गद्यलेखन

तुझमे तेरा क्या है - ८

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 2 July, 2019 - 08:36

या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maayboli.com/node/53637

तुझमे तेरा क्या है -२
https://www.maayboli.com/node/53652

तुझमे तेरा क्या है -३
https://www.maayboli.com/node/65884

तुझमे तेरा क्या है - ४
https://www.maayboli.com/node/68484

“कालचक्र- एक आठवणीतली गोष्ट”

Submitted by प्रतिक सोमवंशी on 1 July, 2019 - 02:38

आम्ही चार भावंडे मी, गण्या, विण्या,आणि पप्या, पंधरा सोळा वर्ष्याची असू तेंव्हाचा हा प्रसंग. तेंव्हा मस्त पाऊस पडायचा, गावाकडचे डोंगर हिरवा शालू नेसून पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज असायचे. आमच गाव तस डोंगरांच्या मधोमध वसलेले, एक नदी गावाला वळसा घालून पुढे जायची, तिला बारमाही पाणी असायच. त्यामुळे दुष्काळ वगैरे काय भानगड असते आम्हाला ठाऊकच नव्हतं. डोंगरावरून वाहणाऱ्या ओढ्यांवरून उड्या मारत मारत शाळा गाठायचो, चिखलाने माखलेल्या चपला शाळेच्या प्रांगणात सोडून एकदा वर्गात बसल की थेट संध्याकाळीच घरी, तशी शाळा मात्र दुपारीच सुटायची पण मित्रांसोबत इकडे तिकडे भटकत फिरायचो.

अर्थ

Submitted by nimita on 29 June, 2019 - 13:36

रखरखीत उन्हाळ्यातली एक घामेजलेली दुपार..चार- साडेचार चा सुमार असावा.मी माझ्या पुस्तकांच्या दुकानात बसले होते. काचेच्या बंद दारामुळे आतली AC ची हवा सुखद गारवा देत होती. दुकानात माझा स्टाफ सोडला तर मोजकेच लोक होते.. कोणी पुस्तकांच्या शेल्फस च्या पुढेमागे उगीच फेऱ्या मारत होते तर कोणी उगीचच एखादं पुस्तक उचलून त्याची पानं उलटायचा दिखावा करत होते..त्यांच्यापैकी एकालाही पुस्तकांमधे काडीचाही इंटरेस्ट नाहीये हे न सांगताही कळत होतं...त्या सगळ्यांचा मुख्य उद्देश एकच होता- 'दुकानातल्या AC ची हवा खाणे' ! मला त्यांची ही strategy चांगलीच माहीत होती.

शान ए मायबोली

Submitted by बाबूराव रिटर्न्स on 28 June, 2019 - 14:07

राजस्थानच्या वाळवंटातून स्वार घोड्यावरून संथगतीने चालला होता.
त्याला कसलीच घाई नव्हती.
जेसलमेर अजून पाच सहा तासांच्या अंतरावर होतं
वाळवंटात दूर कुठे ना झुडूप, ना पाणी..
(एव्हढं मोठं वाळवंट ? लेखक बाबूराव झिंगले का ? - नाही नाही. कथेची गरज म्हणून सिनेमॅटिक लिबर्टी घेतली)

स्वाराला कशाचीच फिकीर नव्हती.

धुळीने भरलेल्या गावाची एक कमान दिसू लागली.
कथा ही अक्षरं अजून जीव टिकवून होती.

स्वाराने गावाच्या बाहेर घोडा थांबवला.

आतून एक उंच धिप्पाड पठाण आला,
त्याच्या हातात डबल बोअर ची रायफल होती. त्याने स्वाराचे आपादमस्तक निरीक्षण केले.

नसतोस घरी तू जेव्हा

Submitted by वैशाली अ वर्तक on 28 June, 2019 - 05:45

नसतोस घरी तू जेव्हा
खर म्हणजे एक वेळ होती की जेव्हा नजरे आड झालेेला तू आवडायचा नाहीस .वाटे सदान् कदा हे माझ्या अवती भवती असावेत .जराही दोघांनी एकमेकान पासून क्षणभर पण दूर होऊ नये .अर्थात हे कसे शक्य असणार .नोकरी धंदा पाणी तर केलेच पाहिजेना .नाहीतर खाणार काय .... नुसते प्रेम... आकर्षण ?
आता त्याला नाव देते आकर्षण पण तेव्हा प्रेमच वाटायचे.

