गद्यलेखन

महिलादिन - शोषण नावाची समस्या

Submitted by बेफ़िकीर on 7 March, 2016 - 02:43

महिलादिनानिमित्त समाजात विविध पातळ्यांवर होणार्‍या महिलांच्या शोषणापैकी हे काही सत्यप्रकार! पहिल्या चार व्यक्तिरेखांना मी स्वतः पाहिलेले आहे. पाचव्या प्रकारातील वकील स्त्रीला भेटलेलो आहे पण शोषित मुलींना नाही.

व्हिव्हियाना हाईट्स (गूढ/भयकथा )

Submitted by विश्वास भागवत on 7 March, 2016 - 01:09

"व्हिव्हियाना हाईट्स", पुण्याच्या एका उपनगरात जेमतेम 5 वर्षांआधी सुरु झालेली ५फ्लॅट सिस्टम, एकूण 7 मजले , क्लब हाऊस, डेव्हलपर ने प्रि फर्निचर करून दिलेले फ्लॅट व एकंदरीत शहराच्या कलबलाटापासून दूर व तेवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्याही थोडे आतच.

एकूणच जवळील आय टी पार्क मधील नवश्रीमंत व जुन्या पेठांना कंटाळलेले काही पेंशनर लोकांनी भरलेलं व्हिव्हियाना नेहमी शांत असे.

महिलादिन - पत्नी म्हणून कुटुंबातील स्थान

Submitted by बेफ़िकीर on 6 March, 2016 - 01:52

पत्नी म्हणून कुटुंबात वावरताना जे स्थान मिळते त्याची ही काही उदाहरणे! ही रँडम उदाहरणे आहेत.
====================

महिलादिन - शिक्षण

Submitted by बेफ़िकीर on 4 March, 2016 - 10:32

येऊ घातलेल्या महिलादिनानिमित्त काही निरिक्षणे नोंदवण्याचा मानस आहे. आजच्या लेखात शिक्षण हा विषय घेत आहे. शिक्षण घेणार्‍या व शिक्षण घेऊ पाहणार्‍या काही युवतींच्या, लहान मुलींच्या व्यथा लिहीत आहे. ह्या गोष्टी मला जश्या पाहायला मिळाल्या तश्याच येथे लिहीत आहे.
==============

वो फिर नही आते !

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 March, 2016 - 23:24

जगाच्या पाठीवर कुठेही गेलोत तरी त्या त्या प्रहराला हृदयाला हात घालून गेलेल्या त्या त्या गोष्टी हमखास आठवतातच ! हा त्याची तिव्रता कमी अधिक प्रमाणात बदलू शकते हे अगदीच मान्य !

उदा - भर रणरणत्या दुपारी खिड़कीतून येणारी एखादी वार्याची थंडगार झुळूक सोलापुराच्या कंबरतलावाच्या सूर्यकिरणात चमकत्या पृष्ठभागाची आठवण करून देते.

एखादा पवित्र घन्टानाद कानी पडला की माहेर आणि त्याच्या शेजारच गणपतीच मन्दिर डोळ्यासमोर येत.

कातर संध्याकाळी पुण्यातल्या टेरेसवरून नाईलाजास्तव निरोप घेणारा...बघता बघता डोंगराआड गायब होणारा सूर्याचा केशरट तांबडा गोळा आठवतो .

वो फिर नही आते !

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 March, 2016 - 22:57

जगाच्या पाठीवर कुठेही गेलोत तरी त्या त्या प्रहराला हृदयाला हात घालून गेलेल्या त्या त्या गोष्टी हमखास आठवतातच ! हा त्याची तिव्रता कमी अधिक प्रमाणात बदलू शकते हे अगदीच मान्य !

उदा - भर रणरणत्या दुपारी खिड़कीतून येणारी एखादी वार्याची थंडगार झुळूक सोलापुराच्या कंबरतलावाच्या सूर्यकिरणात चमकत्या पृष्ठभागाची आठवण करून देते.

एखादा पवित्र घन्टानाद कानी पडला की माहेर आणि त्याच्या शेजारच गणपतीच मन्दिर डोळ्यासमोर येत.

कातर संध्याकाळी पुण्यातल्या टेरेसवरून नाईलाजास्तव निरोप घेणारा...बघता बघता गायब होणारा सूर्याचा केशरट तांबडा गोळा आठवतो .

पहाट आणि पाऊस मात्र नाशिकच्याच आठवणी जाग्या करतो !

शब्दपुष्पांजली-मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक- कुणा एकाची भ्रमणगाथा

Submitted by अमेय२८०८०७ on 28 February, 2016 - 05:25

"ब्याऐंशी - एकशेबेचाळीस गुणोत्तराची उत्कट भ्रमणगाथा"

देहरचना आणि शरीरतत्त्वाची मूळ मूस एक असली तरी प्रत्येक आयुष्य म्हणजे मर्ढेकर म्हणतात तसे 'हर गार्डाच्या न्याऱ्या शिट्टीसारखे' वेगवेगळे. प्रत्येकाची चित्तरकथा आणि भ्रमणगाथा निराळी. यामुळेच कदाचित प्रवासवर्णने आणि आत्मचरित्रे रस घेऊन वाचली जातात.

गोनीदांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' मात्र आत्मचरित्र अथवा प्रवासवर्णन खचितच नव्हे. या पुस्तकाच्या बाजाला सर्वसामान्य नामाभिधान लावणे योग्य होणार नाही.

" अपूर्ण Love Letter "

Submitted by विनित राजाराम ध... on 27 February, 2016 - 08:46

तुझ्या त्या चेहऱ्यावरचं हसू तसंच रहावं, सदा…. असंच मला वाटते नेहमी. म्हणून मनातलं कधी ओठांवर आणलं नाही. कदाचित ते ऐकून तुझ्या चेहऱ्यावरचं smile नाहीसं झालं असतं किंवा अजूनच खुललं असतं…. आणि ते नाहीसं होणे, हे स्वयम परमेश्वरालाही रुचलं नसतं.… हा, अजून खुललं असतं तर ते किती छान … त्या उजव्या गालावर… नाही… नाही, डाव्या गालावर पडणारी खळी तर काही औरच…. त्यातून स्तुती केली तर काय खुलते खळी ती,… क्या बात !!!! … स्वर्गीय क्षण अगदी… मुळात ती खळी नाहीच, डोह आहे तो… मोहाचा डोह… कायम त्या डोहात बुडून जावे असा.

माझी धावपळ

Submitted by अदित्य सिंग on 24 February, 2016 - 10:41

ह्या शनिवारी (२० फेब्रुवारी २०१६) मी मरिना रन २०१६ ही हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. त्या अनुभवाबद्दल आणी गेल्या अडीच तीन वर्षातील एकुण धावपळीबद्दल हा छोटेखानी लेख! इथे माबोवर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा काही चुका असतील तर माफ करा, आणी काही सूचना असतील तर जरुर सांगा.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन