गद्यलेखन

परीची दुनिया (भाग२)

Submitted by nimita on 14 August, 2019 - 09:11

परीनी जेव्हा पुन्हा डोळे उघडून बघितलं तेव्हा ती तिच्या आईच्या कुशीत नव्हती. तिनी चाचपून आजूबाजूला पाहिलं.... सगळं शांत शांत होतं ; मगाचची गडबड, गोंधळ ऐकू येत नव्हता. 'पण आई कुठे गेली ? आणि सगळीकडे असं जाळीजाळी सारखं काय आहे ? नीट दिसत पण नाहीये काहीं पलीकडचं.' पाळण्यावरच्या मच्छरदाणीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करत परी म्हणाली. आपल्याभोवती घट्ट गुंडाळलेल्या दुपट्यातून हातपाय बाहेर काढायचा प्रयत्न करत परी एकीकडे आईला शोधत होती.

माझ्या काकू

Submitted by nimita on 12 August, 2019 - 14:58

मी कॉलेजच्या थर्ड इयरमधे असताना आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकदा 'आराधना' सिनेमा पाहायला गेलो होतो. खरं म्हणजे आमच्या दृष्टीनी तसा जुनाच होता तो सिनेमा... म्हणजे आमच्या आधीच्या जनरेशन चा म्हणावा इतका जुना ! पण त्या काळात खूप गाजलेला सिनेमा...अर्थपूर्ण गाणी, कर्णमधुर संगीत, सौंदर्यवती शर्मिला आणि तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा हँडसम राजेश खन्ना (आणि तोही डबल रोल मधे...म्हणजे अगदी buy one get one offer सारखा)

सावज (भाग १)

Submitted by अनाहुत on 12 August, 2019 - 07:23

काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत .
तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.
============================================================

पणू

Submitted by आर के जी on 11 August, 2019 - 00:33

तो आज खेळून खेळून खूपच दमला होता. लाल्या माशाबरोबर पळापळी खेळता खेळता सगळा दिवस संपून गेला. रात्र झाली तशी पणूला पिवळ्या झाडाची फांदी आठवली. तिच्या पानावर बसून तिच्याकडून गोष्टी ऐकत पाण्यावर डुलत डुलत त्याला झोप लागली.

पाणी! काय होतं हे पाणी म्हणजे? ती एक गंमतच आहे! आपल्या पणू सारखे चिक्कार पणू एकत्र येऊन एकत्र डोलायचे. आणि बघणारा त्याला पाणी म्हणायचा. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की आपला पणू दुसरा तिसरा कोणी नसून पाण्याचा एक थेंब होता!

वय वर्ष दहा!

Submitted by आर के जी on 9 August, 2019 - 10:51

आम्ही तिघं – मी, माझा नवरा आणि माझा दहा वर्षाचा मुलगा – आम्ही अजून जवळच्या ठिकाणी २ व्हिलर वरूनच जातो. आम्ही दोघं काही बारीक नाही आहोत. पण फार जाडही नाही आहोत. मुलगा मात्र बारीक आहे. गाडीवर आमच्या दोघांमध्ये त्याचं थोडं सँडविच होतं. पण अजून तरी आम्ही तसंच manage करतो आणि पाच सहा किलोमीटर साठी २ व्हिलरच वापरतो. तर…

भूमिका

Submitted by कविता क्षीरसागर on 9 August, 2019 - 07:58

भूमिका

घड्याळात सहा वाजले. लगबगीने ती उठली. गादीवरती इतस्ततः पडलेली अभ्यासाची वह्या पुस्तके तिने दप्तरात नीट भरून ठेवली. चित्रांचे पुस्तक, रंगीत खडू , स्केचपेन आपल्या कप्प्यात व्यवस्थित ठेवले.
घर स्वच्छ झाडून काढले. लिंबाचे सरबत करेपर्यंत साडेसहा वाजून गेले होते. स्कुटीचा आवाज झाला, तशी पटकन तिने दार उघडले.

कधी नव्हे ते आज एवढे स्वच्छ घर पाहून आश्चर्याने आई दारातच थबकली. आईचा उजळलेला चेहरा बघून तिचाही कोवळा चेहरा आनंदाने लखलखला...

शब्दखुणा: 

माझी सैन्यगाथा (भाग २५)

Submitted by nimita on 9 August, 2019 - 05:44

मी ICU च्या दिशेनी निघाले खरी पण पायांत जणू मणा मणाचं ओझं बांधलं होतं... पावलं जागेवरून हलायला तयार नव्हती. तेवढ्यात मागून पुन्हा एकदा त्या नर्सिंग असिस्टंटची हाक कानावर आली. मी मागे वळून बघितलं. तो माझ्या दिशेनीच येत होता. घाईघाईत माझ्या समोर येत म्हणाला," मॅम, घाबरायचं काही कारण नाहीये. पहाटे सरांना अचानक खूप थंडी वाजायला लागली म्हणून त्यांना ICU मधे हलवलं होतं .. तिथे त्यांच्यावर नीट लक्ष ठेवता येईल म्हणून फक्त...तुम्हाला वाटतंय तसं सिरीयस काहीच नाहीये. आता सर एकदम ठीक आहेत. " त्याचं ते बोलणं ऐकून माझा जीव भांड्यात पडला. तरी पण 'कधी एकदा नितीन ला प्रत्यक्ष बघते' असं झालं होतं मला.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन