गद्यलेखन

माधुरीचा अक्षै (भाग १)

Submitted by nimita on 22 September, 2020 - 00:29

आज पहाटे पासूनच रंजीची धावपळ चालू होती. लवकर लवकर घरातली सगळी कामं आटोपून तिला वेळेत तिच्या नवीन कामावर पोचायचं होतं. तसं सांगितलंच होतं ताईंनी -' रोज आठच्या ठोक्याला हजर राहावं लागेल !' एरवीची रंजी असती तर सरळ सांगितलं असतं तिनी त्या ताईंना..." आठ म्हंजी लैच लौकर हाये ओ ..साडेआठ च्या पयले नाय जमायचं." पण तसं काही न बोलता ती चक्क मान हलवत "व्हय, येईन की..." म्हणाली होती.

ती आणि तो

Submitted by कविन on 20 September, 2020 - 09:15

आज पुन्हा त्याला 'ती' दिसली. 'तो' त्याच्या बाईकवर आणि 'ती' समोरच्या फूटपाथवर. पण आज सोबत तिची मैत्रिण नव्हती. त्या दोघी एकत्र आल्यापासून हे असं पहिल्यांदाच झालं असेल. चांगली संधी चालून आली म्हणत, तो तिला हाक मारणार इतक्यात 'ती' एका रिक्षात बसली आणि डोळ्यासमोरून एका क्षणात गायब झाली. आज तिचा पाठलाग करायचाच ठरवून, त्याने गिअर बदलला आणि सुसाट त्या दिशेने बाईक धावडवली.

न वाजलेली टिमकी

Submitted by राजश्रेणू on 19 September, 2020 - 03:18

न वाजलेली टिमकी

इतर अनेक सणांसारखा तोही एक सण "होळी " आपल्यासोबतचे सर्वजण खूप आपल्यासारखेच खूप उत्साहात एक तर सुट्टीचा दिवस आणि गोडधोड खाण्याचा. आपले मित्र नवीन टिमकी घेऊन जीव तोडून ती बेताल वाजवत असतात त्या बेताल वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटत असतात .तेच बघून आपलेही बालमन बालहट्टावर करत आपल्यालापण हवी अशी टिमकी जीव तोडून वाजवण्यासाठी तो छोटासा आनंद लुटण्यासाठी

"आणूया, पण आत्ता सणाच्या आसपासच्या दिवसात,खूप महाग असते !" वडिलांचे उद्गगार

आत्ता आपल्यालाही मिळणार तोच आनंद , आपल्या मित्रांसारखा…..

शब्दखुणा: 

अळीमिळी गुपचिळी!

Submitted by सुमेधा आदवडे on 16 September, 2020 - 04:53

संध्याकाळी बरोबर 7 वाजता मिलिंद ऑफिस मधून बाहेर पडला. निघताना 5 मिनिटांपूर्वी घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला आणि तो आठवून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
"अगं हो, काय करणार.. बॉस म्हणाला आजच तुझं प्रेझेंटेशन दाखव मला, मग काही चेंजेस असतील तर त्यावर तुला उद्या काम करता येईल. महत्वाचा  प्रोजेक्ट आहे नंदू..जरा समजून घे प्लिज. मला माहित आहे मला हल्ली रोज उशीर होतोय घरी यायला. पण हे बघ, माझं प्रमोशन झालं की मिळवलं सगळं! थोडी कळ काढ. आणि हो, जेवायला थांबू नको माझ्यासाठी, तुम्ही दोघी जेवून घ्या अणि झोपून जा लवकर. माझ्या बटरफ्लायची शाळा आहे ना उद्या?"

आरोपी

Submitted by शुभम् on 16 September, 2020 - 02:30

आरोपी
      
    आयुष्याला कंटाळलाय तो .  नको झालं त्याला जगणं .  त्याने दावं घेतलं , फास बनवला  . पंख्याला लटकवला .  स्टुलवर उभारला . गळ्यात अडकवला .  तो स्टुल पायाने ढकलला .  फास आवळला  . श्वास कोंडला . त्याची तडफड झाली .  हात पाय झाडले .  शेवटी तडफड बंद झाली . त्यांची जीवनयात्रा संपली .

आधुनिक कृष्ण!

Submitted by आसावरी. on 15 September, 2020 - 03:57

आठ वर्षे झाली आता जवळपास पण मला अजूनही स्पष्ट आठवते ती दुपार, अगदी कालच घडल्यासारखी!
आठवीत होते मी, म्हणजे आठवीत जाणार होते, सातवी नंतरची उन्हाळ्याची सुट्टी होती. माझा ऋषी दादा आला होता सुट्टी साठी. ऋषी दादा म्हणजे ऋषिकेश, माझ्या मीना मावशीचा मुलगा. त्याची पण नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती म्हणून तो आमच्याकडे राहायला आला होता.

धर्मसंकट

Submitted by पराग र. लोणकर on 14 September, 2020 - 00:27

धर्मसंकट

``हे बघ मध्या, तुला माझी सगळीच परिस्थिती माहिती आहे. माझ्या मुली जवळ जवळ तिशीला आलेल्या आहेत रे. पण पैशामुळे त्यांच्या लग्नाचं मला काहीच बघता येत नाहीये. या डिसेंबरला माझी पॉलिसी संपतेय. माझा अपघाती मृत्यू झाला असता तर माझ्या कुटुंबाला एक कोटी रुपये मिळाले असते आणि नैसर्गिक झाला असता तर पन्नास लाख. कोटी जाऊ दे, पन्नास लाखही जाऊ दे. निदान पंचवीस लाख मला मिळवून दे. मला दोन्ही मुलींची लग्न लावून देता येतील रे.`` सुधाकर काकुळतीने मला म्हणत होता.

शब्दखुणा: 

सुखाचा शोध

Submitted by निशिकांत on 12 September, 2020 - 23:15

वार शनीवार. वेळ सायंकाळचे साडेसात. फोनची घंटा खणाणली आणि आम्हा दोघांच्याही- मी आणि माझी पत्नी- चेहर्‍यावर एकदम खुशीचे भाव उमटले. सौ. लगबगीने फोनजवळ गेली. अकेरिकेहून मुलीचा फोन होता. त्या काळी मोबाईल जास्त प्रचलीत नव्हते. सोफ्यावर बसून ती मुलीशी बोलत होती. फोनवर मायलेकीच्या प्रशस्त गप्पा चालू होत्या. वीकएंडला काय केले? नातीचं कसं काय चालू आहे? आमका आमका पदार्थ कसा बनवायचा वगैरे वगैरे. आशा गप्पा पाऊण तास ते एक तास चालायच्या. मी तिच्या जवळ बसून गप्पा शांतपणे ऐकत किंवा ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटचे दोन तीन मिनिटे माझा नंबर लागायचा. बाबा म्हणजे प्रकृती कशी आहे?

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन