प्रश्नच प्रश्न
असंख्य प्रश्नांच्या गर्दीत
हरवून बसलोय मी
उत्तरं शोधण्याचा आता
प्रयत्नच सोडलाय मी...
हे असंच का?
ते तसंच का?
कोण कधी असं तसं
अनाकलनीय वागलंच का?
चालता बोलता हसता खेळता
क्षणात अचानक जीवन संपावे
क्षणभंगूर या जगण्यासाठी
दिवसरात्र मग का खपावे?
सुख-दु:खांचा सारा पसारा
सुखसरींचाच वर्षाव जादा
अल्पशा दु:खांची तरीही
दिवसरात्र का व्यापून छाया?
मी मी करता कधी वाटे
काहीच माझ्या हातात नाही
ही जाणिव झाल्यावर भासे
हा जन्मच मग का व्हावा?
गेले काही दिवस तो ह्या प्रश्नाने कासावीस झाला होता. त्याला दुसरं काही म्हणजे काही सुचत नव्हतं. परिस्थितीने गांजलेले असे अनेक क्षण त्याच्यापुढे पूर्वी येऊन गेले होते, पण ह्या क्षणाने त्याला पुरतं हताश केलं होतं. कसा मार्ग काढावा, कोणाला विचारावं, ह्या गर्तेत तो पूर्ण बुडून गेला होता. मायेचा एखादा हात पाठीवरून फिरावा, आणि ह्या विवंचनेतून त्याने आपली सुटका करावी, असं त्याला मनोमनी वाटत होतं. पण असं कोणीच त्याच्या ओळखीचं नव्हतं. शेवटी धीर करून त्याने अवघ्या जगालाच ओरडून विचारायचं ठरवलं. 'कोणी उत्तर देता का रे उत्तर' असा आक्रोश करणारा हा प्रश्नसम्राट शेवटी विचारता झाला -
उत्तर कमी प्रश्न फार
सुटणार कसे? याचा भार
ना देव ना नाती ना सोबती
पैसा जीवनी खरा आधार
खिशात पैसा असे सुख भारी
शितांच्या भुतांना येई उभारी
पैसा नसणे दु:ख ही भारी
वाढे खात्यात उपकारांची उधारी
पैसा आनंद घेऊन येतो
गर्वाची सुबत्ता भाळी आणतो
जाताना उदास करुन जातो
स्वाभिमानी धार बोथट करतो
पैसा पाहुणा येतो जातो
अगत्य याचे करा आदराने
प्रामाणिक कष्ट जिथे दिसते
त्या घराशी हा जपतो नाते
-निखिल १३-०३-२०१८
वाटते स्वत:च्या आत कथेसाठी पात्र शोधावे
कुंभारा प्रमाणे भूमिकेला स्वत: घडवावे
कथेतील भांडणात उगीच का पडावे
पु.लं. प्रमाणे अमृत कण कसे शिंपडावे?
छायाचित्रातील व्यक्तीशी हितगुज करावे
कधी चित्रकारा सारखे छायाचित्र रेखाटावे
त्यात स्वत:च वेगवेगळे मुद्रा, भाव भरावे
निसर्गा प्रमाणे फक्त मुक्तरंग कसे उधळावे?
इतिहासातील खाणाखुणा काढत फिरावे
युद्धातील असामान्य शौर्य परत आठवावे
शिवाजीच्या वीर मावळ्या प्रमाणे लढावे
लिखाण, छायाचित्र, इतिहास क्षेत्र कसे गाजवावे?
कुठून आलोय कुठे चाललो काहीच काळात नाहीये.
मोठी लोक बोलतात करता धरता तो आपण फक्त बाहुल्या . खरंच अस असत???
उजाड माळरानावर चालताना मध्येच कुठेतरी डेरेदार झाडाची सावली मिळावी अस होत ?
देव मानावा की नाही? काहीच काळात नाहीये काळपाबरोबर चालत राहायच बास. आई बोलली बाप बोलला ते करायच.
बाप बोलला देव आहे मी मानायला लागलो पण अनुभूती कशी येणार???
