गद्यलेखन

फ्रेंच फ्राईज - कलपकाकांचा सर्जिकल स्ट्राईक

Submitted by मकरंद गोडबोले on 1 May, 2019 - 01:16

खानकाकांकडे आतंकवादी येतात, ही कलपकाकांची खात्रीच होती. वास्तविक खानकाकांनी तसा सोसायटीतल्या कुणालाच कधीच त्रास दिला नव्हता. म्हणजे नळावरची म्हणता येतील, इतकी काही माफक भांडणे सोडली, तर त्यांनी कधीच सोसायटितल्या कुणाशी साधे भांडणही केले नव्हते. अर्थात आता नळावरून भांडण व्हायचे दिवस गेले. नळकोंडाळे असा गोंडस शब्द असलेले रणांगण आता दिसत नाही. वास्तविक याला जळभूमी असे म्हणायला हवे. कोंडाळे कसले. रणांगणाला, रथकोंडाळे म्हटले तर कसे वाटेल? साक्षात वीरश्रीनी भरलेले, भावी योद्ध्यांना गर्भातच जलव्यूह भेदण्याचे नामी शिक्षण देणारी ही शिक्षणसंस्था घराघरात नळ आल्यामुळे पार कोलमडून पडली आहे.

माझी सैन्यगाथा (भाग २०)

Submitted by nimita on 30 April, 2019 - 06:31

आमच्या फौजी डिक्शनरी मधे एक शब्द आहे... pck ...म्हणजे pre course knowledge .जेव्हा एखादा ऑफिसर कुठल्याही कोर्सला जायची तयारी करत असतो तेव्हा त्याच्या युनिट मधले आणि त्याच्या माहितीतले ऑफिसर्स त्याला आपापल्या परीनी मदत करतात. जे ऑफिसर्स तो कोर्स अटेंड करून आलेले असतात ते कोर्सशी संबंधित स्टडी मटेरियल, त्यांच्या पर्सनल नोट्स वगैरे पुरवतात. त्याचबरोबर काही जण कोर्स च्या दृष्टीनी महत्त्वाच्या अशा सूचना (guidelines) ही देतात. आणि याच सगळ्या ज्ञान वाटपाला pck अशा गोंडस नावानी संबोधलं जातं.

तुझ घर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 30 April, 2019 - 01:48

जेंव्हा हातात काही उरत नाही माणूस घर शोधायला लागतो. ते चार भिंतीच असावाच, त्याला कौलारू छप्पर असावाच, त्यात एखाद्या बाथटब मध्ये गरम पाण्यात शांत निजाव वा शॉवर मधून पडणाऱ्या पाण्याच्या सरीला पाऊस मानून त्यात मोकळ व्हाव अस काही नसत. त्याला फक्त घर हव असत, जे त्याला जवळ करेल, मायेने विचारपूस करेल, कितीही कटकट केली तरी शेवटी त्याची सांत्वना करेल. त्याला नेहमी समजून घेऊन फक्त न फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहील. कुणा परक्याला दारातून आत घेऊन त्याला इनसेक्यूअर फील नाही होऊ देणार. त्याच्या होणाऱ्या सगळ्या मूड स्विंगस ला आपलस करेल पण त्याला कधीच तो बेघर असल्याच जाणवू देणार नाही.

शब्दखुणा: 

कथाकारी व बेफिकिरी (२) चे प्रकाशन - सस्नेह निमंत्रण

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2019 - 00:12

नमस्कार मायबोलीकर हो,

मायबोलीवर लेखन करायला लागल्यापासून दिलदार मनाच्या सदस्यांनी मला जो उदंड रसिकाश्रय दिला त्यातून मिळालेल्या स्फुर्तीतून माझ्या निवडक कथा व निवडक गझलांचा असे दोन संग्रह लवकरच प्रकाशित होत आहेत.

कथाकारी - यात मायबोलीवरच लिहिलेल्या काही काल्पनिक तर काही सत्य घटनांशी निगडीत अशा कथा असून मायबोलीकरांनी त्या आवडल्याची पावती दिल्यामुळेच त्या घेतलेल्या आहेत.

अखेरची भेट

Submitted by वैशाली अ वर्तक on 28 April, 2019 - 10:01

भेट अखेरची
वाढदिवसाचा दिवस . खर तर आता काही जन्म दिवस साजरा करण्याचे वय नाही . आणि तसे ही आपल्याकाळीं कुठे लहानपणी आजच्या सारखे वाढदिवस साजरे करायचे. सध्या तर वाढदिवस साजरे करण्याचे फॕडच झाले आहे. सकाळपासून आपण फोन जवळ अथवा फोन हाताशी घेऊन बसावे लागते . आणि whatsapp वर तर वाढदिनाच्या शुभेच्छा दुथडी भरुन वहात असतात. .....मग 2/4 तासांनी..... धन्यवाद देणाचे काम करावे लागते . .... अगदी तसेच तिचेपण चालले होते
तसे पहाता... तिचे फारसे लक्ष नव्हते.....येणा-या फोनकडे. पण काय करणार?
फोन तर घ्यावे लागत होते. व ओघाने बोलणे आलेच.

माझी सैन्यगाथा (भाग १९)

Submitted by nimita on 26 April, 2019 - 04:54

वेलिंग्टन मधला तो एक वर्षाचा कालावधी म्हणजे आमच्यासाठी एक 'holiday at a hill station' च होता असं म्हणायला हरकत नाही. इथे 'आमच्यासाठी' या शब्दातून 'मी आणि ऐश्वर्या -आम्हां दोघींसाठी' असा अर्थ अपेक्षित आहे, कारण नितीनला त्याच्या कोर्स मधून इतर गोष्टींसाठी पुरेसा वेळच नाही मिळायचा. सोमवार ते शनिवार लेक्चर्स, सबमिशन्स, exams या सगळ्यात अगदी आकंठ बुडलेले असायचे सगळे ऑफिसर्स.. बऱ्याचवेळा त्यांचा रविवारचा दिवस सुद्धा पुढच्या आठवड्यात येणाऱ्या महत्वाच्या assignments च्या तयारीतच जायचा.

पत्र १

Submitted by विजय देशमुख on 25 April, 2019 - 12:09

प्रिय आई व बाबा,

खरं तर आजकाल पत्र कोणी लिहित नाही, पण मला त्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, म्हणुन लिहितोय. तुम्ही दोघही कृपया गैरसमज करुन घेउ नका.
तसं पाहिलं तर मी मागच्याच आठवड्यात लग्नाला आलो होतो, पण कुठुन दुर्बुद्धी झाली अन लग्नाला आलो असं वाटु लागलय. नाही नाही... प्रियाच्या लग्नात माझ्या लग्नाबद्दल गोष्टी चालु होत्या, त्याबद्दल मी अजिबात नाराज नाही. पण...

शब्दखुणा: 

एका चष्म्याची दुसरी गोष्ट

Submitted by मकरंद गोडबोले on 25 April, 2019 - 08:04

"हे इथले हे कुठाय?"
"शीऽऽऽऽऽतल. तू याचे हे इथून उचललेस का?"
"नाही ताई. मी त्यांच्या कशालाच हात लावत नाही"

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन