गद्यलेखन

एक आगळे वेगळे ट्रेनिंग ( Retirement and Investment Planning )

Submitted by मनीमोहोर on 21 January, 2016 - 06:36

प्रत्येक संस्था, कार्यालय आपल्या मनुष्य बळ विकासासाठी अनेक प्रकारचे ट्रेनिंग, मीटींग्ज, सेमिनार इ. सारखे कार्यक्रम हाती घेत असते. यामुळे त्या संस्थेचा फायदाच होत असतो. पण निवृत्त होणार्‍या स्टाफला आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने कसे घालविता येईल याचे ट्रेनिंग देणार्‍या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या संस्था मला माहित आहेत त्या पैकी आमचं ऑफिस एक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे . नुकतीच मी Retirement and Investment Planning ह्या ट्रेनिंगला जाऊन आले आणि त्याने मी अक्षरशः प्रभावित झाले आहे.

"चव नै न ढंव नै सोंगाडी" - गेल्या वर्षीच्या 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली कथा

Submitted by मी_आर्या on 18 January, 2016 - 06:19

नमस्कार,
गेल्या वर्षीच्या युनिक फीचर्स 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली माझी अहिराणी भाषेतली कथा आज मायबोलीच्या वाचकांसाठी देत आहे, अर्थात पुर्वपरवानगीने !

शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां.

बॉलीवूडचे ‘बोलट’

Submitted by बावरा मन on 17 January, 2016 - 08:58

अनेक चित्रपटांत तो दिसतो. कधी पार्टीमध्ये हातात चषक घेऊन, तर कधी सगळं रामायण घडून गेल्यावर एण्ट्री मारणारा पोलिस ऑफिसर म्हणून. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणजे, ‘दामिनी'मध्ये ज्या जज साबला सनी देओल ‘तारीख पे तारीख’वरचं लेक्चर सुनावत असतो, तो जज साब ‘तो'च होता. किंवा ‘इश्क'मध्ये जॉनी लिवर एका पार्टीमध्ये एका आगंतुक पाहुण्याची मजा उडवतो, तो आगंतुक पाहुणा म्हणजे ‘तो'. ‘तो'ला नाव गाव काही नाही. ‘तो’ बहुतेक इथे हिरो बनायला आला असेल. आता तर तो डायनॉसॉरसारखा नामशेष झाला असेल.

रेल्वे कडुन पैसे परत मिळवणे एक अनुभव

Submitted by नितीनचंद्र on 17 January, 2016 - 07:00

मी १२ डिसेंबरला चिंचवड हुन सिंहगड एक्सप्रेस ने दादरला जायचे ठरवले. ११ डिसेंबरला आय आर सी टीसी वरुन बुकींग केले. माझ्या दुर्दैवाने एसी चेअर कार मध्ये वेटींग लीस्ट १ आणि २ असे नंबर आले. सध्या नुकतेच रेल्वेने काही नियम बदलल्याचे कळले म्हणुन आय आर सी टी सी ला क्लेरीफिकेशन मागीतले.

Dear Sir/Madam,

Just now I have booked following ticket.

What are the rules for boarding into Train where status is CKWL ?

1) If tickets are not confirmed till last movement , can we enter the Train and Travel using II class ( General )?

शब्दखुणा: 

युरुगुचे पुस्तक : भाग १३ (अंतिम)

Submitted by पायस on 17 January, 2016 - 00:30

सगळ्यांच्या डोक्याचा भुगा करणार्‍या युरुगुच्या पुस्तकाचा हा अंतिम भाग! ही कादंबरी इथे प्रकाशित करू दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार. वेळोवेळी प्रतिसादांतून हुरुप वाढवणार्‍या माबोकरांचे विशेष आभार.

बोर-न्हाण

Submitted by स्वीटर टॉकर on 15 January, 2016 - 05:01

गेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.

आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.

शब्दखुणा: 

फासेपारधी

Submitted by बेफ़िकीर on 14 January, 2016 - 11:31

लहान लहान गावालगत असलेल्या अनेक वस्त्यांमधील माणसे शहरी जीवनशैलीशी व्यवस्थित परिचित असूनही स्वतः मात्र मागासलेलीच राहतात. पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात अश्या कित्येक वस्त्या आहेत. अश्याच एका वस्तीबद्दल, जेथे फासेपारधी जमातीचे लोक राहतात.

सातार्‍याहून पुण्याकडे येताना असलेल्या खंडाळा गावात विविध ठिकाणी फासेपारधी विखुरलेले आहेत. माणूस उभा राहू शकणार नाही इतक्या उंचीच्या बहुतेक झोपड्या असतात. एखाददोन झोपड्या मात्र उंच असतात. हाकेच्या अंतरावर गावातील प्रगत लोकांचे अस्तित्त्व असते. दुकाने, शाळा, हायवे, हॉटेल्स हे सगळे काही शंभरएक पावलांवर असते.

शब्दखुणा: 

फॅमिली क्रॉनिकल्स ३ : कौटुंबिक मिटींग

Submitted by रायगड on 14 January, 2016 - 01:19

"I want to have a family meeting today!" थोरल्याने मागणी केली.

कुठेतरी आयत्या वेळी जायचं ठरल्याने त्यांच्या स्क्रीन टाईम वर बाधा आलेली त्यामुळे एक तातडीची family meeting हवी – या प्रकरणाचा छडा लावण्याकरीता – अशी त्याची मागणी होती.

तशी रविवारची संध्याकाळ आमची कौटुंबिक मिटींगची वेळ. समस्त ईन-मीन-तीन-चार कुटंबिय जेवणाच्या टेबलाशी जमून एक-मेकांच्या officially उखाळ्या-पाखाळ्या काढायची हीच ती सुवर्णसंधी. एरवी काढतो त्या unofficially!

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन