लोकशाही

Submitted by surekha joshi on 15 February, 2017 - 01:51

लोकशाही
निवडणूक तेव्हाही होती, निवडणूक आताही आहे
प्रचार तेव्हाही होता, प्रचार आजही आहे

तेव्हा उमेदवार मतांसाठी हात जोडत
आता सोशल मिडीयावरुन धमकीवजा संदेश पाठवतात
तेव्हा प्रचार नेते, अभिनेते करायचे
आता समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे करतात
तेव्हा प्रचारसभा मैदानावर असायच्या
आता गल्ली - कोप-यात कुठेही असतात
तेव्हा प्रचार शिगेला पोहोचायचा
आता प्रचाराचा कंठशोष होतो

तेव्हा उमेदवारांमध्ये मतभेद, वाद होते
आता ते वितंडवाद असतात
तेव्हा उमेदवार एकमेकांवर आरोप करायचे
आता शाईफेक, चिखलफेक करतात
तेव्हा प्रचाराची रणधुमाळी असायची
आता रणकंदन असते

तेव्हा उमेदवारांकडे मालमत्ता असायची
आता कोटीच्या कोटी उड्डाणे असतात
तेव्हा मतदार विकत घेतले जायचे
आता उमेदवार पक्ष विकत घेतात
तेव्हा पक्षनिष्ठा महत्त्वाची होती
आता निष्ठावान कुणीही असते

तेव्हा मतदान गुप्त असायचे
आता आधीच कल जाहीर होतात
सगळे म्हणतात
70 वर्षात लोकशाही बळकट झाली
हाच आहे का तो बळकटपणा ?

---सुरेखा----

Group content visibility: 
Use group defaults