गणपतीबाप्पा यायची वेळ झाली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या घरात गणपतीच्या सजावटीची तयारी सुरु झाली आहे. तुम्हाला नवीन कल्पना शोधणे सोपे जावे म्हणून गेल्या काही वर्षात गौरी गणपती सजावट/गणपती डेकोरेशन या विषयावरचे मायबोलीवर प्रकाशीत केलेले लेख इथे एकत्र संकलित करतो आहोत.
गणराजा साठी सजावट - वर्षु + शोभा १२३ श्टाईल....
गणपतीसाठी मखर / सजावट
गणपती आले... हो......
या वेळेला काहीतरी वेगळं पण एकदम सोबर करायचं ठरवलं होत. मुलीला खुप हौस होती. म्हणुन मग माय्बोली धुंडाळली... आणि मग आयडिया गवसल्या. मुलगी एकटी करु शकेल असे हवे होते . तशी लहान आहे (वय ११) मग लागलो दोघी कामाला. आणि वर्षु ताई च्या रांगोळी आयडिया, शोभा१२३ च्या लोकरीच्या फुलांची आयडिया वापरुन खालील सजावट तयार झाली.
गेल्या ३ वर्षापसुन मी घरी (उसगावात) गणपती बसवतेय. दर वेळेस देव्हार्याच्या बाजुलाच असतो गणपती बाप्पा, आता ह्या वेळी मखर / सजावट करावी असे मनात आहे. ईथे मला काय काय साहीत्य मीळेल, काय करता येईल (जसे आपल्याकडे थर्माकोलचे तयार खांब मीळतात) आणी माझ्या ४ वर्षाच्या मुलीला सहभागी करुन करता येइल असेही पर्याय सुचवा मला.