गद्यलेखन

"निदान" - माझे नवीन पुस्तक !

Submitted by SureshShinde on 27 March, 2016 - 11:15

प्रिय मायबोलीकर मित्र,
नमस्कार !
आपणास कळविण्यास आनंद वाटतो कि 'मायबोली'वर मी लिहिलेल्या कथांचा संग्रह 'निदान' या नावाने सकाळ प्रकाशनाने नुकताच पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. हे पुस्तक बुकगंगा, सकाळ प्रकाशन, अमेझोन इत्यादी ठिकाणी व पुस्तक दुकानातही उपलब्ध आहे. (पृष्ठसंख्या - १६८ किंमत- रु. १९०.)
सर्वश्री डॉ. अशोकराव निरफराके, ह वि सरदेसाई, लिली जोशी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. वाचकांचा प्रतिसादही उत्तम आहे.

शब्दखुणा: 

" खूनी कोण ? " (भाग पहिला )

Submitted by विनित राजाराम ध... on 27 March, 2016 - 09:11

फोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळी-सकाळी, ते सुद्धा रविवारी, कोणी फोन केला.असा विचार करत तिने फोन उचलला.
" Hello !! ",
"Hello… अभी…" तिने महेशचा आवाज ओळखला. " अरे महेश, अभी झोपला आहे अजून… ",
"उठवं ना त्याला जरा …. urgent … ",
"हो… हो , थांब." तिने अभीला जागं केलं.

अभिषेक डोळे चोळत चोळत फोन जवळ आला. एक मोठी जांभई दिली आणि फोन कानाला लावला.
" Hello, बोल रे…. काय तुंम्ही, झोपायला सुद्धा देत नाहीत.",
"urgent होता म्हणून लावला ना call…",

पेट्रोल

Submitted by जव्हेरगंज on 26 March, 2016 - 14:07

काळीज अजूनही धडधडत होतं. रक्त चिंधड्या उडवत शरीरभर पळत होतं. डाव्या डोळ्यावरची जखम मीठ टाकल्यासारखी चुरचुरत होती. हातापायाला कंप सुटला होता. गल्लीबोळात कुत्र्यांनी भुंकून काव आणला होती. लक्ष्मण पेठ आता डोक्याभोवती फिरत होती.

धडपडत जाऊन मी एका दुकानासमोरचा कोपरा पकडला. मग सरकत सरकत पायरीवर जाऊन बसलो. अंगरख्यातून दारुची बाटली काढली. अन घटाघटा पिऊन रिकामी केली. मग तसाच बराच वेळ बसून राहिलो. हळूहळू सगळं मूळपदावर येत चाललं. मी डोळे मिटून एखाद्या मंतरलेल्या ऋषीसारखा शुन्यात पोहोचलो. बायपासवर वसलेल्या लक्ष्मण पेठेत आता वाऱ्याचा घोंघारव सोडल्यास बाकी सामसूम होती. रात्र गडत होत झिंगरी झाली होती.

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी

Submitted by संतोष वाटपाडे on 25 March, 2016 - 07:02

प्रसंग- साहित्य संमेलन
दोन दिवस आधीच हुसके सरांचा फ़ोन आला होता..." संतोषजी ! हॅहॅहॅ कविसंमीलन आहे म्हणे !! आम्हालाही बोलवा बरं का!!( खोचक कि भोचक हे कळले नाही)भेट होईल अनायासे ... या नक्की"... हो नाही करत मी संमेलनात जायला तयार झालो...संमेलन शनिवारी असल्याने मलाही काही अडचण नव्हतीच..
सार्वजनिक वाचनालयाच्या प्रशस्त होलमधे(हॉल म्हणायचं होतं मला..टायपो समजावा) संमेलन असेल....अनेक नामवंत कवी रसिक येतील....नव्या ओळखी होतील..एकंदर डोळ्यासमोर विदर्भातल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍याला पाण्याची स्वप्न दाखवली जातात तशीच चमचमीत स्वप्ने डोळ्यात घेऊन मी बरोब्बर पाच वाजता वाचनालयावर हजर राहिलो...

शब्दखुणा: 

बोट - अग्निशमन

Submitted by स्वीट टॉकर on 24 March, 2016 - 01:18

असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.

शब्दखुणा: 

स्त्री-सीमंतिनी

Submitted by स्मिता द on 23 March, 2016 - 06:02

काल डायरी चाळता चाळता मला बर्‍याच वर्षांपुर्वी स्त्री या विषयावर लिहिलेल माझंच स्फूट सापडलं..आणि वाचताना वाटले गेले असतील आठ दहा वर्षे हे लिहून पण आजही स्थिती बरीचशी अशीच आहे..फारसा बदल नाही.

स्त्री

तिला ह्याची गरज नाही

Submitted by बेफ़िकीर on 21 March, 2016 - 07:56

डॉ. रुईकर ह्या प्रिन्सिपॉल होत्या. समोर बसलेल्या काव्याच्या वडिलांना त्या कोर्सची माहिती देत होत्या. काव्याही उत्सुकतेने ऐकत होती. काव्याचे वडील एका स्मॉल स्केल युनिटचे मालक होते. आर्थिक परिस्थिती उत्तम होती.

Men will always be men and women will always be women

Submitted by भागवत on 20 March, 2016 - 11:11

मी खुप वेळेस बालाजीला दर्शनासाठी गेलो आहे. त्या आठवणीतला एक किस्सा येथे देत आहे. एकदा मी बालाजीचे दर्शन घेऊन श्रीकालहस्तीला गेलो. तिथे मंदिरा बाहेर ओळीने बरीच दुकाने होती. मा‍झ्या पत्नीला भांड्याच्या दुकानात इडली पात्र दिसले. आम्ही किंमत विचारायला दुकानात गेलो. तिथे मला एक जाडजूड बाई ने तेलुगु मिश्रीत हिंदीत आवाज दिला "भैया आप कहा से आ रहे हो" मी तिला पुणे उत्तर दिल. ती नवऱ्याकडे बोट दाखवून समजावून सांगण्याच्या उद्देशाने म्हणाली. "इस आदमी को थोडा समझाओ लोग यहासे शॉपिंग करके सामान पुणे लेके जा रहे है और इसको हैदराबाद इतना नजदीक है फिरभी शॉपिंग को ना बोलता है"

पद्मा आजींच्या गोष्टी ९ : शोधून सापडेना

Submitted by पद्मा आजी on 18 March, 2016 - 23:43

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
मी तुमचे सर्व प्रतिसाद वाचते. बरे वाटते. मागच्या गोष्टीच्या अभिप्रायात कोणी तरी ढेकूणाच्या औषधा बद्द्ल लिहिले म्हणून मला हि छोटीशी गोष्ट आठवली.

एकदा काय झाले. माझ्या डोक्याला चाई झाली. चाई म्हणजे डोक्याला काही ठिकाणी खाज येते आणि तिथले केस गळतात.
बरीच औषधे लावली पण काही फरक पडेना. आमची आवडा आत्याही तेव्हा गोंदियाला होती. त्यामुळे तिचेही औषध मिळाले नाही.

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन