चांदोमामा

चांदोमामा , चंदाराणी की चंदा डार्लिंग....

Submitted by Vishu Patil on 23 May, 2021 - 02:36

खरं सांग कोण आहेस तु?
निंबोणीच्या झाडामागे खरच लपतोस का तु?
कधी असतोस मामा तर कधी असतेस राणी
खरच का तुझ्यासोबत नाचते समुद्राचे पाणी?

लहानपणी आमच्या ताटात असायचा
तुझ्या नावाचा एक घास
चांदोमामाच्या गावाला जायचा
एकच होता आमचा ध्यास

दर महिन्याला तू
जातोस तरी कुठे?
कुठल्या "ताऱ्यासाठी"
तुझा जीव तीळ-तीळ तुटे?

अजूनही आठवतो का रे तुला
आपला पाठशिवणीचा डाव
वेगळाच होता ना
तो तुझा माझा गाव

शेवटी थकून झोपायचो
मी आईच्या मांडीवर
तू मात्र तसाच जागा
निंबोणीच्या फांदीवर

चांदोमामा

Submitted by शिवाजी उमाजी on 9 July, 2017 - 22:49

चांदोमामा

चांदोमामा चांदोमामा थकलास का?
टाॅवरच्या मागे लपलास का?

टाॅवर आता झाला गगनचुंबी
नात्यात पण वाढली बघ लांबी

एकद वेळी अंगणात येउन जा
कधीतरी आमच्याशी खेळून जा

© शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589

शब्दखुणा: 

अंगाई.... चांदोमामा

Submitted by पुरंदरे शशांक on 12 May, 2017 - 03:03

चांदोमामा गोरा पान.... बाळ किती नाजूक छान

चांदोमामा ढगांमागे..... बाळ अजून कसे जागे

चांदोमामा गोल गोल .... बाळा बाळा डोल डोल

डोल डोल डोलताना
बाळ मुठी मिटताना
गाई गाई करताना
वळवळ चळवळ थांबताना

डोळे गेले मिटून
बाळ गुर्कन झोपून.....

Subscribe to RSS - चांदोमामा