भारत-जर्मनी राजनयिक संबंधांची 70 वर्षे

Submitted by पराग१२२६३ on 1 July, 2021 - 01:40

भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनयिक संबंधांना नुकतीच 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने परस्परांमधील मैत्रीपूर्ण संबंधांची आठवण म्हणून 10 जून 2021 रोजी दोन्ही देशांनी प्रत्येकी एका विशेष स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण केले. या निमित्ताने दोन्ही देश संयुक्तपणे 2021-22 मध्ये विविध कार्यक्रमांचेही आयोजन करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये उच्च दर्जाचे संबंध प्रस्थापित झालेले असून भारतात नुकत्याच आलेल्या ‘कोविड-19’च्या दुसऱ्या लाटेच्या काळात बर्लिनने भारताला भरीव मदत केली आहे.

भारत आणि जर्मनी (तत्कालीन पश्चिम जर्मनी) यांच्यातील राजनयिक संबंधांची सुरुवात 70 वर्षांपूर्वी झालेली असली तरी त्यांच्यातील आर्थिक, सांस्कृतिक संबंधांचा इतिहास त्याहूनही जुना आहे.

याबाबतचा सविस्तर लेख खालील लिंकवर वाचता येईल.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/06/70.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह... तुमचा आयडी जो नंबर दाखवतो तो तुमच्या आवडत्या पुणे - हजरत निझामुद्दीन दुरोंतो एक्स्प्रेसचा आहे होय Bw

Nzm Duronto Express -12263 ( Pune Junction to H Nizamuddin )

अभि_नव, "राजनयिक" म्हणजेच "Diplomatic".
नवीन Submitted by पराग१२२६३ on 1 July, 2021 - 13:31
>>
कृपया हा शब्द असलेली मान्यता प्राप्त मराठी शब्दकोशाची लिंक द्यावी.
हा असा शब्द मराठीत कधीपासुन आहे ? याचा मुक्तहस्ते वापर केलेली काही जुनी मराठी पुस्तके/लिखण सुचवु शकाल का?

राजनय (Diplomacy)

Post published:10/06/2019
Post author:अक्षय रानडे
Post category:राज्यशास्त्र / सामरिकशास्त्र - राष्ट्रीय सुरक्षा

-------
त्या वेबसाईटवर २०१९ साली लिहिलेला लेख आहे. पण शब्दकोशातील शब्द, त्याची व्युत्पत्ती, ईतिहास ईत्यादी स्वरुपात सापडला नाही.
शब्दकोशाची लिंक / पानाचा स्क्रिनशॉट आहे का?
कधीपासुन हा शब्द मराठीत वापरला जातो याचे काही संदर्भ?
जुने पुस्तकं/ लिखाण?

अभि_नव, राजनय शब्द कधीपासून मराठीत वापरला जातो याची नक्की मला माहिती नाही. चाणक्याच्या कालखंडापासून हा अधिक रुळला असावा, असे वाटते. संस्कृतमधून हा शब्द मराठीत आला असावा.