चंद्रिका ही जणु

Submitted by उडन खटोला on 13 March, 2016 - 00:44

चंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी ।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥

चंद्रसदननभमंडला मेघांनी वेढियले ।
शोभाधन विपूल ते लपविता कोपे भरले ॥

शोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले ।
आता निकरे सरसावले, दिसत ही या क्षणी ॥

"चंद्रिका ही जणू" म्हणजे मराठीतल "एक लडकी को देखा तो ऐसा लगा "....

पण बागेत नायकाने पहिल्यांदाच नायिकेला पाहिली असल्यामुळे त्याला असे वाटले की चंद्रिका ही जणू ....
पण चंद्रिका आकाशात असते , ही इथे कशी आली?
कविकल्पना अशी केली आहे की चंद्राने आपली बहीण पृथ्वी हिच्याकडे चंद्रिकेला काही दिवस राहायला पाठवले आहे ,ती ही चंद्रिका ..

कमला म्हणजे लक्ष्मी , ती समुद्रातून आलेली , तिच्या अंगणात ,म्हणजे समुद्राच्या अंगणात म्हणजे पृथ्वीवर ...
तर कुणी पाठवली? कुमुद म्हणजे चंद्र , तो बांधव म्हणजे पृथ्वीचा बंधु , पृथ्वी आपली आई ,चंद्र तिचा भाऊ , म्हणून तो मामा ...

कारण चंद्राजवळ काळे ढग आले ... श्यामला मेघा तस्कर मानोनी ... त्यांनी चंद्रिकेची शोभा पळवू नये म्हणून हे शोभाधन कोशात भरून चंद्राने वरुन पृथ्वीवर टाकून दिले ...

इथे पृथ्वीवर काळ्या धांगांची भीती नसल्याने ते चंद्रिकेचे शोभाधन पुन्हा विलसू लागले...
ती ही चंद्रिका ..... ही जणू ...

आभार्स- चारुदत्तबुवा आफळे
किर्लोस्कर ते दारव्हेकर , नाट्यदर्शन कार्यक्रम

https://www.youtube.com/watch?v=Gin1K-_ETAU

https://www.youtube.com/watch?v=X10DeRXm94s

हा संपूर्ण कार्यक्रम पहा आणि ऐका

अप्रतिम कलाक्रुती !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग. छान रसग्रहण आहे.

कुमुद म्हणजे चंद्र , तो बांधव म्हणजे पृथ्वीचा बंधु

नाही. कुमुद म्हणजे कमळ - रात्री म्हणजे चंद्रप्रकाशात फुलणारे पांढरे कमळ. त्यांना कुमुदिनी पण म्हणतात. (उगवला चंद्र पुनवेचा - वनी वनी कुमुदिनी फुलल्या)
चंद्रप्रकाशात हे कुमुद फुलतात म्हणुन चंद्र हा कुमुदबांधव.

अर्थात चंद्राला पृथ्वीचा भाऊ म्हणतातच.

व्हिडीओ बघतो नंतर.

रसास्वाद छान. मी देखील कधी हे नाट्यगीत ऐकते तेव्हा डोळ्यासमोर एखाद्या ज्योस्नांकित रात्रीचे स्वप्नील द्रुश्य साकारु लागते.
कुमुदिनी नावाचे फुल पण असते...कमळ नाही,..जे पुष्पपठार जवळ कासतलावात दिसते .

प्रभाकर कारेकर यानी गायलेले नाट्यधनराशी अल्बम मधील "चंद्रिका ही जणु" ऐका

केवळ अप्रतिम

मी आजपर्यन्त ऐकलेली या गाण्याची सर्वोत्तम व्हर्जन !!!

छानच.

सुरेश वाडकरांनीही अप्रतिम गायलेय. रुपकाच्या समेचं वजन किती ताकदीनं पेललंय.
लिंका आता उघडता येत नाहीत पण नंतर बघणार.

शोभाधन कोशात भरून चंद्राने <<< कोश कशाला संबोधले आहे?

धन्यवाद.