गद्यलेखन

येन केन प्रकारेण . . .

Submitted by pkarandikar50 on 30 July, 2021 - 08:19

येन केन प्रकारेण . . .
आजच्या युगाला ‘प्रसिद्धीचे आणि जाहिरातीचे युग‘ म्हटले जाते. माध्यमांची एखाद्या विस्फोटाप्रमाणे झालेली वाढ; निवडणुकीच्या राजकारणाचा माध्यमांवर बसलेला अनिष्ट पगडा आणि अफाट वेगाने विस्तारणारी बाजारू संस्कृती या सर्वांचा तो एकत्रित परिणाम असावा. त्यामुळे बरी-वाईट कशीही चालेल परंतु प्रसिद्धी हवी, आपली सतत कोणीतरी दाखल घेतली गेली पाहिजे असे भल्या-भल्यांना वाटू लागले आहे.

इयत्ता पहिली

Submitted by deepak_pawar on 29 July, 2021 - 07:58

चर्चगेट स्टेशनवर आलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. सकाळ-संध्याकाळ माणसांनी तुडुंबलेल्या फलाटावर आता फारशी गर्दी नव्हती. फलाट क्रमांक एक वर उभ्या असणाऱ्या बोरिवली ट्रेननं जावं का? पण नकोच, कारण एकतर ती  जुन्या डब्यांची गाडी, त्यात तिसऱ्या जागेवर बसावं लागलं असतं. गरमीने हैराण होण्यापेक्षा थोडावेळ थांबून खिडकीजवळ बसून मस्त हवा खात जावं. असा विचार करून  रिकाम्या असणाऱ्या बाकावर जाऊन बसलो. खिश्यातून रुमाल काढून चेहऱ्यावरचा घाम पुसला, बॅगेतून पाण्याची बॉटल काढून पाणी प्यालो आणि ट्रेनची वाट पाहत बसून राहिलो.

सिलींडर ४

Submitted by भाऊसाहेब. on 29 July, 2021 - 01:18

सिलींडर ४
लग्नघरातून सुटका झाल्यावर,टेम्पोजवळ व-हाडाची वाट पाहात थांबलो.ड्रायव्हर क्लिनर बिड्या ओढत उभे होते.साडेचार वाजतआले होते.हळूहळू एक एक करत किरकोळ व-हाडी,किरकोळ सामानासह टेम्पोकडे येऊ लागले.काही वेळाने,बॅंडचा आवाज येऊ लागला.कपाळी मुंडावळी,हाती मोत्याच्या नारळाची दुरडी घेतलेला,

धनु राशीच्या शुक्रास पत्र

Submitted by सामो on 28 July, 2021 - 09:41

कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे 'इन्टरपर्सनल' ग्रह मानलेले आहेत. आपल्या वागणुकीवर प्रभाव करणारे असे हे ग्रह. पैकी चंद्र हा मनाचा कारक असल्याने, आपल्या भावना तसेच आपल्या उस्फूर्त प्रतिसादांवर, प्रतिक्रियांवर तो अधिराज्य गाजवतो. शुक्र हा सोशल ग्रह आहे. हा ग्रह आपल्याला काय आकर्षक वाटेल, आपल्याला कोणत्या पैलूंची भुरळ पडे, काय मोहवेल ते दर्शवितो. जर ग्रह म्हणजे ज्योत असे मानले तर ही ज्योत ज्या स्फटिकपात्रात तेवते आहे, ते स्फटीकपात्र म्हणजे राशी. उदाहरणार्थ - मेषेचा शुक्र हा मेष राशीचा रंग घेइल, तशा प्रकारे तो स्वत:ला व्यक्त करेल तर कर्केचा शुक्र स्वत:ला कर्क राशीच्या गुणावगुणांत अवगुंठीत करेल.

अजरामर वटवृक्ष

Submitted by सामो on 26 July, 2021 - 10:19

अन्यत्र पूर्वप्रकाशित
--------------------------------------------------------
सळसळणारा, विशाल आणि डेरेदार असा तो वटवृक्ष, वार्‍या पावसाला थंडीला तोंड देत युगानुयुगे मोठ्या दिमाखात ऊभा होता.किती युगे लोटली तो जन्मून ते एक तो जाणत होता किंवा मग ब्रह्मदेवाच. त्याची पाळेमूळे जमिनीत खोलवर आणि दूरदूरवर पसरली होती तर शाखाविस्तार दूरदूरवर तसेच ऊंचच ऊंच असा आकाश भेदून विस्तारला होता. त्याचा पसाराच इतका मोठा होता की अनेक पक्षी-पोपट, बुलबुल, चंडोल,चक्रवाक, चिमण्या, कोकीळांनी त्याचा आसरा घेतला होता.

