गणपतीसाठी मखर / सजावट

Submitted by सोनपरी on 22 July, 2010 - 13:34

गेल्या ३ वर्षापसुन मी घरी (उसगावात) गणपती बसवतेय. दर वेळेस देव्हार्याच्या बाजुलाच असतो गणपती बाप्पा, आता ह्या वेळी मखर / सजावट करावी असे मनात आहे. ईथे मला काय काय साहीत्य मीळेल, काय करता येईल (जसे आपल्याकडे थर्माकोलचे तयार खांब मीळतात) आणी माझ्या ४ वर्षाच्या मुलीला सहभागी करुन करता येइल असेही पर्याय सुचवा मला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे थर्माकोल मिळते होमडेपो/लोव्स/ऑश मधे. वेगवेगळ्या जाडीचे १० फुटी शीट्स मिळतात. ऑशमधे कदाचीत लहान मिळू शकतील. ते वापरायचे नसतील तर फोम बोर्ड म्हणून एक प्रकार मायकेल्स/टार्गेट/वॉलमार्ट मधे मिळातो तो देखील वापरता येईल.
थर्माकोलचे डिझाईनसारखे खांब मिळणार नाहीत कदाचीत पण वेगवेगळ्या जाडीचे व्हाईट फोमचे भरिव सिलिंडर शेप्स पाहिले आहेत मायकेल्समधे. इतरही शेप्स मिळतात.
त्या प्रकारावर सगळे क्राफ्टचे रंग नीट लागतात त्यामुळे ते देखील करता येईल. मणी, कागद, ही फुले, ग्लिटर, वगैरे लावून खुप काय काय करता येते.

सीमा, तुला खुप माहिती आहे याची. लिही Happy

Happy अरे वा. तयारी सुरु पण झाली.

१.हॉबी लॉबी मध्ये लायटींग (त्यांचा ख्रिसमस सेल जुलै मध्येच सुरु होतो.) मिळेल.

२.थर्माकोलचे शीट्स मायकेल/hobbylobby/joann/stapels/walmart सगळीकडे मिळतात. त्यापेक्षा मिनोतीने सांगितल्याप्रमाणे फोम बोर्ड मिळतो तो जास्त बरा पडेल कापायला. कटर अगदी मस्त हवे तसे वरील दुकानात मिळतात.
इथ Styrofoam म्हणतात थर्माकोल ऐवजी.

३. त्यावर ग्लिटर/ ग्लिटर ग्ल्यु, स्क्रॅप बूक पेपर, wrapping paper वापरता येतील.

४. स्टेन्सिल तयार मिळतात. ते बोर्डवर ठेवुन हवे ते डिझाईन काढता येते. गणपतीच्या पाठीमागे फिरवण्याचे चक्र करता येईल यातुन. (बॅटरीचा फॅन लावता येईल असे वाटते. मी अजुन केल नाही.)

५. स्टिकी बॅक असलेले फेल्ट वेगवेगळ्या रंगात मिळते. कापुन हवे तसे चिकटवता येते. ४ वर्षाच्या मुलांना वापरायला पर्फेक्ट प्रोडक्ट. फोमबोर्डवर तेही वापरता येईल.

६. असंख्य प्रकारचे कागद वापरुन पताका तयार करता येतात. मी माझ्या मुलीकडुन या समरच्या सुट्टीत करुन घेणार आहे. तसेच ते लांबडे फुलांचे हार पण करता येतात. तुम्हाला माहितच असेल ते कसे करायचे ते.

७. झुरमुळ्या तयार मिळतात. प्लॅस्टीकचे हार (चांगल्यापैकी) मायकेलच्या हवाई सेक्शन मध्ये आहेत.:)

८. उपरण इत्यादी joann मधुन कापड आणुन शिवता येतात.

एखादा सजावटीचा फोटो असेल तुमच्याकडे तर तो बघुन पण सांगता येईल पर्टिक्युलर आयटम इथे कसा करायचा ते.

आणखी आठवेल तस लिहिन.

छानच सीमा Happy खुप वर्षानी असे काही करायचा बेत जमतोय. मागे एकदा फुलात गणपती मुर्ती बसवलेली तसेच काही करायचा विचार करतेय.