थेट हृदयाचा ठोका होत मन तृप्त करणारा तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस... तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या रसिकजनांच्या मनांवर ठसलेल्या प्रतिमा...
मानसशास्त्रात भावनिक आत्मजाणीव (emotional self awareness) हा एक मोठ्या प्रमाणावर विचार होणारा विषय आहे. या विषयात एखाद्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या विशिष्ट भावना आणि त्यांच्यामुळे होणारे परिणाम याचा अभ्यास होतो. विशिष्ट भावनांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होतो का, आपल्या एकंदर वागण्यावर काही परिणाम होतो का हेदेखील यात अभ्यासले जाते. ह्या विषयाच्या अभ्यासात असे आढळले आहे की, समोर आलेल्या परिस्थितीला एखादी व्यक्ती दोन पध्दतींनी सामोरी जाते. एक म्हणजे ती व्यक्ती अति शीघ्र पद्धतीने प्रतिक्रिया देते ज्याला शब्द आहे react करते.
माझ्या आयुष्यात ९ डिसेंबर २००७ ह्या दिवसाची नोंद 'अविस्मरणीय' आणि 'अवर्णनीय' अशीच होईल. माझं वय आत्ता फक्त २४ जरी असलं आणि साधारण ७० वर्षापर्यंत जरी आयुष्य जगेन असं म्हटलं तरीही 'त्या' दिवशी आलेला अनुभव परत उघड्या डोळ्याने बघायला मिळेल का, ह्याचे उत्तर मात्र नकारार्थीच वाटते! दिवसच तसा होता तो. त्याच्या आदल्या दिवशी, शनिवारी, काही सेकंदातच मी ठरवून टाकले होते की काहीही झाले तरी चालेल, आपण पुण्याला सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला जायचेच! ६ डिसेंबर, गुरुवारी सुरु झालेल्या ह्या संगीत सोहळ्याची चर्चा सगळीकडे दरवर्षीप्रमाणे सुरु होती.
काल पंडितजी गेले...
१० वर्षांपूर्वी पु.ल. गेले तेव्हा आत काहीतरी हललं होतं... काल exactly तेच feeling होतं... दिवसभर ofc च्या गडबडीत असल्यामुळे खूप इच्छा असूनही कलाश्रीवर जाता आलं नाही. त्यामुळे माझ्या एका पंडितजींच्या अत्यंत निस्सिम भक्त असलेल्या मित्राला फोन केला. तो फोनवर रडतच होता.. परवाच एका छोट्या मैफलीत भेटला तेव्हा तो म्हणाला होता की मला पाच रागांच्या नावाने पाच अत्तराचे frangrance तयार करायचे आहेत.. पंडितजींच्या सगळ्या दुर्मिळ रेकॉर्ड्स त्याच्याकडे आहेत.. इतकं वेड्यासारखं प्रेम करणार्या त्याच्यासारख्याची ही अशी अवस्था पाहून माझ्या आतलं हललेलं अजूनच खोल खोल जाऊ लागलं होतं.
स्वरसूर्य मौनस्थ जाहला
भीमसेन जोशी गेले. पण जातांना त्यांच्या कंठातली अमृतमयी स्वर संजीवनी समस्तांना देऊन गेले. गेली साठ वर्षं हा स्वरमेघ वर्षत होता, अविरत, ज्यात सचैल न्हाऊन निघत होते देशोदेशीचे स्वर-भूकेले रसिक, टिपत होते रंध्रारंध्रात ते चांदणस्वर अधीर, आतूर होऊन. हे आता पुन्हा होणे नाही. स्वर-पंढरीचा हा वारकरी आता त्याच्या माहेरी गेला आहे, कायमचा.