संस्कृती

गाण्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती

Submitted by गजानन on 8 May, 2013 - 13:19

'सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गाणं रेकॉर्ड करायच्या आधी लतानं ते फक्त एकदाच ऐकलं होतं म्हणे. ऐन रेकॉर्डींगच्या दिवशी दुसर्‍या एका गाण्याचे रेकॉर्डींग लांबल्यामुळे त्या या गाण्याच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. पण तोपर्यंत तुम्ही हे गाणं दुसर्‍या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड करा (तात्पुरते म्हणून) असे त्यांनी संगीतकारांना कळवले. म्हणून मग ते रवींद्र साठ्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशी लता मंगेशकर रेकॉर्डींगला आल्या. तोपर्यंत त्यांनी हे गाणं किंवा त्याची चाल अक्षरशः एकदाही ऐकली नव्हती. आल्यावर त्यांनी ते गाणं आपल्या अक्षरात लिहून घेतलं.

ऋतुराज – वसंत

Submitted by vaiju.jd on 3 May, 2013 - 12:45

॥ श्री ॥

‘हा वसंत रंग भरीत जगती येतसे पहा

बहरल्या दिशा दहा!

कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!

रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘

ऋतुराज! म्हणजे वसंतऋतु ! दहा दिशांना बहरून टाकत येतो हा ऋतुंचा राजा ! याच्या आगमनाच्या आधीच सुगंधाच्या रूपाने ढोल नगारे वाजायला लागतात.आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.

गीतेत विभूतीयोगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ पृथ्वीवरचा ‘कुसुमाकर’म्हणजेच वसंतऋतु तो म्हणजे मीच !’

आमची काशीयात्रा!!

Submitted by मी_आर्या on 25 April, 2013 - 07:59

नमस्कार,
मागे काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे या नावाचा धागा टाकला होता. त्यावर आलेले प्रतिसाद,सुचना मनात घोळवत ८एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत काशीयात्रेला जाउन आलो. अलाहाबाद, विंध्याचल व शेवटी काशी असा प्रवास होता.
त्याचा थोडक्यात वृत्तांत असा.
यात्रेची तयारी नोव्हे.१२पासुनच सुरु होती. जाने.१३ मधे ट्रेन बुकींग केले. ज्ञानगंगा एक्स्प्रेस २४तासात अलाहाबादला पोचवते असं ऐकुन तीचं रिझर्वेशन केलं.
८ एप्रिल १३(सोमवार)
स्थळ: पुणे

वाचन आणि आपण

Submitted by भारती.. on 23 April, 2013 - 06:30

वाचन आणि आपण

आज,जागतिक पुस्तकदिनी मनात येतंय की खरंच किती रटाळ झालं असतं जगणं या पुस्तकांशिवाय.आपलं स्वतःचंच जगणं जगण्याची सक्ती. तेही तसं रोमहर्षक असतं म्हणा, उनसावल्यांचं,सुखदु:खांचं,स्थित्यंतरांचं,संकटांचं,संधींचं वगैरे वगैरे,पण आपल्यापुरतंच फक्त.

एखाद्याला (खरं तर प्रत्येकालाच) खूप भूक असते, एका जन्मात अनेक जगणी जगायची असतात, अनेक कथानकं भोगायची असतात त्यातल्या थरारांसकट.

म्हणून तर पुस्तकं भेटतात आपल्याला. प्रतिभेचे अनंत रंग घेऊन पुढे सरकत रहातं जगण्याचं महाकथानक, कधी महाकाव्य..

त्या वाचनप्रवासाचा हा एक धावता आढावा..

शब्दखुणा: 

बॉस्टन मॅरेथॉन

Submitted by kaushiknagarkar on 21 April, 2013 - 17:07

बॉस्टन मॅरेथॉन

एक युवक
गोरागोमटा नाकेला, भावपूर्ण डोळ्यांचा
उंचनिंच देखणा हुशार
सर्वांचा आवडता

एक मुलगा
पिटुकला तुडतुडीत, विस्फारलेल्या डोळ्यांचा
जगाचं कुतुहल असलेला, ऊत्साही निरागस
सर्वांचा आवडता

एक आजोबा
अनुभवी धीरोदात्त, ममताळू डोळ्यांचे
उत्साही तंदुरूस्त
सर्वांचे आवडते

एक कॅमेरा
निर्विकार भावनाशून्य, लक्षलक्ष निर्जीव डोळ्यांचा
सर्वसाक्षी चित्रगुप्त, निरुत्साही अनुत्सूक
दुर्लक्षित

आजोबा पळतायत, धापा टाकत अंतीमरेषेकडे
मुलगा खिदळतोय, आनंदाने हातवारे करून शर्यत अनुभवतोय
युवकाने ठेवलीय, स्फोटक पिशवी मुलाच्या पायापाशी
कॅमेरा पाहातोय
मुलाला आजोबाना युवकाला पिशवीला

तिची- माझी

Submitted by vaiju.jd on 21 April, 2013 - 03:11

।। श्री ।।

माझे काका वारले,तेव्हा ते साताऱ्याला मुलीकडे म्हणजे माझ्या चुलतबहिणीकडे होते. आणि योगायोगाने ती माझी 'जाऊ'ही लागते. माझे वडिल हयात नसल्याने माझे कन्यादान माझ्या या काका-काकूंनीच केले होते. वयस्कर, आजारी काकांनी शेवटच्या दिवसात मुलीकडे राहण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्यामुळे अंतसमयी ते साताऱ्याला होते.

कळले तसे आम्ही सर्वजण साताऱ्याला जमलो. सगळे दिवस होईपर्यंत अगदी घरात घरात राहून आमची छोटी मुले सगळी कंटाळली होती. 'दिवस' झाल्यावर चुलतभाऊ त्याच्या बायकोला म्हणाला, "तू आणि वैजयन्ती सगळ्या मुलांना जरा बागेत नेऊन आणा."

रामजन्माच्या आठवणी !

Submitted by यक्ष on 19 April, 2013 - 03:22

हंम्म्!

झाला असेल रामजन्म एव्हाना!

इथे ऑफिस मध्ये बसून निरस वाट्ते.

मन हळूच भूतकाळात जाते!

चैत्रातल्या रणरणत्या उन्हात वडिल चटके लागण्यार्या रस्त्यावरून राम मंदिरात घेउन जायचे! तिथे गेल्यावर मात्र एकदम छान वाटायचे! किर्तनकार सुश्राव्य व रसाळ आवाजात रामजन्माचा सोहळा वर्णित असत! रामजन्म झाल्यावर गुलालाने वातावरण एकदम रंगून जायचे! त्यानंतरचे प्रसाद वाट्प! कडकडून भूक लागली असल्याने पोट्भर प्रसादाने मस्त वाटायचे! मग इवल्याशा पाळ्ण्यातल्या बाळरामाच्या मूर्तीला वंदन करून घरी परत जातांन्ना माझ्या छोट्या पावलान्ना मात्र ऊन लागल्याचे आठवणीत नाही!

कुठे गेले ते दिवस?

शब्दखुणा: 

मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

Pages

Subscribe to RSS - संस्कृती