संगीत-नाटक-चित्रपट

पद्म पुरस्कार २०१३ : सध्या निकष काय आहेत ?

Submitted by असो on 25 January, 2013 - 22:39

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची ही संपूर्ण यादी.
http://zeenews.india.com/news/nation/padma-awards-full-list-of-winners_8...

सर्वांचे अभिनंदन !

पुरस्कारांचे निकष काय असतात / असावेत यावर इथे चर्चा करू.

द सिंपसन्स : वेगळेपणातले वेगळेपण

Submitted by बावरा मन on 20 December, 2012 - 03:20

सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्‍या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्‍या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्‍या एका परिवाराभोवती फिरते.

Dreamum wakeuppam अश्लील गाणे?

Submitted by रमेश भिडे on 17 December, 2012 - 23:54

Dreamum wakeuppam हे नवीन गाणे काही दिवसपूर्वी कानावर आले. आणि कालच पुतण्याला मुंबईत फोन केला तर हे गाणे मागे वाजत होते. कुतूहल चाळवले,म्हणून विचारले तर म्हणाला की हे गाणे तर सुपरहिट आहे...म्हणून डाउनलोड करून काळजीपूर्वक ऐकले तेव्हा मला धक्काच बसला .........................!

संगीत,ठेका ,शब्दोच्चार पद्धत इत्यादि बाबतीत गाणे catchy असले तरी गाण्याचे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ अश्लील आहे,असे मला वाटले. अशा गाण्यांना सेन्सॉर बोर्ड परवानगी काशी काय देते बुवा?

..
Aiyyaayo..

Dreamum wakeuppam
Critical conditionum
Hey earthum quakepum
Hil dool sab shakeupum

माझ्या मातीचे गायन- ऑडिओ फाईल हवी आहे

Submitted by मुग्धानंद on 6 December, 2012 - 01:14

माझ्या मातीचे गायन- ऑडिओ फाईल हवी आहे
गीतकार : कुसुमाग्रज, गायक : अनुराधा पौडवाल, संगीतकार : श्रीधर फडके, चित्रपट : लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव - / Lyricist : Kusumagraj, Singer : Anuradha Paudwal, Music Director : Shridhar Phadke, Movie : Laxmibai Bhratar Vasudev -

ऑडिओ फाईल कुठे शोधु? तुनळी वर नाही. मोबाईल वर घेता आले तर उत्तम.

"लम्हे"

Submitted by रमेश भिडे on 23 November, 2012 - 10:42

परवा माझा एक मित्र आणि मी "लम्हे" या सिनेमाबद्दल बोलत होतो...यश चोप्रांची मला आवडलेली उत्तम कलाकृती म्हणजे लम्हें...वेगळे कथानक, उत्तम लोकेशन्स, सर्व कलाकारांचा ताकदीचा अभिनय...मस्त.

नृत्यनाटिका अंबा (दोन अंकी)

Submitted by उमेश वैद्य on 17 October, 2012 - 03:48

ही काव्य-नृत्य-नाटिका असून यात काव्याबरोबच नृत्यांना अतिशय महत्व आहे. या मधील संवाद काव्य रूपात असून ते शास्त्रीय तालांवर म्हणता येतील. पात्रांचा रंगमंचावरील वावर हा संपूर्णपणे नृत्यातच आहे. त्या अनुषंघाने मुद्रा-अभिनयाला सुध्द्दा महत्व आहे. शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी
ही नृत्यनाटिका बसवता येईल. त्यातील काव्याचा भाग चांगल्या आवाजाच्या पुरूष-स्त्री गायकांकडून म्हणून घ्याव्यात व पात्रे हावभाव करीत असताना पडद्यामागून म्हणावा. उत्तम नृत्य जाणणा-यांनी नृत्याचा भाग शास्त्रीय नृत्य प्रकारवर सुव्यवस्थीत बसवावा. यात त्या त्या भावांप्रमाणे काही नृत्य

उदय हुसेन - आणि त्याचा हमशकल लतीफ़ याहिआ

Submitted by नितीनचंद्र on 8 October, 2012 - 00:54

मुसलमान सत्ताधिशांच्या क्रौर्य कहाण्या ऐकल्या पाहिल्या की प्रश्न पडतो की हे मुसलमान सत्ताधीश इतके रक्तपिपासु का असतात ? हा इतिहास मध्ययुगीन नाही तर जर जग जेव्हा माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रार्थमीक उंबरठा ओलांडुन वेगाने प्रगती करतय याही काळात हे नराधम मध्ययुगीन क्रौर्याच्या रक्तरंजीत प्रथांच पथानुगमन करताना दिसतात.

Latif.jpg

( लतिफ यांचे चित्र आंतरजालावरुन साभार )

विषय क्र. १ : चिरवेदनेचा पुनरुच्चार करणारी वावटळ

Submitted by झंप्या दामले on 29 August, 2012 - 15:24

काही सिनेमे चोरपावलांनी येतात (म्हणजे जवळपास ९०% मराठी सिनेमे याच वर्गात आले) आणि ठसाच उमटवून जातात. फक्त तिकीटबारीवरच नाही, तर मनावर सुद्धा ... अनेक मराठी सिनेमे धापा टाकत दम तोडत असताना अगदी अलीकडच्या काळात एक सिनेमा येऊन गेला कि ज्याने नुसती तगच धरली नाही तर सिनेमाच्या बाबतीत इतिहासजमा झालेली 'ज्युबिलीसु'द्धा पुण्यात साजरी केली - तीही Golden Jubilee !!! आणि आश्चर्य म्हणजे इतके असूनही हा सिनेमा औषधाला सुद्धा चर्चिला गेला नाही. ना त्याचा पुरस्कार सोहळ्यांमध्ये फारसा बोलबाला झाला, ना त्याचे DVD आणि Satellite rights हातोहात खपल्याच्या बातम्या आल्या.

विषय क्र. १ : लिंगुबाचा डोंगुर आभाळी गेला

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 August, 2012 - 06:30

कसं होतं ना, बर्‍याच वेळा आपली अवस्था 'देता किती घेशील दो कराने' अशी होवून जाते. म्हणजे बघा ना, मी म्हणतो मी लताबाईंच्या आवाजाचा भक्त आहे, तेवढ्यात मला जाणवतं की अरे याला बाळासाहेबांचं संगीत आहे जी आपल्यासाठी नेहमीच एक पर्वणी वाटत आलेली आहे, त्या संगीतात रमतोय न रमतोय तोवर लक्षात येतं की अरे हे आपल्या आवडत्या कविचे शब्द आहेत.

विषय १: एक अतूट नातं - सिनेमाचं

Submitted by सशल on 27 August, 2012 - 18:50

"सिनेमाशी तुझं नातं काय"? असा प्रश्न जर कोणी भारतीय माणसाला विचारला तर मला वाटतंय कमी-अधिक फरकाने "आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख-दु:ख वाटून घेणारा एक सच्चा मित्र" असंच उत्तर मिळेल. मीही ह्याला अपवाद नाही. ओळख झाली तेव्हापासून अगदी मनापासून भरभरून प्रेम केलेलं आणि दोन्हीकडच्या अपेक्षांचा ताळमेळ साधण्यात कुठेच कसर न राहिलेलं हे एकमेव नातं. अर्थात सिनेमा म्हणजे एखादी जिवंत व्यक्ती नसली तरी एक सच्च्या मित्राचं जे स्थान आपल्या आयुष्यात असतं तेच सिनेमाचंही आहे.

Pages

Subscribe to RSS - संगीत-नाटक-चित्रपट