इथेच आहे
काचेची सुंदर खिडकी
भिंतीला लटकत आहे
देह सोडून गेला माझा
पण आत्मा इथेच आहे
छोटीशी चिऊ बागडते
ती बड-बड ऐकत हसतो
ती खांदे उडवत हसूनी
जणू मलाच गिरवत आहे
देह सोडून गेला माझा....
हे प्रवास जीवन माझे
जणू आठवणींचा ढीग
तुटलेल्या स्वप्नांसोबत
आनंद ओंजळीत आहे
देह सोडून गेला माझा....
मज नकोच होती शांती
की नकोच कर्कश नाद
मायेने घर भरण्यात
ते प्रेमळ संगीत आहे
देह सोडून गेला माझा....