त्या दिवशी जेवण झाले आणि मी हात धुवुन येईपर्यन्त मित्राने हॉटेलच्या काउंटरवरुन त्याची सिगरेट विकत घेतली आणि बाहेर जावून सिगरेट ओढ़त उभा राहीला.
"सम्या, यार एक गोष्ट सांग मला. तुला दर तासा-अर्ध्यातासाला सिगरेट लागते, मग पिक्चरला थिएटरमध्ये गेल्यावर कसा बसून राहतोस इंटरव्हलपर्यन्त. Movie is also your passion." मी मुद्दाम खोड काढली.
"अबे सिगरेट सॉंग्स असतात ना प्रत्येक चित्रपटात. "

दिवस १९७३ चे होते. जीवन आजच्या तुलनेने साधे होते. अंगभर साडी नेसलेली, एक वेणी घातलेली आणि ती वेणी उजवीकडून पुढे आणलेली तरुणी साधी असली तरी नायिका म्हणून शोभत होती आणि सुंदरही दिसत होती. बलदेव खोसाचा भोळा भाबडा चेहराही नायक म्हणून पडद्यावर स्विकारला जात होता. आणि या सर्वात माधुर्य आणत होते ते त्याकाळचे संगीत. चित्रगुप्त यांना नौशाद, सी रामचंद्र, मदनमोहन यांच्याप्रमाणे नावाजले गेले नसले तरी त्यांनी जी मोजकी गाणी दिली ती मात्र जबरदस्त होती. "चंदा की किरनोंसे" हे त्यातीलच एक गीत.
अवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....
२००८ साली मी जेव्हा पहिला आयर्न मॅन बघितला तेव्हा मला आवडला. प्रचंड आवडला. त्यानंतर येणारी MCU ची प्रत्येक मुव्ही बघणं हा जीवनाचा अविभाज्य घटकच बनून गेला. २०१२ च्या अवेंजर्सने तर या सर्व हिरोजना एकत्र आणण्यासाठी मस्त जमीन बनवली. त्यांनतर सिव्हिल वॉर ने बांधकाम चालू केलं. आणि आता.....
मी प्रथमच काल्पनिक गोष्ट लिहतोय , जरा सांभाळून घ्या मला लिहण्याचा अनुभव कमी असला तरी जमवण्याचा हा प्रयत्न. हा प्रसंग माझ्यावर घडलेल्या प्रसंगाशी मिळताजुळता असला तरी यामधील पात्रे काल्पनिक आहेत.
पुण्यापासून ६० किमी अंतरावर असलेले एक छोट गाव त्या गावात तश्या मुबलक सुविधा नसल्यामुळे त्या गावातील बरीच तरुण पिढी हि पुण्याला जाऊन तिथे नोकरी-धंदा करत होती त्यामधीलच एक म्हणजे चिन्मयचे बाबा.

अकिरा कुरोसोवाचा युजिंबो पाहायला मिळाला नाही. मात्र त्यावर बेतलेले चित्रपट अनेकवेळा पाहिले. त्यातला एक चित्रपट म्हणजे सर्जियो लियॉनोचा इतिहास घडवणारा क्लिंट इस्टवूड अभिनित "फिस्टफूल ओफ डॉलर्स". पुढे ओळीने "फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर" आणि "द गुड, द बॅड अँड द अग्ली" हे सर्जिओचे आणखि दोन चित्रपट आले. आज वेस्टर्न पटात या तीन क्लासिक गणलेल्या चित्रपटांना डावलून पुढे जाताच येणार नाही.
स्वप्नं बघायला हवीत प्रत्येकाने
पूर्ण होतील न होतील,
तो पुढचा भाग
पण मुळात
स्वप्न पहायला हवीत..
आणि पाहिलेली स्वप्नं
इतरांच्या पापण्यांवर
हलकेच द्यायलाही हवीत
एकत्र बघितली स्वप्नं तर नक्कीच पूर्ण होतात.
नुकताच या गोष्टीचा आम्ही अनुभव घेतला. निमित्त होतं शॉर्टफिल्मचं. ही शॉर्टफिल्म तयार होण्यात "मायबोली.कॉम" चा महत्वाचा वाटा आहे कारण या प्रोजेक्टकरता एकत्र आलेले आम्ही सगळेही इथलेच मूळ रहीवाशी आणि आम्हाला मदत करणारे, प्रेमाने सल्ला देणारे धुंद रवी, सायली, पल्ली हे देखील इथलेच.
मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ ….
प्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात.
न तड़पने की इजाजत है न फरियाद की है,
घुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है !