गद्यलेखन

गट्टी गणिताशी, मोदक दुप्पट खाशी

Submitted by भास्कराचार्य on 14 September, 2021 - 22:40

हिमालयाच्या पर्वतशिखरांवर सोनेरी धुकं चमकत होतं. कैलास आणि गुर्लमांधात्याची शिखरं मावळतीकडे झुकणार्‍या उन्हात न्हाऊन निघाली होती. मात्र अश्या उन्हात शांत आरामाऐवजी भगवान शंकराच्या घरी मात्र लगबगीचं वातावरण होतं. श्रीगणेश लवकरच त्यांच्या वार्षिक वारीला निघणार होते ना! सामानाची बांधाबांध किती 'झाली' म्हटलं, तरी शेवटपर्यंत काही ना काहीतरी असतंच. देवी पार्वती आपल्या बाळाला नेहमीप्रमाणे सूचना देत होती. "मोदक जास्त खाऊ नकोस हो!" "पावसात जास्त भिजू नकोस!" "मूषकाची काळजी घे." वगैरे. भगवान शंकरही कौतुकाने आपल्या मुलाच्या सोहळ्याची तयारी बघत होते.

शशक पूर्ण करा - अंधार - आस्वाद

Submitted by आस्वाद on 14 September, 2021 - 22:11

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
त्याला आठवतच नव्हतं तो इथे कसा आला. अंधाऱ्या, थंड जागी आल्याचं त्याला जाणवलं आवाजाने झोप उडाली तेव्हा. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला बाटली दिसली. त्याने रिकामीच बाटली तोंडाला लावून पहिली. आपल्याला भूक लागलीय की तहान, त्याला कळेना. बाहेरच्या आवाजाने त्याचा थरकाप उडाला. तोंडातून आवाज निघेना.
दरवाजा उघडल्यावर हळूहळू आवाज आणि उजेड येऊ लागला. क्षणांत दोन हात त्याच्याकडे आले.

शशक पूर्ण करा - घर घर - BLACKCAT

Submitted by BLACKCAT on 12 September, 2021 - 13:06

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
मी चटकन त्याच्यापासून दूर पळाले, उंच सुरक्षित अंतरावर वर गेले. तरीही त्याने मला पाहिलेच.

" हलकट, तू इथे सरपटत खाली बसलीस तर मी कुठे कौलावर जाऊन बसू का? मांजर जमिनीवर , कुत्रे दारात आणि इतरत्र आम्ही. तू भिंतीवर वर बसून किडे खा."

तो माझ्याकडे बघून ओरडत होता.
" हे माझे घर आहे, इथे खाली गादीवर येऊ नकोस."
दिवा मालवून तो झोपला.

शब्दखुणा: 

शशक पूर्ण करा - फुफाटा - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 12 September, 2021 - 07:57

फुफाटा

काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि बाळाप्पाची तंद्री भंगली.
कोणीतरी तिला केसांना धरून फरफटत आणत होतं. लक्ष्मी ? तो शहारला. आरडतओरडत त्या आडदांडाला ती प्रतिकार करीत होती. ते बाळाप्पासमोर पोहोचले. अशक्त झालेला तो उठू लागला.. भेलकांडला..

आडदांडानं तिला सामोरं केलं. पदर सुटलेल्या तिनं नवऱ्यासमोर लाजेनं मान खाली घातली.

"भेन्चो* ! पैशे आण न् ह्या रां*ला ने. पिंट्या जा, सोड याला.

पिंट्या पुढे झाला.

शशक पूर्ण करा - Man proposes...- कविन

Submitted by कविन on 11 September, 2021 - 12:06

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो काय आणि पाण्याचा लोंढा भस्सकन आत येतो काय!

'Man proposes, God disposes' गेल्याच आठवड्यात या वाक्यावरुन 'संयमीत' चर्चा झाली होती. 'देव काही करत नसतो, माणसाची Strong इच्छा हवी' मीही ऐकवलं होतं.

पाण्याचा लोंढा आता गळ्यापर्यंत आलाय. एकत्र जगण्याचा प्लॅन फेल तर फेल, 'एकत्र मरण पत्करु' म्हणत आम्ही वाट बघत बसलो. 'तो' समोर उभा ठाकला.

शशक पूर्ण करा -जखम - अमितव

Submitted by अमितव on 11 September, 2021 - 10:33

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

शशक पूर्ण करा - अधुरं प्रेम - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 11 September, 2021 - 09:26

काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
सभोवताली उजेड पसरला. क्षणार्धात एक लखलखतं हत्यार वेगानं आतमध्ये येत खस्सकन् पोटात खूपसलं गेलं. अपार वेदनेनं त्याचा जीव कळवळला. मीही डोळे घट्ट मिटून घेतले.

शशक पूर्ण करा - सोबत - हजारो ख्वाईशे ऐसी

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 11 September, 2021 - 08:50

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार.
कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
तिला अंधार आवडत नाही.
ती गुहेत आत जाते. सर्वानी शंभरदा बजावून सांगितलेलं असूनही. ती टपोऱ्या डोळ्यांची. देखणी. चंचल. मनस्वी.
आत चाहूल लागते तसे तिचे कान टवकारतात.
आणि लखकन त्याचे डोळे चमकतात. त्याची तीक्ष्ण, भेदक नजर. मी राजा आहे इथला असं सांगणारी.
तो सरसावून दबा धरून बसतो. तिच्या उष्ण रक्ताचा घोट घेण्यासाठी झेपावतो.
आणि ती? ती गर्रकन फिरून पुन्हा बाहेर पडते. जिवाच्या आकांताने पळत सुटते अंधारात.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन