सेंटिमेंट्स

Submitted by बेफ़िकीर on 20 August, 2013 - 11:32

अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय समाज 'सेंटिमेंट्स'वर आयुष्य अधिक प्रमाणात कंठतो असे वाटते.

व्यक्तीपूजा, चमत्कारांची अपेक्षा, अव्यवहार्य भूमिका ही आपल्या लोकांची खास वैशिष्ट्ये वाटतात.

असा समाज भौगोलिक व राजकीयदृष्ट्या जे परकीय असतात त्यांच्या विविध प्रकारच्या हल्ल्यांचा बळी ठरण्याची शक्यता अधिक असावी असे वाटते. हे हल्ले थेट हल्ला, दहशतवाद, आर्थिक हल्लाबोल, शोषण अश्या प्रकारचे (व इतर काही) असू शकतात.

या अवस्थेचे फायदे तोटे यांचा हिशोब मांडला तर बहुधा तोटेच अधिक दिसून येतील.

एक समाज म्हणून भारतीयांचा 'अ‍ॅटिट्यूड' (लार्जली - लाखो अपवादात्मक माणसे सोडून - अपवादच इतके, कारण येथे मुळातच सव्वा ते दिड अब्ज माणसे असावीत) आत्मस्तुतीमग्न, व्यक्तीपूजक, अव्यवहार्य, बदल स्वीकारण्यास विरोधी असा काहीसा वाटतो.

यात व्यापक बदल होणे, व्यवहारवादी व तार्किक दृष्टिकोन जोपासला जाणे हे आजघडीला जिवंत असणार्‍यांच्या हयातीत होणे बरेचसे अवघड वाटते.

आपल्या सर्वांना काय वाटते?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्मस्तुतीमग्न, व्यक्तीपूजक, अव्यवहार्य, बदल स्वीकारण्यास विरोधी असा काहीसा वाटत

यातील आत्मस्तुतीमग्न फक्तं पटलं नाही.
बहुतेक भारतीयांना 'सेल्फ' आणि 'सेल्फ रिस्पेक्ट' हेच कळलेलं नसतं .
म्हणूनच ते व्यक्तीपूजक होतात्,मॉब सायकॉलॉजीला बळी पडतात असे वाटते.

बहुतेक भारतीयांना 'सेल्फ' आणि 'सेल्फ रिस्पेक्ट' हेच कळलेलं नसतं .
म्हणूनच ते व्यक्तीपूजक होतात्,मॉब सायकॉलॉजीला बळी पडतात असे वाटते.....

.
.
यु सेड इट साती.

म्हणूनच ते व्यक्तीपूजक होतात्,मॉब सायकॉलॉजीला बळी पडतात असे वाटते.....<<<< हे जगात सगळीकडेच होतं उगाच ह्या बाबतीत फक्त भारतीयानाच का बोल लावायचे ?

मुद्दे मुळात व्यक्तिविकास हे तत्व बाळगून आहेत की समूहविकास ???
दोनही परिस्थितीत उत्तरे वेगवेगळी व कधीकधी विरोधाभासाची असण्याची शक्यता नाकारता येत नाही !!!!!

मायकेल जॅक्सन
प्रिंसेस डायना
ऑप्रा विन्फ्रे

ह्यांच्या लोकप्रियतेत 'व्यक्तीपूजा' कितपत होती/आहे असे वाटते?

माझ्या मते जे आपल्याकडे नाही(उदा. प्रतिभा, पैसा, नाव) त्याला एकतर नावे ठेवायची किंवा त्याचा उदोउदो करायचा हा मानवी स्वभावधर्म असावा. ह्यात भारत आणि इतर जग असा फरक करणे कितपत योग्य आहे कळत नाही.

सेंटीमेंटल गोष्टींवर जगण्याचे फायदेही असावेत काही, चर्चा पुढे जाईल तशी मते मांडतो.

हम्म...

<<अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय समाज 'सेंटिमेंट्स'वर आयुष्य अधिक प्रमाणात कंठतो असे वाटते.>>

आणि या मानसिकतेचा मोबाईल कंपन्यांपासून ते बॉलिवूड पर्यंत सगळा फायदा घेतात.

भारताच्या पूर्वेकडे अगदी थायलंड / जपानपर्यंत ही भावविवशता आढळते. जरा मोठ्याने बोललात तर थायी माणसे ( पर्यटक उद्योगांशी संबंधिक लोक कदाचित अपवाद ) रडायलाच लागतात. चीनमधल्या कमुनिस्ट चळवळीने कदाचित त्यांना भावनांचे प्रदर्शन न करण्याची सवय असेल.

गल्फमधे ओमानमधे बहुतांशी भारतीय विचारधाराच जाणवते ( स्थानिक लोकांतही. )
पूर्व आफ्रिका ( युगांडा, टांझानिया, केनया, साऊथ आफ्रिका ) मधेही भारतीय आणि भारतीय सिनेमांमूळे म्हणा
बहुतांशी भावविवशताच आढळते.... त्यामूळे अशी तुलना करताना युरप ( पूर्व युरप वगळून ) / उत्तर अमेरिका /
ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड असे मर्यादीत देशच विचारात घ्यावे लागतील...

सो.. वी आर नॉट अलोन. यू सी Happy