मला देव दगडात नाही तर मानवात प्राण्यामध्ये दिसतो पण मानवात दानव सुद्धा असतो ?
प्राण्यांच बोलाल तर वाघ आपल्यासाठी देव की दानव????
बऱ्याच वेळ चालतोय पण तो देवाचा वृक्ष काही येत नाहीये अस म्हणतात की तो नक्की भेटणार, पण कधी???
एक सुरवंट होता ... त्याच्या मनात असंख्य विचारांची गर्दी जमली होती . तो पाहत होता आजूबाजूला .... प्रकाश काय असतो हे त्यास माहीत होते , परंतु हा अंधार ! ही रात्र ! ती मात्र त्याच्यासाठी नवीन होती. त्याला हा अंधःकार भासत होता एका पिंजऱ्यासारखा.... दशदिशांचा एक पिंजरा... ज्याच्या गूढगर्भात असेल कुठे भयंकर आग कुठे भयानक विजांचा कडकडाट तर कुठे अक्राळविक्राळ पक्षी जे त्याला ग्रास बनविण्यास तत्पर आहेत. त्याला हा अंधार असह्य होऊ लागला. जेंव्हा ही सृष्टी प्रथम त्याने पहिली होती तेंव्हा ती होती तेजस्वी, प्रकाशमान, सगळ्यांचा रूप स्वच्छ आणि स्पष्ट दाखवणारी... पण आता...
चित्रपटातले एखादे दृश्य बघताना अनेकदा 'असे का?' प्रश्न पडतात. कधी कधी त्यामागे काहीच लॉजिक नसते (असे वाटते) तर कधी कधी त्यामागे रंजक किस्से घडलेले असतात. "एखाद्या गोष्टीचे त्या दृश्यात प्रयोजन काय?" अशासारख्या प्रश्नांसाठी हा बाफ.
-------------
कथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न
खरं तर हे कुठल्याही लेखनाला लागू पडतील.
-------------
१. कथालेखनासाठी स्फूर्ती देवतेची वाट पहात बसावी की "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" हे प्रमाण मानून रोज काहीतरी लिहावे(च)
२. खूप मेहनत घेऊन तुम्ही एक कथा लिहिलीत. स्वतःवर प्रचंड खुश झालात आणि अचानक कुणीतरी तुमच्या निदर्शनास आणून दिले की त्या कथेची सुरुवात, शेवट किंवा संपूर्ण कथा कुठल्यातरी अमुकतमुक कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटकाशी मिळती जुळती आहे. तुम्ही ती दुसरी कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटक पाहिलेले नाही. अशा वेळी आपल्या कथेचे काय करावे?
इथे तुम्हाला पडणारे कोणतेही प्रश्न विचारा. हे गप्पांचे वाहते पान आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही विचारलेला प्रश्न अन त्याचे उत्तर इथून वाहून जाऊ शकते. तेव्हा प्रश्न विचारल्यावर लगेच इथे उत्तर वाचायला या.
ब-याचदा आपल्याला किरकोळ प्रश्न पडतात. त्याची उत्तरेही तेव्हढ्यापुरतीच हवी असतात. अशा प्रश्नांसाठी हे वाहते सार्वजनिक पान.
धागा वाहता असल्याने कृपया प्रश्न, उत्तरे अगदी थोडक्यात लिहूयात.
शक्य असल्यास उत्तर प्रश्नकर्त्याच्या विपुत डकवू शकता. प्रश्नकर्त्याने देखील उत्तर वाहून गेले असल्यास विपु तपासावी.
डोंगराच्या टकलावरती,
हिरवे कुंतल कसे उगवती?
मेघांच्या डोळ्यांतून काळ्या,
अश्रू का हो ओघळती?
आकाशाच्या अंगावरती,
रोजच शर्ट निळा कसा?
धरतीला पण रोज नव्याने
मिळतो नवा झगा कसा?
सरसर धावत येते सर पण,
कुशीत आईच्या जाते का?
हिरवे पाते कुठून येते?
असते त्यांचे नाते का?
झाडांच्या बाहूंवरती,
पक्षी आनंदे झुलती,
पंखांचे बळ; खोलण्या
दार नभाचे पुरती?