कशास राखू धुरे अता
पळून गेली गुरे अता
फिरून जाऊ घरी कसे
घरी कुणी का उरे अता
बळेच ओठी हसू जरी
उरात मीही झुरे अता
कुणी न होते जगायला
तुझा सहारा सुरे अता
नशा न येते मलाच की
पिणे म्हणूया पुरे अता
ठिसूळ स्वप्ने असेल ती
निलेश झाली चुरे अता
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- नृपात्मजा
( लगालगागा लगालगा )
घेत सुखांचे गाजर आता
काय करू मी जागर आता
भाव मनाचे का हरवावे
का मन झाले सागर आता
ती छळणारी सांज अताशा
भासत नाही कातर आता
टाळत गेलो आर्जव सारे
फार उरी ना पाझर आता
मीच मलाही बोजड झालो
भान तुझे तू सावर आता
कोण कुणाचे रिक्त घरा या
जा निघ जा रे आवर आता
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- चंपकमाला
(गालल गागा गालल गागा )
फ्रान्सकडून भारतीय हवाईदलासाठी अत्याधुनिक 36 ‘रफाल’ लढाऊ विमाने खरेदी केली जात आहेत. तत्संबंधीचा करार दोन्ही देशांदरम्यान सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. त्यापैकी पहिली काही विमाने जुलै 2020 च्या अखेरीस भारतात दाखल होणार आहेत. त्याआधी भारतीय हवाईदलाच्या गरजांनुरुप फ्रान्समध्येच घडवल्या गेलेल्या ‘रफाल’वर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लढाऊ वैमानिक, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे.
आली ही सर पहिल्या पावसाची,
याच सरींनी घडविली भेट गगन-भूमीची,
भिजवुनी ही काळी माती
सुगंध उधळला आसमंताती,
दोघांच्या या भेटीने सारी सृष्टीच जणू भारली
पुन्हा नव्या चैतन्यात नटन्याची तयारीच करु लागली!
कोसळल्या मग सरींवर सरी
अंगणातला सुगंध गेला नदीच्या तीरी,
घरा घरात बागडू लागल्या मग बायका पोरी,
धांदल उडाली बघ मळेराणावरी
धान्याची झाकाझुक करू लागला शेतकरी,
स्वप्न पाहु लागला तो नव्या पेरणीची
उत्साही सर आली पहिल्या पावसाची.
नशिबी असून काटे जपणे फुलास आहे
छळले कधी फुलाने छळतो सुवास आहे
कळले नसे कुणाला जळते उरात जेही
कळले तरी तसेही पडले कुणास आहे
भलते विचित्र काही करतो विचार मीही
मरणे खुशाल आता जगणे उदास आहे
हळुवार पावसाने भरते विहीर केव्हा
हळुवार पावसाने भरले दुखास आहे
म्हणता जपून खारे रडलो भरून डोळे
घडले बरेच होते मजला उपास आहे
सरला कधी तमाशा सगळे उठून गेले
पटले कधी कुणाला हसणे खुमास आहे
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- अनुराग
(ललगालगालगागा ललगालगालगागा)
कपिल सिब्बल म्हणतात “सगळे घोडे तबेल्यातून पळाल्यावर आमच्या पक्षाला जाग येणार का?”
- पाच मिनिटात तुला कॉल करतो.
- दो मिनिट मे आया च.
- पढके 2-3 दिन मे वापस करता.
- तुम बस हुकूम करो सर.
- तुम्ही निघा मी आलोच.
- मी आत्ता तुझाच विचार करत होतो.
- बस का राव एवढा पण भरोसा नाही का?
असं म्हणणारे सच्चे मित्र तुम्हाला पण आहेत का?