आपली गोष्ट
आपली गोष्ट - हवा तेवढाच त्रास
प्रस्तावना https://www.maayboli.com/node/86676
वीस एक वर्षांपूर्वी आम्ही भारतात राहत होतो. आई-बाबा, भावंड, नातेवाईक सगळे महाराष्ट्रात होते आणि आम्ही दोघे बेंगलोर मध्ये होतो. तेव्हा घेतलेलं एक छोटसं घर अजूनही विकायचं बाकी आहे. आणि आता प्रमोदने ते मनावर घेतलं आहे!
सर्वसाधारणतः सगळ्याच घरांप्रमाणे आमच्या घरी सुद्धा कामाची काहीशी विभागणी आहे. एखादं काम जेव्हा मी किंवा प्रमोद करणार असं ठरतं तेव्हा दुसरा त्यातून अंग काढून घेतो. आम्ही सगळ्या मेजर स्टेप्स विषयी बोलत होतोच, पण मुख्यतः प्रमोदच सगळं बघत होता.
आपली गोष्ट - आंबे आणि आठवणी
प्रस्तावना https://www.maayboli.com/node/86676
बे एरियात राहायला आलेल्या कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसाला विचारा की तुम्ही उन्हाळ्यात काय मिस करता भारतातलं? एकच उत्तर असेल - हापूस आंबा! माझं गेलं एक दोन वर्ष मे उन्हाळ्यात भारतात जाऊन झालं नाही. प्रमोद गेला होता, पण माझं आणि मुलांचं हापूस आंबा खायचं खूप दिवस राहून गेलं होतं.
आपली गोष्ट - माझं लेकरू आणि मांजरु
आपली गोष्ट
नमस्कार, मी मनू, मानसी कुलकर्णी. मी बे एरियामध्ये रहाते. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला दोन मुलं आहेत. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घर - मुलं, नवरा, मांजर आणि माझी बाग असा माझा दिवस असतो. थोड्याफार फरकाने सगळ्याच बे एरियात राहणाऱ्या भारतीय बायकांचा दिवस! जसे डिझाईन पॅटर्न असतात ना तसेच माणसाच्या आयुष्याचे पण असतात!
हे वर चित्र आहे ना, तसं आहे माझं जग. सुखी - perfect with small imperfections. कसलं गोड चित्र आहे, पण माझ्या हातातल्या मांजराला AI ने दोन शेपट्या काढल्या आहेत.
ती शेपटी दुरुस्त करायला प्रयत्न केले पाहिजेत हे खरं आहेच, पण कधीतरी नुसते हसरे चेहरे सुद्धा पहावे.
