हिटलर

लगे रहो.... जो जो रॅबिट !

Submitted by शांत प्राणी on 16 February, 2022 - 02:31

हल्ली चित्रपटच पहावासा वाटत नाही. न जाणो कसा असेल ही भीती वाटते. एका जागी बसून पुस्तक वाचणे, चित्रपट पाहणे यासाठी संयम शिल्लक राहिलेला नाही असे वाटत होते. अशातच कुणीतरी जो जो रॅबिटबद्दल सांगितले. पूर्वी कुणीतरी नवीन आलेल्या चित्रपटाबद्दल पाच सहा वाक्यात सांगावे आणि आपल्याला उत्सुकता निर्माण व्हावी तसे झाले. हे मिसिंग आहे तर ! या कारणाने का होईना जो जो रॅबिट बघायचं ठरवलं. सांगणार्‍याने इतक्या छान सांगितले की जाताना गाडीतच पाहिला. बरोब्बर सव्वा तासात चित्रपट आणि प्रवास संपला आणि मग जो काही अनुभव घेतला तो कुणाला तरी सांगण्याची बेचैनी दाटू लागली.

विषय: 

हिटलरची प्रकृती व त्याला वाटणारी विविध प्रकारची भीती!

Submitted by पराग र. लोणकर on 6 April, 2020 - 01:37

महान पुरुषांना आपला मृत्यू आधीच कळतो असं म्हणतात. `महान` हा शब्द लोकांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या व्यक्तींसाठी आपण वापरतो. तशा अर्थाने हिटलरला महान निश्चितच म्हणता येणार नाही. पण त्याचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर ते एका असामान्य माणसाचं होतं हे कोणीही मान्य करेल. तर अशा या असामान्य हिटलरनं आपल्या बोलण्यातून, लिखाणातून आणि भाषणांतून अनेकदा त्याला आयुष्य फारच कमी असल्याचं सांगितलं होतं. १९२८च्या दरम्यान तो एकदा म्हणाला होता की आत्ता मी ३९ वर्षांचा आहे. आणखी वीस वर्षेच मी जगणार आहे.

शब्दखुणा: 

आणि हिटलर हसला ... (५७५)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2017 - 14:27

फेसबूक पेटून उठले होते. जंगली मराठी ग्रूपवर नवीन टॉपिक आला होता. दारू जुनीच. बाटली नवीन. विषय गोरक्षकावरून सुरू होऊन तालिबान, ईस्लाम, आतंकवाद, ते ईंदिरा गांधीना सोबत घेत, महात्मा गांधी असा येऊन पोहोचला होता. अहिंसो परमो धर्म: .. अशक्य आहे हे. टोटल हिंसा किंवा टोटल अहिंसा. मधलं काहीतरी जमायला हवे. पण कोणंच ऐकायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे तेच मुद्दे. सोहमच्या डोक्याचा भुगा झाला होता. असह्य होऊन तो उठला आणि किचनमध्ये जाऊन कॉफी उकळवायला ठेवली. कॉफीसोबत त्याच्या आवडत्या कूकीज घ्यायला म्हणून फडताळावरच्या डब्याला हात घातला. पण वीजेचा झटका बसल्यागत हात मागे आला.

विषय: 

लहानग्यांचं युद्ध ( विचित्रकथा: weird fiction )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 February, 2017 - 10:23

“या फोटोकडे एकदा काळजीपूर्वक पहा. मुलांनो, तुमच्यापैकी दोघांना आतापर्यंत मिशा चिकटवता आल्या नाहीत. व्यवस्थित खेळा, रशियाचं भविष्य तुमच्या हातांत आहे.”

हिटलरने खरंच आत्महत्या केली का?

Submitted by ऋत्विका on 23 January, 2016 - 13:06

दुसरं महायुद्ध अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं होतं. जर्मनीचा पूर्ण पराभव झाल्याचं स्पष्टं झालं होतं. फॅसिस्ट इटलीने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करलीच होती. इटालियन कम्युनिस्टांनी बेनिटो मुसोलिनी आणि त्याची रखेली क्लारा पेटाक्सी यांना गोळ्या घालून त्यांच्या मृतदेहांची जाहीर विटंबना केल्याची बातमी नुकतीच बर्लिनमध्ये आली होती. ती बातमी येण्यापूर्वीच रशियाची रेड आर्मी बर्लिनमध्ये शिरलेली होती. बर्लिनच्या चौकाचौकांतून जर्मन सैनिकांचा प्रतिकार सुरु होता, परंतु पुढे झेपावणार्‍या रशियन आर्मीला थोपवण्यात जर्मन सैनिक अयशस्वी ठरत होते.

३० एप्रिल १९४५!

विषय: 
Subscribe to RSS - हिटलर