त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.
पिस्तुल्या, फॅन्ड्री व सैराट -- ' नागराज ' चा एक समांतर धागा
-----------------------------------------------------------------------------------------
हा धागा काढ्ण्याचं कारण सैराट विषयी खुप बोललं गेलं आता वेळ आहे सैराट चे ख-या अर्थाने विचारमंथन /इतरांशी तुलना करण्याची ! ....
बर्याचदा तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि गाणे संपत असताना तुम्ही तुमच्या मनात 'या गाण्याचा संगीतकार कोण असावा?' याचा अंदाज बांधता. बर्याचदा तो बरोबर निघतो. कारण एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकून ऐकून त्याच्या वेगळ्या शैलीची काही व्यक्त/अव्यक्त गणितं किंवा नोंदी तुमच्या मेंदूने नोंदून ठेवलेल्या असतात. यात चाल, वापरलेली वाद्ये आणि गायक/गायिकेच्या किंवा वाद्यांच्या आवाजाचा विशिष्ट पद्धतीने करून घेतलेला वापर, इ. चा समावेश असतो, असे म्हणता येईल.
अळी जेव्हा कोश धारण करते तेव्हा तिचे फुलपाखरात रुपांतर होते
मैत्रीला जेव्हा भावनांचा स्पर्श होतो तेव्हा त्याचे प्रेमात रुपांतर होते
अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा!
चंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी ।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥
चंद्रसदननभमंडला मेघांनी वेढियले ।
शोभाधन विपूल ते लपविता कोपे भरले ॥
शोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले ।
आता निकरे सरसावले, दिसत ही या क्षणी ॥
"चंद्रिका ही जणू" म्हणजे मराठीतल "एक लडकी को देखा तो ऐसा लगा "....
पण बागेत नायकाने पहिल्यांदाच नायिकेला पाहिली असल्यामुळे त्याला असे वाटले की चंद्रिका ही जणू ....
पण चंद्रिका आकाशात असते , ही इथे कशी आली?
कविकल्पना अशी केली आहे की चंद्राने आपली बहीण पृथ्वी हिच्याकडे चंद्रिकेला काही दिवस राहायला पाठवले आहे ,ती ही चंद्रिका ..
थेट हृदयाचा ठोका होत मन तृप्त करणारा तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस... तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या रसिकजनांच्या मनांवर ठसलेल्या प्रतिमा...
मी अमेरिकेत असताना आमच्या विद्यापीठात 'स्टूडंत असोसियेशन' अतिशय सक्रिय होते. तिथल्या प्रमुख विद्यापीठातील तशी संस्कृतीच आहे. आपली 'भारतीय स्टूडंत असोसियेशन' देखील तिथल्या प्रत्येक विद्यापीठात सक्रिय भूमिका बजावत असते. अर्थात ती भूमिका गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिन, गणपती आणि दिवाळी ह्यात अधिक गुंतलेली असते. म्हणजे गुंतू नये असे नाही, पण त्याच्या बाहेर ज्या देशात आपण आलो आहोत त्याबद्दल जाणून घेणे ही इच्छा खूप कमी लोकांच्या मनात असते. नाहीच जवळ-जवळ!