आहे मराठीत माझ्या

Submitted by डॉ अशोक on 27 February, 2014 - 00:54

आहे मराठीत माझ्या
*----------------------*

आहे मराठीत माझ्या, गोडवा अमृताचा
आहे मराठीत माझ्या, गारवा सांवल्यांचा
*
कुठे लावणी तर कुठे भक्त गातो
आहे मराठीत माझ्या, ताजवा ताटव्यांचा
*
असो कोकणी वा, वऱ्हाडी राहणारा
आहे मराठीत माझ्या, चांदवा पौर्णिमेचा
*
अशी वाहते, ना थांबते कधी ती
आहे मराठीत माझ्या, कालवा निर्झरांचा
*
कुणा काय वाटे, पर्वा आहे कुणाला
आहे मराठीत माझ्या, थोरवा अंबराचा !
-अशोक

(जागतिक मराठी दिना निमित्तानं माझी एक जुनी कविता )

Group content visibility: 
Public - accessible to all site users