लव्ह इन ट्रबल भाग- १४

Submitted by स्वरांगी on 28 June, 2019 - 05:40

लव्ह इन ट्रबल भाग-१४
“ आपल्याकडे कोणताच ठोस पुरावा नाहीये ज्यामुळे सिद्ध होईल की तो निर्दोष आहे…त्याने आपल्याला जे जे सांगितलं तिथे तिथे तो गेला होता याचा काहीच पुरावा नाहीये… तुझा त्याच्यावर विश्वास बसला???” थोड्या वेळाने जेव्हा अनु आणि अभिजित पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले,तेव्हा अभिजितने विचारलं…
“ मीही तेव्हा सेम कंडिशनमध्ये होते…माझ्याही निर्दोष असण्याचा कोणताही पुरावा नव्हता..” अनु म्हणाली..
“ हे बघ तुझ्या फिलिंग्स यात involve होऊ देऊ नकोस..” अभिजित तिला समजावत म्हणाला..

इरसाल म्हातारा आणि खोडसाळ म्हातारी

Submitted by jayshree deshku... on 22 June, 2019 - 14:04

इरसाल म्हातारा आणि खोडसाळ म्हातारी

बंधन(बॉण्ड)

Submitted by mi manasi on 22 June, 2019 - 06:09

MANASI NAMDEO KAWLE

बंधन (बॉण्ड)

"अहो पण! लोक काय म्हणतील? पहिल्या बाळंतपणाला लेकीने आईकडे यायचं तर आईच लेकीकडे जाऊन राह्यली. आता सगळयांना हे सांगत फिरायचं का की माझ्या लेकीलाच इकडे यायचं नाही?" काल तिला आर्याने तसं सांगितल्यापासून सुलभाची चिडचिड सुरु झाली होती. आर्या सुलभाची मुलगी पहिल्यांदा प्रेग्नन्ट होती. सातवा लागला म्हणून सुलभाने माहेरी आणायचा विषय काढला तर तिने, तुच इकडे ये म्हणून सुलभाला सकंटात टाकलं होतं.

शब्दखुणा: 

कादंबरी (शतशब्दकथा)

Submitted by atuldpatil on 22 June, 2019 - 06:00

तशब्दकथा लिहिण्यासाठी तंद्री लावली. तोच दरवाजाची बेल वाजली. मनात चरफडतच दार उघडले. बघतो तर दारात कादंबरी उभी!

“काय लेखका... विसरलास मला?”

“नाही गं. ये ना..” मी ओशाळून म्हणालो.

ती आत आली. बसली. थकल्यासारखी वाटत होती.

“काय लिहितोयस?”

“अं... शतशब्दकथा...”

“अरे वा”, कसनुसे हसंत तिने विचारले “जमली का?”

“नाही... मला जमणारही नाही” मी अपराध्यासारखा बोललो

“जमेल! कर प्रयत्न. लिही”

“अं?”

“लिही म्हणाले ना?” ती जवळजवळ ओरडलीच

मी खजील झालो. लिहू लागलो.

न्याहरी : एक वाङ्मयीन अवलोकन !

Submitted by Charudutt Ramti... on 20 June, 2019 - 10:36

सकाळी उठल्या उठल्या - “नवऱ्याला आणि पोरांना आज नाष्ट्याला काय खाऊ घालायचं ? ” सोशिक भारतीय महिलांच्या असंख्य अश्या गंभीर सामाजिक समस्यांपैकी ही अजून एक. ह्या प्रश्नाच्या उहा'पोह्या'साठी ( सॉरी उहा'पोहा'साठी ) केंद्र शासनाने एखादा महिला आयोग जरी स्थापन केला तरी ते अयोग्य ठरणार नाही. मागील इतकी वर्ष असंख्य स्त्रीवादी चळवळी झाल्या. पण ‘हा प्रश्न’ कधीच का चर्चेला घेतला गेला नाही? हे मला पडलेलं एक कोडं आहे.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन