भारताचे परराष्ट्र धोरण !
परदेशातील होणाऱ्या घडामोडी मुळे भारतात देखील त्याचे पडसाद उमटत असतात . या धाग्यावर भारताच्या परराष्ट्र धोरण विषयक चर्चा होईल अशी अपेक्षा !
सुरूवात नेहमी प्रमाणे पाकिस्तान पासून
परदेशातील होणाऱ्या घडामोडी मुळे भारतात देखील त्याचे पडसाद उमटत असतात . या धाग्यावर भारताच्या परराष्ट्र धोरण विषयक चर्चा होईल अशी अपेक्षा !
सुरूवात नेहमी प्रमाणे पाकिस्तान पासून
पहिले प्रेम, पहिला पगार, पहिला पाऊस, नोकरीचा पहिला दिवस... ह्या आणि अशा अनेक गोष्टी पहिलेपणाच्या न विसरण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पण ह्या व्यतिरिक्त अनेक "पहिल्या" अविस्मरणीय गोष्टी असतात कि ज्या आपण कधीतरी पहिल्यांदाच केलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या असतात. आणि तेंव्हा हे पहिल्यांदाच असल्याने आपल्याला त्याविषयी काही माहित नसते त्यामुळे कधी थरार तर कधी गोंधळ अशा गमतीजमती घडत असतात. आणि आता आपण जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा ह्या मजेशीर आठवणी आपल्याला गालातल्या गालात हसायला लावतात. इथे अशाच काही मजेशीर आठवणी आपण शेअर करूया...
नमस्कार. मी मायबोलीवर पूर्वी एकदोनदा मला ज्या समस्या भेडसावत होत्या त्या मी इथे मांडल्या व मायबोलीकरांनी त्यास उपयुक्त प्रतिसाद दिला. त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. हा धागा त्यासंदर्भातच पण पुढच्या पायरीबाबत आहे.
रेप , लैंगिक शोषण , मुलीवर ऍसिड फेकणे हे गुन्हे घडताना आपण पाहत आहोत .... अजूनपर्यंत आपल्या देशात या गुन्ह्यांना कडक शिक्षा नाही . रेपला जास्तीत जास्त 7 वर्षं तुरुंगवास आहे आणि स्त्रीचा मृत्यू झाला तर फाशी ... तेही नक्की नाही .. आपण पाहिलं आहेच गेल्या काही वर्षांच्या घटनांमधून .. त्या डिटेल्स मध्ये पुन्हा जाण्याची गरज नाही ... मग लैंगिक शोषण किंवा ऍसिड हल्ला हे तर जणू अतिशय क्षुल्लक किरकोळ गुन्हे असल्यासारख्या शिक्षा होतात .. एकूण एक सिस्टीम एक भारतीय नागरिक म्हणून अत्यंत निराश करणारी आहे ....
शोधतो काही कुठे माझ्यात मी
हा बरा माझा मला अज्ञात मी
भोग सारे भोगणे आहे इथे
का कुणाला दाखवावे हात मी
टाळली नाही उगा मी माणसे
टाळले सांगू किती आघात मी
पाळला अंधार मी माझ्या घरी
पाळली झोकात आहे रात मी
भीड ठेऊ मी हवेची का उगा
मंद नाही तेवणारी वात मी
चर्चिले जाते असे काही मला
रान सारे जाळणारी बात मी
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- मेनका
(गालगागा गालगागा गालगा)
इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा तत्सम वस्तूंचं आश्चर्य किंवा चकीत होणे असं होणं कमी होत चाललं आहे .. नवी पिढी तर मोबाईल बघतच पाळण्यातून रांगणे आणि पावलं टाकणे या फेज मध्ये पोहोचते आहे .. चिंटूच्या एका स्ट्राईपमध्ये चिंटूचे पप्पा विचारतात नवीन फोन आणला की मला त्यातलं शिकवशील ना ... चिंटू हसू लागतो , म्हणतो त्यात काय शिकायचं असतं ? ज्या मोबाईल कॉम्पुटरसंबंधित गोष्टी आधीच्या पिढीला थोडी शिकून घ्यावी लागतात ती आताची 5 - 7 वर्षांची मुलं सहज करतात जणू काही पोटातूनच शिकून आली आहेत मोबाईल वापरणं ... त्यांना कधी कुठलं गॅझेट चकीत करू शकेल असं वाटत नाही ...
काल, माझा मित्र अमितचा फोन आला. बर्याच दिवसांनी कामाव्यतिरिक्त बोलायला त्याने फोन केलेला. या आधी आम्ही सगळे मित्र कुणाच्या वढदिवसाला म्हणा, कुणी गाडी घेतली म्हणुन म्हणा किंवा इतर कसल्याही सुख-दुखाच्या क्षणी एकत्र भेटायचो, खुप हसी-मजाक करुन वेळ सत्कारणी लावायचो पण गेल्या ५ महिन्यात सर्वकाही बदललं आहे. कुणाची साधी चौकशी करायलाही वेळ मिळत नाही कारण वर्क फ्रॉम होम मुळे तेवढा वेळ मिळतच नाही.
# पूमाराना
मी मायबोलीवर नविन आहे (आधीच सांगितलेलं बरं!). तर, पूमाराना शब्दप्रयोग वाचल्यावर जाणून घ्यावसं वाटलं, कशी होती पूर्वी मायबोली?
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट....
सांगाल मला?
घरात प्रचंड प्रमाणात काळ्या मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?
मोळीत स्वप्ने बांधून आलो
बाजार माझा मांडून आलो
जाणीव होती केव्हा भुकेची
मी आसवांना रांधून आलो
लाजून गेलो का वेदनांना
हासून खोटे सांगून आलो
लावू नको तू दारास आता
दे ना निवारा लांबून आलो
जा तू म्हणाले होते जरीही
दारी कसा त्या थांबून आलो
खाते मनाला जे सांजवेळी
मी त्या घराशी भांडून आलो
सारे निघाले काढून फोटो
होतो मला मी टांगून आलो
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- स्वानंदसम्राट
(गागालगागा गागालगागा)