जुने दिवस

वटवृक्ष!

Submitted by मार्गी on 18 April, 2024 - 02:09

आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणार्‍या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी‌ देणारं.

पद्मा आजींच्या गोष्टी १३ : फॅरेक्स चा तोटा पण मुलांचा फायदा

Submitted by पद्मा आजी on 15 February, 2017 - 19:11

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

हि माझ्या आईची गोष्ट. फार जुनी. माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी जेव्हा तीन महिन्याची होती तेव्हाची गोष्ट.

माझ्या बहिणीला डॉक्टरांनी सांगितले कि मुलीला फॅरेक्स द्या. फॅरेक्स म्हणजे तुम्ही लोकं आजकाल ज्याला baby cereal म्हणता.

तेव्हा बाजारात फॅरॅक्स तसे नवीनच होते. मला वाटते कुठून तरी बाहेरच्या देशातून मागवायचे व्यापारी.

Subscribe to RSS - जुने दिवस