्षीसं पण मिळतं. पण दैनंदिन जीवन जगताना आपण जी वेडी माणसं बघतो, ती सगळीच काही इतिहास घडवत नाहीत. हां… तसं पहायला गेलं तर प्रत्येकच माणूस इतिहास घडवत असतो पण त्याची दखल इतरांनी घ्यावी अशी व्यक्तिमत्वं थोडीच.
जानेवारी '९४. नव्यानेच कामाला लागलो होतो. त्यामुळे महिन्याचा पगार झाला कि खरेदीचा उत्साह असायचा. त्यातली एक महत्वाची खरेदी म्हणजे गाण्याच्या कॅसेट घेणं. असाच एका संध्याकाळी, पुण्याच्या गरवारे पुलाजवळील एक छोट्याश्या दुकानात कॅसेट्स चाळत होतो. तिथल्या टेपवर काहीतरी लागलेलं होतं त्याकडे माझं फारसं लक्ष नव्हतं. माझ्याच तंद्रीत असूनदेखील डोळयांच्या कोनातून मला काहीतरी घडताना दिसलं. एक जोडपं दुकानासमोरून गेलं, आठ दहा पावलं जातो न जातो तोच दोघे एकदम थांबले आणि मागे वळून दुकानापाशी आले.
विसुभाउंनी पुन्हा एकदा घड्याळाकडे आपली नजर वळवली. पाचला आणखी पाच मिनिटे बाकी होती. त्यांच्या तोंडातून एक मोठा निश्वास बाहेर आला. खरंतर पाचला सात मिनिटे होती तेव्हा त्यांनी घड्याळ पाहिले होते आणि मनाशी घट्ट राहून परत तिकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरविले होते. पण वेळही मोठा गमतीदार असतो आणि आपल्याशी खेळत राहतो. कधी ससा होऊन लांब लांब उड्या मारत नको तेवढा पटकन जातो तर कधी कासवाच्या गतीने पुढे सरकतो. आज त्याने कासवाचे रूप धारण करून विसुभाऊंना छळायचे असे ठरविले होते. अर्थात हे सगळे विचार या दोन मिनिटात त्यांच्या मनात येउन गेले आणि त्यांना वाटले कि काटा ४-५ मिनिटांनी पुढे सरकला असेल.
-------------
कथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न
खरं तर हे कुठल्याही लेखनाला लागू पडतील.
-------------
१. कथालेखनासाठी स्फूर्ती देवतेची वाट पहात बसावी की "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" हे प्रमाण मानून रोज काहीतरी लिहावे(च)
२. खूप मेहनत घेऊन तुम्ही एक कथा लिहिलीत. स्वतःवर प्रचंड खुश झालात आणि अचानक कुणीतरी तुमच्या निदर्शनास आणून दिले की त्या कथेची सुरुवात, शेवट किंवा संपूर्ण कथा कुठल्यातरी अमुकतमुक कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटकाशी मिळती जुळती आहे. तुम्ही ती दुसरी कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटक पाहिलेले नाही. अशा वेळी आपल्या कथेचे काय करावे?