विलाप

Submitted by सामो on 26 July, 2021 - 10:06

अन्यत्र पूर्वप्रकाशित
-----------------------------------------------------------------
जोपर्यंत एखादा क्षण, आपल्याबरोबर घटलेली तीव्र दुर्दैवी घटना resolve होत नाही तोवर ती तुटकी, कुरुप, unintegrated अशी आपल्याला छळत रहाते. त्यातून मग ते साधण्याकरता कोणी देवदेव करतं तर कोणी गुन्हेगारीची कास धरतं. असा माझा कयास आहे. तो खरा असणारच असा हट्ट नाही. पण मानवी मनातील , तुमच्या माझ्या अशाच तुटक्याफुटक्या पैलूंना एकसंध करण्याकरता लिहीलेले/सुचलेले हे मनोगत.
___________

शापित स्त्री (भाग २)

Submitted by मिरिंडा on 26 July, 2021 - 06:06

    हळूहळू आम्ही तिला विसरायला लागलो होतो. तो रात्रीचा दिसायचा. आता त्याच्या चेहऱ्यावर मला प्रेतकळा आल्ये असं वाटू लागलं. मग एक दोन दिवसांनंतर तोही गायब झाला. आता तिच्या खोलीला कुलूप लागलं. मला सुटल्यासारखं वाटू लागलं. अचानक एका आठवड्यानंतर तिथे कोणीतरी राहत आहे असं वाटू लागलं. बहुतेक नवीन भाडेकरु आला असावा. अचानक एका रात्री नेहमीसारखी खिडकी उघडी दिसली. आज टीव्हीचा आवाज येत होता. सहज पाहिलं तर दोघेही एकमेकांजवळ बसले होते. तिची मान त्याच्या खांद्यावर होती. आणि तो तिचा चेहरा कुरवाळीत होता. आश्चर्याचा धक्का बसून मी अवाक् झालो. एरवी हिडीसफिडिस करणारा तो तिला कुरवाळत होता.

अण्णु (नाट्यछटा)

Submitted by सामो on 26 July, 2021 - 02:19

आज सकाळी सकाळी उठलो तेच मोठ्या धाडधाड आवाजाने . पहील्यांदा वाटलं काल जरा जास्त चढलेली त्याचा परिपाक असावा. तेजायला परिपाकम्हणे. अण्णा मोकाशाची जड जड शब्द वापरायची घाणेरडी सवय लागलीय मला. आयुष्य गेलं गल्ल्यावर बसण्यात. खाणावळीतलं जर असले साजूकतुपकट शब्द वापरायला लागलो ना तर कामवाली पोट्टीपाट्टी हसतील मला. म्हणतील दादा निपाणीकर सठीया गया हे. या साल्यांना ढुंगणावर पोकळबांबुचे रट्टेच हवे. ऊठता लाथ बसता बुक्की. नाहीतर हाटेल विुकुन मलाही विकतील भोसडीचे.

चक्रव्यूह (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 23 July, 2021 - 12:45

फोनचा आवाज ऐकून त्याच्या चेहेर्‍यावर त्रासिक भाव आले.

'राजूभाई?'
'क्या है शेलार? निघतच होतो मी पैसे घेऊन.'
'वोईच बतानेको फोन किया मैने. पैसा छोडो और निकलो वहासे'

'पागल हो गया क्या तू? पैसा यहीपे छोड दू? क्यो?'
'भाई, लॉकडाऊन लग गया है. पुलिसकी गाडिया घूम रही शहरमे. अभीके लिये पैसा छोड दो सेठके पास'

'लॉकडाऊन? कितने दिनका?'
'हफ्तेभरका बोला है. पर क्या मालूम'

राजेन्द्र मटकन खालीच बसला. पैसा गया भाडमे! बाहेर पोलिसांनी हटकलं तर काय उत्तर देणार?
पण एक आठवडा ह्या घरात तरी कसं रहाणार?

त्याने मागे वळून पाहिलं.

भास

Submitted by स्वप्ना_राज on 23 July, 2021 - 10:37

'अमित?'
त्याने लक्ष दिलं नाही.

'अमित?'
तो गप्पच.

'बघ ना माझ्याकडे'
त्याने डोळे गच्च मिटून घेतले.

'अरे, असं काय करतोयस?'
'मुग्धा नाहिये इथे. मुग्धा नाहिये इथे' तो डोळे मिटून स्वतःशी पुटपुटत राहिला.

'मी बसलेय इथे तुझ्यासमोर अमित. हे बघ मी तुला स्पर्श करू शकतेय. तुला जाणवतोय ना माझा स्पर्श?'
'सगळे भास आहेत. मला भास होताहेत.'

'कोण म्हणतं असं?'
'कियाराने सगळं सांगितलंय मला'

'काय सांगितलंय कियाराने?'
'तू सोडून गेली आहेस मला २ वर्षांपूर्वी. नाहियेस ह्या घरात तू आता. कियाराने सावरलं मला तू नसताना'

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन