संगीत-नाटक-चित्रपट
मराठी स्टॅन्डअप
सिनेतारकांच्या सौंदर्यावर कॉमेंट करणे योग्य आहे का?
कदाचित कधी ना कधी आपण सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या सिनेकलाकाराच्या दिसण्यावरून चांगली वाईट कॉमेंट केली असेलच. सई, स्वप्निल, शाहरूख(?), सुबोध भावे, कंगणा राणावत, गेला बाजार अमेय वाघ, कोण तो एक प्रभाकर, लेटेस्ट जॅकलीन आणि अजूनही लिस्ट निघेल... पण हे चटचट आठवणारे.
प्रत्यक्षात ही लोकं आपल्यापेक्षाही कैक पटीने सुंदर असतात, वा असू शकतात, तरीही आपण त्यांच्यावर कॉमेंट करायचा आनंद उचलतो. यामागे बरेचदा हेतू निखळ आनंद मिळवणे हाच असतो. पण काहीवेळा हा हेतू तितक्या ताकदीने पोहोचत नाही आणि वाद होतात.
"कुत्ते कमीने.....!"
"कुत्ते....... कमीने......!"
काय? शीर्षक वाचून धर्मेंद्रची आठवण झाली ना. पण थांबा, हा धर्मेंद्रचा डायलॉग नसून हे एका नाटकाचे नाव आहे. कालच याचा पहिला प्रयोग पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यरगृहात झाला.
नाटकातील पात्र :- सुचित्रा बांदेकर, सागर देशमुख (वाय झेड चित्रपट फेम), पुष्कराज चिरपुट्कर (दिल दोस्ती फेम) आणि विद्याधर जोशी
लेखक- डॉ. विवेक बेळे.
दिग्दर्शन - चन्द्रकांत कुलकर्णी.
"द सर्कल" (The Circle) च्या निमित्ताने
काल मी "द सर्कल" (The Circle) चित्रपट पाहिला. भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे कि नाही ते मला माहिती नाही. पण अमेरिकेत थिएटरांमधे येऊन गेला आणि आता नेटफ्लिकस इ. ठिकाणी उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट आहे "द सर्कल" ह्या सोशल नेटवर्किंग कंपनी / वेबसाईट बद्दल आणि चित्रपटाचा विषय आहे अशा वेबसाईट्स नी घेतलेला आपल्या जीवनाचा ताबा. समाजात डोळे (आणि बुद्धी) उघडी ठेऊन वावरणार्या अनेकांच्या डोक्यात हा विचार चाललेला असेलच! "द सर्कल" फक्त तो विचार विस्तृतपणे दाखवतो आणि आपले डोळे अजून उघडतात. फेसबूक, व्हॉट्स अॅप चे नाव न घेता हा चित्रपट त्याबद्दल थेट भाष्य करतो.
आम्ही सारे नवशिके !!!!!!
लोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये.
पण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....
अरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला?
अरे पण वेळ कुठंय? मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी?
गुरुदत्त!
गुरुदत्त!
बॉलिवूड मधील क्रीपी स्टॉकींग कधी थांबणार ?
बॉलिवूड मध्ये सतत आपण बघत आलो आहोत की हिरो हिरॉइनीचा पाठलाग करत असतो, तिला त्रास देत असतो, "ना का मतलब हा होता है" असे म्हणतो. आधीपासून हे सुरू आहेच पण ९० च्या दशकात "खुद को क्या समझती है" , "खंबे जैसी खडी है" वगैरे गाण्यांनी या गोष्टींना अधिकच हातभार लावला. आता खरं तर हे स्टॉकींग चूकीचे आहे. असे करायला नको. नो म्हणजे नो असे काही पिक्चर्स येत होते. पिंक सारख्या चांगल्या चित्रपटातून साध्या आणि स्पष्ट भाषेत हे समजवून सांगत होते.
दिल ढुंढता है फिर वोही फुरसत के रात दिन...
'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन
रात्री दहाची वेळ. जत्रेचे तंबू पडले आहेत. गावोगावहून माणसं जमली आहेत. गाडीतळावर पोचल्यावर 'तो' गाडीला जोडलेली आपली बैलं मोकळी करतो. 'ती' केवळ त्याच्या गाडीची एक सवारी. जवळच्या चहाच्या टपरीतून तिच्यासाठी ४ आण्याचा लोटाभर 'चाह' विकत घेतो. 'कुवारे चाय नही पिते' या आपल्या समजूतीला बाजूला ठेवून तिच्या आग्रहाखातर तो देखील घोटभर चहा पितो. ती त्याला दोन दिवस जत्रेमधे रहायचा आग्रह करते. आणि तितक्यात त्याच्या (आणि आपल्याही) कानावर जवळून येणार्या हार्मोनियमचे सूर पडतात. त्याच्यासारखेच आपणही त्या ढोलकीच्या रीदमकडे आकर्षित होतो.
Pages
