वेलीचे लेखन

आधुनिक सीता - ३५ (शेवटचा भाग)

Submitted by वेल on 21 October, 2015 - 13:13

http://www.maayboli.com/node/55743

फातिमा माझ्या हातात तिकिट आणि पासपोर्ट ठेवून गेली आणि मला हर्षोल्हासाने नाचावसं वाटू लागलं. ओरडून सगळ्या जगाला सांगावसं वाटू लागलं की मी परत जाणार. मी माझ्या देशात परत जाणार. माझ्या सागरबरोबरच्या लग्नाचं भविष्य काय असेल मला माहित नव्हतं तरी मला माझ्या माणसात परत जायला मिळणार ह्याचा आनंद खूप जास्त होता. आज मी तो आनंद शब्दात मांडूच शकत नाही. अति आनंदाने मी ओक्साबोक्शी रडू लागले. जेनी तिथे आहे तिला काही सांगावं हे माझ्या लक्षातच नाही आलं.

आधुनिक सीता - ३४

Submitted by वेल on 24 September, 2015 - 12:18

भाग ३३ - http://www.maayboli.com/node/55393

"आता?" मी विचारलं.

"आता म्हणजे काय?" रफिक मध्येच बोलला.

"माझं आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? " मी पुन्हा अधिक स्पष्टपणे विचारलं.

"तुझं काय करायचं म्हणजे?" रफिक थोडा वरच्या आवाजात बोलला.

मी फक्त फातिमाकडे पाहिलं.

"सरीताने जर मला मदत केली ह्या प्रकरणातून सुटायला तर मीदेखील तिला मदत करेन असं मी तिला म्हटलं होतं"

"तू मदत करशील तिला आणि ते नक्की कशासाठी?"

"तिला परत पाठवण्यासाठी." हे ऐकताच रफिक कृद्ध होऊन फातिमाच्या अंगावर धावून गेला.

आधुनिक सीता - ३३

Submitted by वेल on 2 September, 2015 - 11:41

भाग ३२ - http://www.maayboli.com/node/54832

***************************************************

"सागर तसा मनाने वाईट नव्हता. पण थोडासा"

आणि फातिमा पुढे काही बोलण्यापूर्वी रफिक खोलीत आला. आणि फातिमा बोलायची थांबली.

"तू विसरलीस का ह्या खोलीत माईक बसवला आहे आणि इथे जे काही बोलले जाते ते मला सगळे ऐकू येते?" रफिकने फातिमाच्या जवळ जाऊन तिच्या दंडाला पकडले आणि क्रुद्ध आवाजात तो तिच्याबरोबर बोलू लागला. "खबरदार तू काही बोललीस तर. तुलासुद्धा सोडणार नाही मी."

आधुनिक सीता - ३१

Submitted by वेल on 11 February, 2015 - 00:13

भाग - ३०: http://www.maayboli.com/node/51610
***************
ह्या भागात इंग्रजीमध्ये झालेले सर्व संभाषण खूप जास्त असल्याने ते मी मराठीतच लिहित आहे.

*****************

मी

Submitted by वेल on 23 May, 2014 - 07:13

माझ्या आयुष्यातला एक पुरुष
दुसरा, तिसरा, मलाच ठाऊक नाही कितवा.
कधी कोणी मला मागणी घातली
तर कधी मी कोणाला
पारडं कधी माझं वर
तर कधी जड.
मलाच कळलं नाही
असं का झालं
पूर्वी तोललं गेलेल्याने
स्वतःला का तोललं, माझ्याबरोबर.
आकर्षण कशाचं
बुद्धीचं, भावनांच
की इतरांसारखं शरीराचं.
ते असेल तर
मीही एक त्यातली
ज्या तिरस्कार करतात
स्वतःच्या शरिराचा.
आता मात्र मी मुक्त
सार्‍यातून अलिप्त
सिद्ध माणूस म्हणून जगायला
पुरुष जातीशी टक्कर द्यायला.
जळाले तर उठेन पुन्हा

शब्दखुणा: 

भारतीय स्त्रीची प्रतिमा

Submitted by वेल on 23 May, 2014 - 06:22

भारतीय संस्कृतीला
स्त्री स्वातंत्र्य मान्य आहे.
स्वातंत्र्य ह्या शब्दामध्ये
तंत्र शब्द प्रमुख आहे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे
हाच मंत्र खरा आहे.
पारतंत्र्याची बेडी तोडून
मुक्त आम्हाला व्हायचे आहे
मुक्त होऊनदेखील आमचे
स्वत्त्व जवळ राखायचे आहे.
भारतीय स्त्रीची प्रतिमा
माता म्हणून स्पष्ट आहे
पत्नी म्हणून तिला मात्र
पोतेर्‍याचे स्थान आहे.
गृहलक्ष्मी असे म्हणून तिला
देवघरात बसवले आहे,
दारे बंद देवघराची
चावी पुरुषांच्या खिशात आहे.

शब्दखुणा: 

चकोराचं प्रेम

Submitted by वेल on 23 May, 2014 - 06:11

केशरी लाल आकाशाची सोबत सोडून
धुक्यातल्या पर्वतापासून दूर जात
पांढर्‍या आकाशाचं आमंत्रण नाकारून
चकोरानं झेप घेतली
आकाशाच्या निळाईकडे,
पृथ्वीला झाकणार्‍या
गूढ गहिर्‍या अंतरंगाकडे,
पूर्वेच्या लालबुंद सूर्याला नाकारून
पश्चिमेच्या पांढर्‍या चंद्राकडे,
जन्मजात तेजाला नाकारून
उसन्या घेतलेल्या शीतलतेकडे,
त्याने तरी काय करावं
प्रेम हे असंच असतं
सूर्याला नाकारणार्‍या चकोराचं जसं चंद्रावर असतं

शब्दखुणा: 

अश्रू

Submitted by वेल on 23 May, 2014 - 06:00

तुझ्या हसर्‍या डोळ्यांच्या तीरावर
एकच अश्रू उभा होता
मी इथून जाणार म्हणून
पण तू रडत होतीस आतल्या आत.
तो एक अश्रू, तुझा प्रयत्न
की उमटू नये वेदनेची छाया
तुझ्या प्रसन्न चेहर्‍यावर.
मी खूप तहानेला होतो
अन् तहान भागणार होती
त्या अश्रूच्या वाह्ण्यानं.
पण तुला तरी काय ठाऊक,
प्रसन्नतेचा हा तुझा अभिनय
मला तहानेलाच ठेवेल, कायमचा.

शब्दखुणा: 

प्राजक्ताचं फूल

Submitted by वेल on 23 May, 2014 - 05:49

गुलाबाच्या ताटव्यात जेव्हा
धावत होतीस तू अल्लडपणे
मी म्हणालो, जरा सांभाळून
काटे बोचतील पायात..
तू उत्तरलीस नजरेनेच
अरे वेड्या, असतो का
गुलाब काट्याशिवाय?
किती सहजगत्या स्वीकारलंस
हे सत्य तू माझ्या अस्तित्वाचं.
मलाच कधी समजलं नाही
तू होतीस प्राजक्ताचं फूल
तुला तजेलदार ठेवणार होती,
माझ्या निष्पाप प्रेमाची ऊब.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - वेलीचे लेखन