गद्यलेखन

जगू जगदाळे रिटर्न्स!

Submitted by राफा on 24 April, 2016 - 18:56

एका रविवारची एक सुमसाम सकाळ.

परममित्र साहित्यिक जगू जगदाळेच्या रुमवर मी... अजूनही त्याच्या ‘नॉर्मल’ ला येण्याची वाट पाहत !

तो लोखंडी कॉटवर कुठेतरी खोलवर शून्यात का काय म्हणतात तशी नजर लावून बसलेला. म्हणजे परीक्षेत आपल्याला जाम काही आठवत नसताना, आपण कसे डोळे बारीक करून, खालचा ओठ तोंडात घेऊन, भिंतीवरच्या उंच कोप-यातले हलणारे जळमट बघत बसतो ना तसा.

मी एकदा त्याच्याकडे, मग मधेच खिडकीतून दिसणा-या फांदीवर निवांत बसलेल्या एका स्थितप्रज्ञ कावळ्याकडे आणि मग जगूच्या मागच्या भिंतीवर लावलेल्या एका विशेष आकर्षक युवतीच्या कॅलेंडरकडे असा आळीपाळीने टकमक बघत होतो.

पद्मा आजींच्या गोष्टी ११ : परीक्षा आणि सुरा

Submitted by पद्मा आजी on 23 April, 2016 - 12:38

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
काही कामामुळे मध्ये जरा लिखाणात खंड पडला.

मी आज तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीची (सुधाची) गोष्ट सांगणार आहे. ती नागपूरला रहायची. तिने BA केले होते. जेव्हा तिला पाहायला आले तेव्हा तिच्या होणाऱ्या सासू बाईंनी तिला विचारले, "पुढे शिकणार आहे का?"
तेव्हा मुलींच्या शिक्षणाला जास्त महत्व दिले जायचे नाही. त्यामुळे तिने सावध उत्तर दिले. "विचार केला नाही."
तेव्हा त्या म्हणाल्या, "मुलींनी शिकायला पाहिजे जास्त. B Ed कर."

प्रांत/गाव: 

उपवस्त्र

Submitted by श्वेता़क्षरा on 23 April, 2016 - 02:55

उपवस्त्र
उमा भल्या पहाटेच उठत असे. पारोशाने करायची सगळी कामं उरकून आंघोळ करून पुढल्या दारी सडा, रांगोळी आणि मग सासऱ्यांसाठी देवपूजेची फुलं गोळा करायची असा नित्यक्रम होता. त्यांची पूजा आटपेस्तोवर एकीकडे चहाचं आधण आणि दुसरीकडे न्याहारीची तयारी !

शब्दखुणा: 

THRILL…..Once Again

Submitted by अमोल परब on 19 April, 2016 - 23:53

THRILL…..Once Again

******************************************************************************
वाचकांसाठी एक नम्र विनंती.
ह्या कथेतील संदर्भ समजुन घेण्यासाठी तुम्हाला अगोदर माझी "Thrill" हि कथा वाचावी लागेल.

http://www.maayboli.com/node/49402
******************************************************************************

कधी कधी काही काही गोष्टी प्रारब्धातच लिहिलेल्या असतात. अगदी ठरवुनही टाळता येत नाहीत अश्या काही. अशीच एक गोष्ट माझीही आहे.

मैथिली

Submitted by जव्हेरगंज on 19 April, 2016 - 00:12

हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं.
हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं.

" हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच.
"कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय?

तेवढ्यात झुडपात झोपलेली रानडुक्करीण जागी झाली. " काय रं हात्तीभाव, बाजारला गेला नव्हता काय आज?" राणडुक्करीण आळोखंपिळोखं देत हत्तीघराकडं येत म्हणली.

कामातुरांणाम् ना भयम् .....

Submitted by SureshShinde on 18 April, 2016 - 18:23

स्थळ: मेडिसिन डिपार्टमेंट, ससून हॉस्पिटल, पुणे. साल १९७६.

प्रोफेसर सैनानी सरांच्या केबिनबाहेर एक तरुण बसलेला दिसत होता. त्याचा पेहराव व पायातील चपलांवर सांचलेल्या लाल मातीच्या थरावरून तो कोकणातून आल्याचा अंदाज लावणे कठीण नव्हते. हातामध्ये घट्ट धरलेल्या कागदांच्या मोठ्या भेंन्डोळ्यातील कागद काढून वाचण्याचा प्रयत्न चालू होता व त्याच वेळी सरांच्या केबिनचा दरवाजा कधी उघडतो याची उत्सुकतेने वाट पहात होता. मी नेमकी त्यांच वेळी सरांच्या केबिनमध्ये बसलो होतो. नुकताच एम् डी झाल्यामुळे सहांनी त्यांच्या वाॅर्डची जबाबदारी मला सोपवली होती.

शृंगार १२

Submitted by अनाहुत on 18 April, 2016 - 07:09

" Hi friend how r u ? " - राधिका

" I m fine n hows u ? " - मी

" काय बोलू fine म्हणू की खर सांगू ? " - राधिका

" खरच सांग . " - मी

शृंगार ११

Submitted by अनाहुत on 16 April, 2016 - 12:38

" तुमच्या बद्दल अस कस होऊ शकत ? "

" इथे physical strength कमी असण्यापेक्षा mental weakness मुळेच हा त्रास सहन करावा लागतो . "

" अरे brother sorry तुला आमच्यामुळे फार थांबाव लागल ." मघाचा बिल्डर अँड फ्रेन्डस् आले होते .

" अरे हे लोक्स कुठेपन पुस्तक ठेवतात त्यामुळ तुला त्रास, sorry हा भाई ." झालेल्या त्रासामुळ आणि त्याच्या थोड्याफार ताणाने त्याची original language परत आली होती .

'स्टार'पेक्षा 'फॅन' सरस ! (Movie Review - Fan)

Submitted by रसप on 16 April, 2016 - 01:52

'जब तक हैं जान' पासून शाहरुखची घसरगुंडी सुरु झाली. अतिबंडल 'हॅप्पी न्यू इयर' आणि अतिभंपक 'दिलवाले' ह्या पाठोपाठच्या वर्षी आलेल्या शाहरुखपटांमुळे डोक्याचा बाजार उठला असतानाही अजून एक शाहरुखपट पाहायला मी गेलो. माझं एक मन मला 'नको.. नको' म्हणत होतं, पण दुसरं मन ऐकत नव्हतं. 'वोह नहीं सुनता उसको जल जाना होता हैं' टाईप मी वागलो आणि 'फॅन' पाहायला गेलोच. कारण शाहरुखच्या बाबतीत, you can like him or you can dislike him; but you cannot ignore him हे सत्य आहे. शाहरुख आणि सलमानकडे उपद्रवमूल्य असलं तरी 'मूल्य' आहे. आमीरचा 'पीके' मी आजतागायत पाहिलेला नाही आणि पाहावासा वाटतही नाही.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन