गद्यलेखन

श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 March, 2013 - 06:15

श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

एकंदरीत तुकोबांचे सगळे जीवनच आगळे-वेगळे. त्यांचे गाथेमधील अभंग जर कोणी वाचायला घेतले तर लक्षात येते की त्यांचे अवघे मनच जणू त्यांनी या अभंगातून आपल्या पुढ्यात मांडले आहे - आणि ते ही कुठलाच अभिनिवेश न बाळगता - सरळ नि थेट....

वाटते - असा कसा हा पारदर्शी महापुरुष - कोणतीही भीडभाड न बाळगता स्वतःबद्दलची, समाजाबद्दलची मते धाडकन मांडणारा .....

कधी स्वतःला अति हीन-दीन लेखणारा तर कधी स्वतःबद्दल अतिशय उंच उंच बोलणारा.....

कधी भोंदू बुवाबाजी बद्दल आसूड ओढणारा तर कधी अतिप्रेमाने समाजाला समजावून सांगणारा...

तोचि साधू...।।

Submitted by कमलाकर देसले on 12 March, 2013 - 11:16

तोचि साधू...।।
Tuesday March 12, 2013
(महाराष्ट्र टाइम्स )

आध्यात्मिकतेची कसोटी काय? सर्वसाधारणपणे पटकन ओळखायचे असेल, तर गळ्यात तुळशीची अथवा तत्सम माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, अष्टगंध किंवा बुका असला की तो आध्यात्मिक माणूस. हे बरोबर; पण हेच बरोबरही नाही.

शब्दखुणा: 

ह्याच प्रेमाच्या आधारावर जग अजुनही टिकून आहे.

Submitted by आकाशस्थ on 12 March, 2013 - 09:36

कधी कधी आपण फारच गुरफटत जातो. प्रेम ही एक हळुवार भावना आहे. तारुण्य वेगवान आहे. गंमत म्हणजे, प्रेम उमलतच मुळी तारुण्यात. वेगवान आयुष्यात थांबायला लावणारे क्षण इथेच येतात. एकीकडे करीयर असतं, तर दुसरीकडे हळुवार भावना. ह्या दोघांची सांगड म्हणजेच गुरफटणं.

जगात सगळ्याच गोष्टी "मी"पाशी येवून थांबतात. सुरुवात प्रेमाची "मी"नं होते. मी आहे म्हणून तर प्रेम आहे, किंबहूना हे सगळं जग आहे.

शब्दखुणा: 

धूमकेतु - मृत्यूघन्टा की जीवनदाता ?

Submitted by kaushiknagarkar on 10 March, 2013 - 23:53

हॅलो ...

अरे एक प्रश्न आहे. 'मी' बोलतोय.

बोल ना. 'मी' बोलतोय ते लगेच समजलं मला. काय हवय?

कॉमेट. कॉमेट बद्दल विचारायच आहे.

कसली कॉमेंट? कुणी केली?

कॉमेंट नाहीरे. बहिरा झालास की काय? कॉमेट म्हणालो मी? ते आकाशात असतात ते. कॉ मे ट.

हो, हो. समजलं. ओरडू नकोस, फक्त स्पष्ट बोल. काय विचारतोयस?

कॉमेटला मराठीत काय म्हणतात?

धूमकेतु म्हणतात. शेंडेनक्षत्र असं सुध्दा म्हणतात.

म्हणतात ना? म्हणतात ना? काय म्हणालो मी. जिंकलो की नाही? हा हा हा.

अरे मित्रा, काय म्हणालास? काय जिंकलास?

बे एरिया

Submitted by Sanjeev.B on 9 March, 2013 - 07:31

तर मित्रांनो आणि मैत्रिणिंनो, शिर्षक वाचुन सरसावुन बसलात ना, आणि खास करुन बे एरियाकरांनो, तुमच्या बद्दल नाही हो लिहले आहे, वाचत रहा म्हणजे कळेल तुम्हा सर्वांना.

आमचा एक मित्र आहे, त्याची बोलण्याची एक विशीष्ट पध्दत आहे. कधीही जेवणानंतर भेटणार तर हा विचारणारच, "जेवण झाले का बे", त्याला काही काम दिले असल्यास, काम झाले कि नाही विचारल्यास, "होऊन राहिलंय ना बे, अजुन ऑफिसातुन निघाला नाही असे विचारल्यास, "निघालोच बे".

त्याला एकदा विचारले प्रत्येक वाक्यात तु "बे" का वापरतोस, तर म्हणाला, "अरे आमच्या गावकडे अशीच पध्दत आहे ना बे"

शब्दखुणा: 

करंट मस्त...दत्त दत्त...!!!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 9 March, 2013 - 06:42

शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्‍या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार.

शून्य प्रहर- दोन बातम्या...

Submitted by झुलेलाल on 8 March, 2013 - 04:01

दोन बातम्या...

एखादा दिवस निवांत असतो. ठरवलेलंही काहीच नसतं. मग वेळ रेंगाळत राहतो, आणि कंटाळवाणेपण येतं..

अजून चालतोची वाट !

Submitted by किंकर on 7 March, 2013 - 21:38

आजही प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि ,झाशीची राणी ते मलाला युसुफझाई ,माया त्यागी ते ज्योतीसिंग पांडे अजूनही वाट बिकटच आहे.

८ मार्च १९०८ रोजी मतदान ह्क्कासाठीचे न्यू यॉर्क मधील महिलांचे आंदोलन असो किंवा दोन दिवसांपूर्वीचे तरन तारण येथील एका पिडीत महिलेचे एकाकी आंदोलन असो,जगण्याच्या प्राथमिक हक्काची लढाई स्त्रीला अजूनही लढावीच लागत आहे.आणि हाच आपला सर्वात मोठा पराभव आहे.

'तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई'....

चंद्र हरवला आहे

Submitted by kaushiknagarkar on 7 March, 2013 - 11:29

चंद्र हरवला आहे

चेहेरा गोल, उजळ वर्ण.
चेहेऱ्यावर काळे वण, पण एकंदरीत देखणा अाहे.
तरणाबान्ड दिसत असला तरी वय बरेच अाहे.
स्वभाव जरा एककल्ली अाहे.
एकच गोष्ट परत परत करण्याची आणि एकटयानेच फिरायची सवय.
अाहे तसा रात्रींचर पण दिवसाही कधी कधी दिसतो.
मात्र तेंव्हा त्याची ही ऐट, ही चमक उसनी आहे हे समजून येते.

तर हरवला आहे काल संध्याकाळ पासून.
परवा शुक्राच्या चांदणी बरोबर फिरायला जायचे त्याने कबूल केले होते.
पण तो आलाच नाही.
मग ती रूसली, रागाने लखलखली. आणि आता ढगाच्या पडद्याआड गेली आहे.

आणून देणारास येण्याजाण्याचा खर्च अाणि योग्य ते बक्षिस देऊ.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन