कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं.. कधी चुकुन एखादी सहल.. पाहुणे-राऊळे.. स्नेहभोजने.. डी-मार्ट्च्या वार्‍या.. दर रविवारी मंडई मधली भाजी/फळे खरेदी.. दुकानांतली/मॉलमधली नवीन खरेदी.. कधी मित्रांसोबत ट्रेकिंग.. अगदी सगळं कसं सुखनैव सुरु होतं.

कोरोना जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पुढे असं लॉकडाऊन वगैरे होईल अन आयुष्य पुर्णपणे बदलेल असं आजिबात वाटत नव्हतं. इतर साथीच्या रोगांप्रमाणे भारतात कोरोना जास्त हातपाय पसरू शकणार नाही अन भारतीयांची प्रतिकार शक्ती प्रबळ असल्याने इथे त्याचा टिकाव लागणार नाही असं बोलता-बोलता बरेच आप्त-स्वकीय-मित्र-स्नेही म्हणायचे. परंतु झालं उलटंच. नाही नाही म्हणता कोरोना कधी सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला हेही कळालं नाही अन सुखनैव सुरु असलेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर सुसाट पळणारी जीवनाची गाडी एकदम संथ गतीने चालू लागली..

कोरोना मुळे आयुष्याला प्राप्त झालेल्या या संथ गतीत बर्‍याचशा गोष्टी जीवनात नसल्या तरी चालतात याचा साक्षातकार होऊ लागला. ज्या गोष्टींशिवाय जगणं अशक्य होईल असं वाटत होतं तो केवळ गोडगैरसमज होता हे आता ध्यानी येतं अन आपण मनातचं हसतो..

उदाहरणार्थ :
१) सकाळी उठल्यावर वर्तमान पत्र हवंच हवं या गृहितकाला छेद जाउनही आता वर्ष झालं. वर्तमान पत्र नसलं तरी चहाचा घोट आरामात घशाखाली उतरतो हा नवाच शोध कोरोना आल्यामुळे लागला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

२) चिकन्/मटण्/मासे अगदी महिना-महिना खायला मिळाले नाही तरी काहीही बिघडत नाही याचाही शोध लागला.

३) घसा दुखेल्/सर्दी होईल या कोरोना लक्षणांच्या भितीने का होईना पण सलग दोन वर्षं आईस्क्रिम खायला मिळालं नाही म्हणुन देखिल काहीही बिघडलं नाही.

तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की ज्या गोष्टी कोरोना काळ सुरु व्हायच्या आधी फार गरजेच्या वाटत होत्या अन आता त्या गोष्टी जीवनात नसतील तरी फार काही बिघडत नाही. असतील तर शेअर करा Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वर्षी अचानक लॉकडाउन जाहीर झाला होता. त्याच्या आधीच्या आठवड्यात शाळा बंद केल्या म्हणुन मुलीला घेउन सासु सासरे गावी गेले...८ दिवस जाउन पाडव्यापर्यंत परत येतो म्हणाले....तोवर आमचे ऑफिस बंद होउन वर्क फ्रॉम होम सुरु झाले होते. अचानक रात्री ८ वाजता लॉकडाउन जाहीर झाला तो दुसर्‍या दिवशी सकाळी ११ नंतर सुरु होणार होता.....२१ दिवस कोणालाच कुठुनही कुठेही जाता येणार नव्हते....इतके दिवस मुलगी आणि सासु सासरे गावी आणि आम्ही पुण्यात राहाणे शक्य नव्हते...पुढच्या ३० मिनिटात आम्ही पण निर्णय घेतला की आपण पण गावी जाउ....सुदैवाने २:३०-३ तासात गावी पोचणे शक्य होते त्यामुळे पहाटे ५:३०-६ ला निघायचे ठरले.....घरात होते नव्ह्ते ते सगळे किराणा सामान, भाजीपाला, दुध,दही,गरजेपुरते कपडे या सगळ्याचे पॅकींग करुन झोपायला रात्रीचे १ वाजले....सकाळी ६ ला गाडी सोडली तोवर हायवे ला अजुन पोलिस चेकपोस्ट तयार झाले नव्ह्ते त्यामुळे सुखरुप ९ ला घरात पोचलो.... ते २१ दिवस त्या पुढचे २१ दिवस..परत त्यापुढे काही दिवस असे करत सुमारे २ ते २.५ महिने गावी राहिलो...तिथे लक्षात आलेल्या काही गोष्टी...
१. घरात घालायचे ४ कपडे सेट + २ जरा बरे बाहेरचे कपडे यावर २-३ महिने आरामात काढता येतात. दर महिन्याला नवी कपडे शॉपिंग गरजेची नाही.
२. गेले वर्षभर नवीन चप्पल खरेदी नाही...बाहेर जात नसल्याने काहीही अडले नाही....
३. गावच्या घरात मिक्सर, ओव्हन नव्ह्ता तरी चार ठाव सुरेख स्वैपाक करता आला. संकटाच्या काळात माझ्या डोक्यावर सुरक्षित छप्पर आहे आणि २ वेळच्या अन्नाची सोय आहे ही भावना अतिशय सुखावणारी होती. त्याबद्दल परमेश्वराचे आभार.
४. ब्रेड, पाव ई काहीही पहिले ३ आठवडे मिळत नव्हते तरी काही अडले नाही.
५. घरातली सगळी कामे + हॉटेल चे जेवण नाही + बेकरी, ब्रेड इइ नाही त्यामुळे अपोआप वजन कमी झाले. जिम न लावता. Happy
६.सगळ्यात महत्वाचं हे कळलं की आपल्या रोजच्या गरजा खुप जास्त बेसिक आहेत. आपण विनाकारण हे हवं ते हवं म्हणून वाढवुन ठेवल्या आहेत.

अगदी माझ्याही मनात असंच आलं स्मिता जी Bw . कितीतरी गोष्टींची गरजच सम्पल्यात जमा आहे...

सुदैवाने २:३०-३ तासात गावी पोचणे शक्य होते>> कदाचित आपण एकाच ठिकाणी तर नाही आहोत ना...?? Wink

खरंच, वेलांटी Lol
गेल्या वर्षी शाळा बंद होईल अशी शंका पहिल्यांदा आली तेव्हा बापरे! आता मुलं दिवसभर घरात.. हाच विचार मनात आला होता.. पण म्हणता म्हणता अख्खं वर्ष गेलं घरी बसून. ऑनलाइन का होईना, पण शाळा झाली आणि बऱ्यापैकी शिकली म्हणायची मुलं. अर्थात लहान आहेत म्हणून ठीक आहे. मोठ्या मुलांचं नुकसान झालं असणार. पण घरातही जातो वेळ मुलांचा, हे लक्षात आलं.
दुसरं म्हणजे कामवाल्या बाई दिवसेंदिवस नाही आल्या तरी चालतं, हेही लक्षात आलं.

माझ्या टीम मेटने आधीची वेगन आर असतानाही गेल्या वर्षी गुढीपाडव्याला नवीन सेल्टॉस कार घेतली. १६ लाखाची. आता म्हणतो काहीच गरज नव्हती कारची. उलट कार धुणार्‍याला महिना ५०० रुपये द्यावे लागतात का तर धूळ बसते म्हणुन.

कामवाल्या मावशी नाही आल्या तरी चालतं. नव्हे आता तर पळतं. घरातल्या लहानथोर सदस्यांना सामावून घेउन नीट नियोजन केलं तर त्या कामाचं ओझं वाटत नाही. उलट फायदे च होतात.
टू व्हीलर अत्यावश्यक वाटायची अगदी अर्धा एक किमी जायचं असलं तरी. पण जाऊन येऊन 8 / 10 किमी पर्यंत कुठं जायचं असेल तर पूर्वीसारखी आपण सायकल चालवू शकतो.
ट्रिप ला जायचं आणि एन्जॉय करायचं म्हणजे कुठंतरी लांबचं बुकिंग करावं लागतं अस नाही. तोच आंनद जवळपासच्या ठिकाणी , डोंगर चढायला जाऊन वगैरे ही मिळतो. मी राहते तिथली अनेक सुंदर ठिकाणं मला जिल्हाबंदीमुळं कळली.
भंगारवाले, दारोदार किरकोळ झाडू/ चटया/ चादरी / कव्हर्स विकणारे लोक आता घरासमोर येऊन काही धंदा/ व्यवसाय चालू नाही ओ. घरातळ्यांसाठी तांदूळ डाळ द्या म्हणतात तेव्हा त्याना मदत करूनही हे जिन्नस आपल्याकडे पुरेसे आहेत. बाकी कुठल्याही चटक मटक गोष्टींची गरज नाही हे प्रकर्षाने जाणवते.

मल्टीप्लेक्स वाचून काहीही अडत नाही हे लक्षात आलं Lol बाकी तसेच , कामवाली, पेपर हे तर सगळ्यांनाच लागू होईल. बाहेरचं चटक मटक खाणं जे नेहमीचं झालं होतं एकेकाळी तेही आता बंद आणि गरज नसलेलं झालं. ‌ विनाकारणची शाॅपिंगही आली यात मोस्टली कपडे , ॲसेसरीज वगैरे. पण त्यामुळे विंडो शॉपिंगही आपोआप बंद पडली याचं वाईट वाटतंच Wink

सगळ्यात महत्वाचं हे कळलं की आपल्या रोजच्या गरजा खुप जास्त बेसिक आहेत. आपण विनाकारण हे हवं ते हवं म्हणून वाढवुन ठेवल्या आहेत >>> खरंय हे.

गाड्यांबाबतीत सहमत.
विकेंडला मॉलच्या पार्किंग साठी ६० रुपये, मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा साठी प्रत्येकी ३००-६०० रु, फूड कोर्ट मध्ये कुटुंबासोबत जेवणासाठी १५००-२००० रु आणि आठवडाभर चाललेले इतर किडुकमिडुक असले सगळे खर्च कोरोना काळात बंद झाल्या मूळे फालतू गोष्टींना महत्व देऊन आजपर्यंत किती वायफळ खर्च केला आहे हे लक्षात आलं.
तसेच , माणूस घराबाहेर पडला की त्याची पत टिकवण्यासाठी काही खर्च अपरिहार्य असतात. आता जिथे बाहेर पडणच शक्य नाही तिथे कसली पत आणि कसला खर्च. कोरोना काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या/ धंदे बसले पण बऱ्याच लोकांचे सेविंग पण मजबूत झाले.

आपण नसलो तर बाकीच्यांचे अडेल ही समजूत फोल ठरली. शेजारी पाजारी दिसणाऱ्या उदाहरणांवरून. कोणाचही कोणावाचून अडत नाही , आयुष्य सुरूच राहतं . हे छापील वाक्य माहीत होतं. पण करोना ने ज्यांना जोरात धक्का दिलाय ते बघून हे ठळक झालं.
आपण मारे भविष्याचे मोठमोठे प्लॅन करत असतो, भूतकाळाचे हिशोब लावत बसतो पण वर्तमानकाळ इतका शाश्वत दुसरा काळ नाही. आयुष्य हे खरोखर क्षणभंगुर आहे. कधी वाटलं कुणाशी बोलावं तर आत्ता बोलू का , त्याला/ तिला कसं वाटेल हा विचार करणं फोल आहे हे कळलं. खरोखर मनातून बोलावसं अपल्याला वाटतय न मग लगेच बोलायचं.

<आपण मारे भविष्याचे मोठमोठे प्लॅन करत असतो, भूतकाळाचे हिशोब लावत बसतो पण वर्तमानकाळ इतका शाश्वत दुसरा काळ नाही. आयुष्य हे खरोखर क्षणभंगुर आहे. कधी वाटलं कुणाशी बोलावं तर आत्ता बोलू का , त्याला/ तिला कसं वाटेल हा विचार करणं फोल आहे हे कळलं. खरोखर मनातून बोलावसं अपल्याला वाटतय न मग लगेच बोलायचं.>
हे अतिशय पटलं....
धाकट्या जावेचा मामा कोरोनामुळे admit होता. त्याने फोन केला होता तिला की खूप एकटं वाटतयं इथे..जरा गप्पा मार....कशात तरी बिझी असल्याने ती नंतर फोन करते म्हणाली आणि ३० मिनिटात तो गेल्याची बातमी आली. जबरदस्त धक्का बसला तिला...

जे लोक सांगत आहेत की दर महिन्याला नवीन कपडे, चप्पल वगैरे घ्यायची गरज नाही ते सगळे पुन्हा पुर्वीसारखे झाल्यावर फक्त आहे तेव्हढ्यावर राहणार आहेत का? आता आपण घरातच आहोत म्हणून त्याची गरज आता वाटत नसेल. पण रोज बाहेर जावे लागते, दर महिन्याला सणवार, वाढदिवस, गाठीभेटी, समारंभ असे काही असेल तर काय करणार? अश्यावेळीही नवे काही घ्यायची गरज वाटली नाही तरच आधी जे करत होतो त्यातला फोलपणा कळला असे म्हणता येईल.

आता असे भरगच्च सणवार, वाढदिवस, गाठीभेटी, समारंभ होतील का हाच एक प्रश्न आहे.. कदाचित वायफळ खर्च कुठे होतोय हे लक्षात आल्यामुळे भडकपणा कमी होईल असे वाटते.

आता नाही होणार पण काही वर्षांनी होतील. आता तर भरगच्च असे काही सोडाच पण गाठीभेटी, गर्दी करणेही टाळण्याचे दिवस आहेत.

हेहे माझा अनुभव वेगळा आहे. या करोनाच्या काळात साध्या चपला, कपडे अशी खरेदी कमी झाली असली तरी इतर काही दणदणीत शॉपिंग केलंय आम्ही...

  • २ लॅपटॉप, दोन मुलांसाठी
  • डिशवॉशर
  • घरघंटी
  • १ मोबाईल
  • १ टेबल, २ ऑफिस खुर्च्या
  • ३ ओव्हर द इयर, ब्लुटुथ हेड्फोन्स
  • पॉपअप टोस्टर, मुलांच्या खादाडीसाठी
  • मोठं आप्पेपात्र
  • ऑक्सिमीटर
  • पाणी गरम करायची इलेक्ट्रीक किटली
  • लादी पुसायचा, आपोआप पिळला जाणारा मॉप

शिवाय एक मोठ्ठा फ्रिज आणि जास्त कपॅसिटीची वॉशिंग मशिन पाहुन ठेवलिय ते वेगळंच Happy

-आमचं शॉपिंग कमी झालेलं नाही.
-अगदी चैनीच्या वस्तू नाही.पण आधी ज्या वस्तू खरेदी करायला बाहेर गेलं जायचं त्या घरातून मागवल्या जातायत(झाडं,मसाले,इनर्स,सेल बॅटरीज वगैरे.)
-आमचं बाहेर खाणं पूर्ण थांबलेलं नाही.एखाद्या दिवशी ऑफिस काम संपतच नसेल असं झालं तर बाहेरून खाणं मागवून घरी 1 मिनिट गरम करून खाल्लं जातं.
-आमचं पिक्चर थिएटरमध्ये बघणं कमी झालंय.आधी परीक्षा संपल्या की त्यातल्या त्यात चांगला युए रेटिंग चा पिक्चर दाखवला जायचा.पण आमचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पिक्चर बघणं दर आठवड्याला झालंय.
-सलून चा खर्च ऑफिसमध्ये थोबाड सर्वाना दिसत असल्याने हौसेने जो केला जायचा तो शून्यावर आलाय.(परत ऑफिसला गेल्यास लोक घाबरून किंचाळणार नाहीत इतपत स्किन केअर आणि हेअरकट घरी जमवलाय)

मला पूर्वीचं आयुष्य, पूर्वीचा कन्झ्युमरिझम हवाय.ममव घरातला जन्म आणि आयुष्य असल्याने केलेल्या खरेद्या, खर्च त्या चैनीतही पैसे वसूल असतील इतकं नक्की.

खरं सांगायचं तर कधीही स्वतः किंवा इतर कोणाचा काळ्या बॉडी बॅग मध्ये एकाकी निरोप घ्यावा लागेल या भावनेने आतापर्यंत कष्ट करून कमावलेलं वापरून कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद आणावा, किमान चार चांगल्या मेमरीज(आई बाबा सकाळी उठतात आणि हेडफोन लावून बोलत बसतात यापलीकडे) जमाव्या यासाठी जे लागेल ते आताच करायचंय.आपले आणि आपल्या जवळचे बरोबर असताना.

मापृ
तरी मध्ये टॉम अँड जेरी पाहिलाच आम्ही थिएटर ला.त्यामुळे 'कमी' म्हटलंय Happy त्या 2 महिना काळात अजून चांगले चित्रपट आले असते तर डबल मास्क लावून तेही पाहिले असते.

या कशाच्याविना किंवा सगळ्यां सहीत आयुष्य चालूच रहाते. इतकंच खरं. सगळं असेल तर ते ही आवडतंच. नसेल तर त्यात गोड मानून घेता येतं. हे नसेल तर गोड वाटणे जमायला कदाचित थोडा वेळ लागतो, जो व्यक्तिपरत्वे बदलेल कदाचित.
पण चिकन, मासे, वर्तमानपत्रे, ब्रेड, चपला, मल्टिप्लेक्स, मिक्सर, आइस्क्रीम, रेस्टॉरंट मधलं जेवण हे सगळं शक्य नाही म्हणून न करणे म्हणजे गरजा संपल्यात म्हणणे बरोबर आहे का?
माझ्या पुरतं बोलायचं तर गरजा बदलल्या. त्या सुद्धा लीस्ट रेझस्टंट पाथने ट्यून झाल्या. इतकंच. मार्ग काढला बस. लाँग रन मध्ये काय होईल? आरामदायी जे यातलं आवडलं ते आणि जे पूर्वीचं आवडायचं ते निवड केलं जाईल. जीवाला कमीत कमी तोशिष ही माणसाची परिस्थिती बदललेली नाही. बदलणार ही नाही.

माझ्या वरच्या लिस्ट मधला मोबाईल सोडला तर बाकीच्या गोष्टी आम्ही करोना/लॉकडाउन नसता तर घेतल्या नसत्या.

आयुष्य किती अपुरं असु शकतं याची जवळची उदाहरणं बघितल्यावर, उज्ज्वल भवितव्यासाठी वर्तमानात जी मनाला मुरड घालायचो त्याचा फोलपणा कळला. त्यामुळे आता हात सैल सोडुन जगायचं ठरवलंय

>माझ्या पुरतं बोलायचं तर गरजा बदलल्या. त्या सुद्धा लीस्ट रेझस्टंट पाथने ट्यून झाल्या. इतकंच. मार्ग काढला बस. लाँग रन मध्ये काय होईल? आरामदायी जे यातलं आवडलं ते आणि जे पूर्वीचं आवडायचं ते निवड केलं जाईल.

+१

आरामदायी जे यातलं आवडलं ते आणि जे पूर्वीचं आवडायचं ते निवड केलं जाईल>>> +१
शेवटी जे जे मिळू शकतं ते सगळं हवंच असतं, आता जरी गरजांना मुरड घातली तरी नंतर त्या गोष्टी परत हव्यात असं वाटूच शकतं. माणूस आहे शेवटी.‌. गरजा संपत नाहीत....सब मोहमाया है Happy

कोरोनावर मॉडर्न मेडिसन चालत नाहीत. फोल आहेत.
नवीन Submitted by Srd on 18 May, 2021 - 17:42
<<

हा प्रतिसाद म्हणजे हुशार "हीन्दू शास्त्रज्ञ" असण्याचा परिणाम दुसरं काही नाही. Rofl हर्शू नंतर यांचाच नंबर आहे भारताचे हिन्दुस्तान चे हेल्थ मिनिस्टर होण्यासाठी.

अगदी परवाच भावाबरोबर कोरोना काळातले सेविन्ग्स वर बोलत होते.. जॉब्स आहेत त्यांचे ठीक आहे पण तुमच्यावर ज्यांचे अवलम्बून आहे त्यांचे काय? ईकॉनॉमी अशाने सफर (suffer) होईल ना? जोपर्यन्त कमावणारे लोक बाजारात (कपडे, मूव्हीज, बाहेरचे खाणे, कामाला बाई, पर्यटन, गाडी खरेदी, धार्मिक पर्यटन, ऑफिससाठी बाहेर पडले कि टपरी- जे unnecessary category मधे मोडू शकते आणि बरेच काही) पैसा फिरवणार नाहीत, तेव्हा एक वेळ अशी नाही का येणार कि पैसा फक्त अतिआवश्यक सेवा वाल्यांकडे केन्द्रित होईल? सो मला असे वाटते कि आपल्याला कमवायचे असेल तर काही गमवायला लागेलच..

आता तरी काय होत होतं.... बराचसा पैसा समाजातील ठराविक घटकाकडेच केंद्रीत होत होता.. कोरोनामुळे कदाचित तो दुसरीकडे केंद्रीत होईल. हपापा चा माल गपापा..!

Pages