गद्यलेखन

आपली गोष्ट - मनूचं सरबत

Submitted by sugandhi on 8 May, 2025 - 23:34

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

माझ्या किचनच्या खिडकीतून दिसेल अशी पॅशन फ्रुटची वेल मी हौसेने लावली आहे. किचनमध्ये काम करताना खिडकी समोर संपूर्ण कंपाउंड वर पसरलेली ती हिरवीगार वेल बघून माझे डोळे निवतात. सदा सर्वदा हिरवीगार असलेली ही वेल खूप फुलते. पॅशन फ्रुटचं फुल अगदीच कृष्ण कमळाच्या फुलासारखं दिसतं. तिला एकदा फळं यायला लागली की खूपच येतात. आंबट गोड आणि बियांमुळे थोडं क्रंची असं असतं हे फळ. मग आम्ही कधी नुसतच मीठ घालून ती फळं खातो किंवा कधी त्याचं सरबत बनवतो.

आपली गोष्ट - रेडवूड वारी

Submitted by sugandhi on 6 May, 2025 - 22:59

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

कधी कधी घरामध्ये, ऑफिसमध्ये सगळीकडेच काही ना काही लहान सहान खूपत रहातं. लहानसच, बागेत काम करताना हातात गेलेल्या तुसासारखं - म्हटलं तर काहीच नाही, पण नाही तर ठसठसत राहतं. मग घर मुलं, मांजर, बागकाम कशातच जीव रमत नाही. कोणीतरी आपल्याला बांधून ठेवलंय असं वाटत राहत पण गाठ सुटत नाही..

सुदैवाने माझ्याकडे माझ्या सगळ्या त्रासांवर एक रामबाण उपाय आहे - रेडवूड वारी! अर्धा दिवस मोकळा काढावा आणि रेडवूडच्या जंगलात चालायला जावं.

आशीर्वाद

Submitted by शिवानी बलकुंदी on 6 May, 2025 - 02:53

आशीर्वाद
आज नेहमी प्रमाणे बाबांच्या फोटोला नमस्कार करून अभि खुर्चीत येऊन बसला. अभि च्या डोळ्या समोरून भर भर त्याचे बालपणीचे दिवस येऊ लागले,
त्यांचे लहान गाव, तेथील त्यांचं वाडीलोपार्जित वाडा. गावाबाहेरील मारुती मंदिर, तिथे दरवर्षी नित्यानेमाने होणारा राम जन्मा चा सोहळा आणि हनुमान जयंतीला असलेला भंडारा, सारं गाव तिथे प्रसाद घ्यायला गोळा होत असे. अभि आणि त्याचे मित्र कार्यक्रमासाठी भरपूर वर्गणी गोळा करीत,

शब्दखुणा: 

आपली गोष्ट - मिमी (व्यक्तिचित्र)

Submitted by sugandhi on 4 May, 2025 - 15:28

प्रस्तावना https://www.maayboli.com/node/86676

ही माझी मिमी आहे. तिला सकाळी उठल्यापासून मी मी मी असं स्वतःचं नाव सांगायची सवय आहे. तुम्ही विचारा अथवा नाही, सकाळी ताटलीत खाऊ पडेपर्यंत ती नाव सांगायचं थांबत नाही!

आपली गोष्ट - हवा तेवढाच त्रास

Submitted by sugandhi on 3 May, 2025 - 19:43

प्रस्तावना https://www.maayboli.com/node/86676

वीस एक वर्षांपूर्वी आम्ही भारतात राहत होतो. आई-बाबा, भावंड, नातेवाईक सगळे महाराष्ट्रात होते आणि आम्ही दोघे बेंगलोर मध्ये होतो. तेव्हा घेतलेलं एक छोटसं घर अजूनही विकायचं बाकी आहे. आणि आता प्रमोदने ते मनावर घेतलं आहे!

सर्वसाधारणतः सगळ्याच घरांप्रमाणे आमच्या घरी सुद्धा कामाची काहीशी विभागणी आहे. एखादं काम जेव्हा मी किंवा प्रमोद करणार असं ठरतं तेव्हा दुसरा त्यातून अंग काढून घेतो. आम्ही सगळ्या मेजर स्टेप्स विषयी बोलत होतोच, पण मुख्यतः प्रमोदच सगळं बघत होता.

शब्दखुणा: 

आपली गोष्ट - आंबे आणि आठवणी

Submitted by sugandhi on 2 May, 2025 - 21:55

प्रस्तावना https://www.maayboli.com/node/86676

बे एरियात राहायला आलेल्या कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसाला विचारा की तुम्ही उन्हाळ्यात काय मिस करता भारतातलं? एकच उत्तर असेल - हापूस आंबा! माझं गेलं एक दोन वर्ष मे उन्हाळ्यात भारतात जाऊन झालं नाही. प्रमोद गेला होता, पण माझं आणि मुलांचं हापूस आंबा खायचं खूप दिवस राहून गेलं होतं.

शब्दखुणा: 

आपली गोष्ट

Submitted by sugandhi on 2 May, 2025 - 10:16

नमस्कार, मी मनू, मानसी कुलकर्णी. मी बे एरियामध्ये रहाते. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला दोन मुलं आहेत. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घर - मुलं, नवरा, मांजर आणि माझी बाग असा माझा दिवस असतो. थोड्याफार फरकाने सगळ्याच बे एरियात राहणाऱ्या भारतीय बायकांचा दिवस! जसे डिझाईन पॅटर्न असतात ना तसेच माणसाच्या आयुष्याचे पण असतात!
हे वर चित्र आहे ना, तसं आहे माझं जग. सुखी - perfect with small imperfections. कसलं गोड चित्र आहे, पण माझ्या हातातल्या मांजराला AI ने दोन शेपट्या काढल्या आहेत.
ती शेपटी दुरुस्त करायला प्रयत्न केले पाहिजेत हे खरं आहेच, पण कधीतरी नुसते हसरे चेहरे सुद्धा पहावे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन