संगीतकार आणि त्यांची वैशिष्ट्ये

Submitted by गजानन on 7 June, 2016 - 03:44

बर्‍याचदा तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि गाणे संपत असताना तुम्ही तुमच्या मनात 'या गाण्याचा संगीतकार कोण असावा?' याचा अंदाज बांधता. बर्‍याचदा तो बरोबर निघतो. कारण एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकून ऐकून त्याच्या वेगळ्या शैलीची काही व्यक्त/अव्यक्त गणितं किंवा नोंदी तुमच्या मेंदूने नोंदून ठेवलेल्या असतात. यात चाल, वापरलेली वाद्ये आणि गायक/गायिकेच्या किंवा वाद्यांच्या आवाजाचा विशिष्ट पद्धतीने करून घेतलेला वापर, इ. चा समावेश असतो, असे म्हणता येईल.

हा धागा संगीतकारांच्या अश्या शैलींची (लक्षणांची?) चर्चा करण्यासाठी. त्यामुळे पुन्हा ऐकताना त्या त्या गाण्यांची / संगीताची मजा आणखी वाढेल, अशी आशा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, सिनेसंगीत, भावगीतं, इ. सर्वप्रकारच्या संगीतासाठी.

कोणते संगीतकार तुम्ही कोणत्या आधारे अचूकरित्या ओळखू शकता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंकर जयकिशन - इंट्रो म्युझिक. एफेम गोल्डवरची आर जे शुभांगी म्हणते , सिनेमात हिरोची दमदार एंट्री दाखवतात, तसं एसजे च्या गाण्याची एंट्रीही दमदार असते.

आरडी बर्मन :- यांची गाणी चालू होताना भलेमोठे लांबलचक ऑर्केस्टा पीस असतो. किमान २-३ मिनिटांचे तरी त्यानंतर गाण्याचे बोल येतात. हे आरडी यांचे एक वैशिष्ट्ये होते. बर्‍याच गाण्यात त्यांनी हा प्रयोग करुन पाहिला आहे

ए आर रेहमान :- वेगवेगळ्या वाद्यांचा वापर चौकट मोडून करण्यात रेहमानचा हात कोणी धरू शकत नाही.
" करिये ना " हे ताल चित्रपटातल्या गाण्यात तबल्याचे "डग्गा" हे वाद्य वाजताना दाखवले आहे परंतू प्रत्यक्षात मात्र तो साऊंड इफ्फेक्ट मिळवण्यासाठी चमड्याचा मोठा ढोल वाजवण्यात आलेला. पण तो ही अशा प्रकारे वाजवला की "ड्ग्गा" च्या आवाजाशी मेळ होईल.

राजेश रोशनः- गाण्यातील प्रत्येक अंतर्‍याला विविध प्रकारे म्युझिक देतात पहिल्या अंतर्‍याचे म्युझीक दुसर्‍या अंतर्‍याला कधीच नसते. एकाच गाण्यात २-३ प्रकारचा ठेका वापरून मुखडा अंतरा यांच्यातले संगीत देतात.
"कहो ना प्यार है" मधले सगळीच गाणी अशा प्रकारची आहे. "क्यु चलती है बहार" मधे तर किमान ४ प्रकारचा ठेका वापरला होता. एका ठेक्यातून दुसर्‍या ठेक्यात जाताना बदल जलद असतात परंतू ते कानाला खटकत नाही.

शंकर जयकिशन - अ‍ॅकॉर्डियनवर जोर, भैरवीच्या सुरावटीचा सढळ वापर

सी. रामचंद्र - इंग्रजी बँन्डचा सुंदर वापर (उदा. अलबेला)

हेमंतदा - तालवाद्याचा (तबला, बोंगो, ढोलकी, इ.) वापर न करता सजवलेल्या सुरेल, तालबद्ध रचना (उदा. ये नयन डरे डरे - कोहरा)

आर. डी. - विशिष्ट आवाजाचा फील येण्यासाठी स्वतः शोधून काढलेली अपारंपारिक वाद्ये (उदा. - सध्या वॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेले - शोलेमधील ठाकूर फॅमिलीच्या हत्याकांडानंतर जो एक विशिष्ट आवाज निर्माण केला गेला - त्यासाठी त्याने स्वतः तयार केलेले ते अपारंपारिक वाद्य)

भास्कर चंदावरकरांनी दिलेले, भारत एक खोज या मालिकेचे संगीत खुपच छान होते. या मालिकेचा आवाका खुपच मोठा होता ( रामायणापासून स्वातंत्रलढ्या पर्यंत ) भारतातील अनेक राज्यांचे संदर्भ त्यात आले होते. त्यामूळे त्या त्या राज्यातील पारंपरीक संगीत त्यात ऐकता आले. आणखी एक म्हणजे हि सर्व गाणी हिंदीत होती.

एक उदाहरण म्हणजे त्यातील शाकुंतल वरचा जो भाग होता त्याचे संगीत थेट मराठी नाट्यगीतांची आठवण करुन देणारे होते. ती गाणी अजित कडकडे आणि फैयाज यांनी गायली होती.

गजाभाउ, मस्त धागा. मी लिहेन इथे नक्की.
आर्डी: बाँगो काँगो द्वयी. रिधम एक प्रकारचा केअर्फ्री संगीत उपयोग.

त्या सर्वाच्या आधी. परवा शनिवारी लोकसत्ता मध्ये लक्ष्मी कांत प्यारेलाल मधील प्यारेलाल शर्मा ह्यांचा लेख आला आहे तो फार छान व डिटेल्वारी आहे. नक्की वाचा. त्यातच राज कपूर व एका बाजूला कल्याणजी आनंद जी, शंक र व जयकिशन व एल पी ह्या तीन जोड्या एक सर्व एकाच फ्रेम मध्ये.असा फोटो आहे. मला तर भरून आले. केवढी सांगितिक हिस्ट्री त्या एका फोटोत सामावली आहे. ह्या लेखात प्यारेलालनी
सत्यम शिवम सुंदरम गाण्याच्या रेकॉर्डिंग बद्दल लिहीले आहे. व मधल्या सुरुवाती च्या पीसेस बद्दलही लिहीले आहे. मस्त लेख. तुला आवडेल नक्की. कंपोझिंग बद्दलही माहिती व किती मेहनत घेत असत ते दिले आहे.
http://www.loksatta.com/drushti-aadchi-srushti-news/renowned-musician-la...

आर डी बर्मनने वापरलेली वाद्ये ऐकून संगीतकार ओळखू येतो. काही अट्टल रसिकांना सगळेच संगीतकार ओळखू येतात किंवा पाठ असतात. माझ्या एका मित्राला आणि त्याच्या वडिलांना कोणत्याही गाण्याचे संगीतकार पाठ असायचे. आदरच वाटायचा एकदम त्यांच्याबद्दल! Proud

अजय अतुल ,पारंपारिक ढोल ताशे याबरोबर वेस्टर्न वाद्यांचाही छान मेळ बसवतात.नुकत्याच आलेल्या सैराटमधील त्यांच्या गाण्यांत खूप प्रयोगशील राहीले आहेत.

संगीत कार हुस्नलाल भगतराम ह्यांनी पंजाबी ठेका आणला.
ओ पी नैय्यर ह्यांचा टांग्याचा ठेका फेमस आहे.
सचिनदा म्हणजे काँप्लेक्स भारतीय अ‍ॅरेंजमेंट आणि वेस्टर्न सिंफनीज चा मेळ.
पिया तो से नैना लागे संपूर्ण गाणे ऐकले तर क्लासिकच आहे.
मदन मोहन म्हणजे अतिशय हळूवार सूर व ट्रीटमेंट. एकही सूर उफाड्याचा नाही.

ओ पी नय्यर त्यांच्या खास टांगा म्युजिक साठी प्रसिध्द होते.

उदा : यु तो हमने लाख हसी देखे है, तुमसा नही देखा
चित्रपट : तुमसा नही देखा (१९५७)

मांग के साथ तुम्हारा
चित्रपट : नया दौर (१९५७)

बर्मन दादा च संगीत मध्ये मला एक गोष्ट मला फार आवडत होती, त्या वाद्याचे नाव मला माहित नाही, पण बंदिनी चित्रपटातलं गाणं आहे बघा

मोरा गोरा अंग लै ले

ह्या ओळी नंतर जो म्युझिक पिस वाजतो, ते बर्मन दादा नी पुष्कळ चित्रपटांमध्ये वापरलंय, खास करुन बंगाली पार्श्वभुमी असलेल्या चित्रपटांमध्ये.

व्वा !!
मस्त धागा Happy

ए. आर. आर. चेलो [cello] ह्या वाद्याचा खुप सुंदर उपयोग करतो गाण्यांमध्ये.
चेलो म्हणजे व्हायोलिन चा मोठा भाऊ, जो दोन पायांमध्ये घेउन वाजवितात.

शंकर जयकिशन. शिवरंजनी राग. मंजे राजकपूरचे गाणे.

जाने कहां गये वो दिन. मेरा नाम जोकर

शिव हरी चे संगीत म्हणजे बासरी व संतूरची लयलूट. पण चांदणीत मध्येच श्रीदेवीचा भयानक बेसूर आवाज का बरे घेतला आहे. काचे वर चरे पडल्यावाणी गाते ती.

शिव हरी चे संगीत म्हणजे बासरी व संतूरची लयलूट. <<< आहह्हा, क्या याद दिलाए जी आपने अमा.

देखा एक ख्वाब तो यह सिलसिले हुए

मला पण ओ पी नय्यर यांचे आणि शंकर जयकिशन यांचे संगित ओळखता येते (बर्‍याचदा)
पण ओ पी काय नेहमीच टांग्याचा ठेका देत नसत, काही (खरंतर सगळीच) हळूवार गाणी पण सुंदर आहेत त्यांची.

अंदाज अपना अपना मधलं "ए लो जी सनम हम आ गये.." ऐकलं आणि उगिचच असं वाटलं की जुन्या जमान्यातलं गाणं ऐकतोय, तेव्हा काय इतकी गुगल्-ए-आझम नव्हते मी, त्यामुळे खूप शोध घेता आला नाही, नंतर समजलं की या सिनेमाचे संगितकार तुषार भाटिया हे ओपींचे हार्डकोर फॅन आहेत.

Sanjeev.B | 7 June, 2016 - 15:32
ओ पी नय्यर त्यांच्या खास टांगा म्युजिक साठी प्रसिध्द होते. >>> यात पिया पिया पिया मोरा जिया पुकारे पण येइल

युं तो हमने लाख हंसी देखे है, तुमसा नही देखा... हे गाणं खुद्द टांग्यातलंच असल्याने ठेका पण ओघाने तोच. संगितकार अर्थातच ओपी Happy

दक्षिणा,

त्या भाटिया चा किस्सा अत्यंत जगप्रसिद्ध आहे की.... तो तुषार भाटिया स्वतः ला ओ.पीं. चा फॅन म्हणवून घ्यायचा, पण एक नंबर ढापू इसम होता तो, ये रात और ये दूरी पण त्याने असेच ओ. पींची चाल ढापून, ओढुन ताणुन बसविण्याचा प्रयत्न केला, त्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळी आणि हा माणुस आशाताईंनाच सांगतो, हे असे गा, ते तसे नका गाऊ, आशाताईंनी थोडावेळ संयम बाळगला, मग अती च व्हायला लागल्यावर मात्र त्या सरळ म्हणाल्यात्... "ओ. पी. ची चाल कशी गायची हे तू मला सांगायची गरज नाहिये, मै उस्के पास सदियों से गाती आ रही हू, तू तो पैदा भी नही हुआ होगा तब से" Lol

विषयांतराबद्दल क्षमस्व लोक्स हो Wink

पाकिजा मधे नंतर ३ ठुमर्‍या नौशाद साहेबांनी दिल्या नजरिया कि मारी, मरी मोरी बैंया ( राजकुमारी ), मेरा साजन सौतन घर जाये, अब मै कैसे कहू ( वाणी जयराम ) कौन गली गये शाम, बतादे कोई ( बेगम परवीन सुलताना )

चित्रपटात या अगदी अस्पष्ट आणि अपूर्ण ऐकू येतात. पण माझ्याकडे पूर्ण होत्या.

याशिवाय गुलाम मुहोम्मद साहेबांनी, लताच्या आवाजात तीन गाणी रेकॉर्ड केली होती. ती चित्रपटात नव्हती. ती नंतर एच एम व्ही ने स्वतंत्रपणे बाजारात आणली होती.. त्यापैकी पीके चले, हे एकच मी ऐकले.

आपले वसंत देसाई पण वेगवेगळ्या ताल वाद्यांसाठी प्रसिद्ध होते. दो आँखे बारह हाथ मधली सैंया झुठोंका बडा सरताज निकला... दिया और तूफान मधले, ये कहानी है दिये कि और तूफान कि, गूँज ऊठी शहनाई मधले, हौले हौले घुंघट पट खोले... हि गाणी ऐकून बघा.

अवघड चाल + अवघड ताल = स्वर्गीय गाणी = खळेकाका.

हीच खासीयत पं. मंगेशकरांचीही आहे, पण आपली गाणी फक्त आपल्या भगिनीद्वयानेच गावीत हा खाक्या जीवापाड जपला त्यांनी. हेही वैशिष्ट्यातच गणायला हवं Happy

Pages