पिस्तुल्या, फॅन्ड्री व सैराट -- ' नागराज ' चा एक समांतर धागा

Submitted by bvijaykumar on 8 June, 2016 - 12:42

पिस्तुल्या, फॅन्ड्री व सैराट -- ' नागराज ' चा एक समांतर धागा
-----------------------------------------------------------------------------------------
हा धागा काढ्ण्याचं कारण सैराट विषयी खुप बोललं गेलं आता वेळ आहे सैराट चे ख-या अर्थाने विचारमंथन /इतरांशी तुलना करण्याची ! ....
पूर्वी ही भस्म, मुक्ता, सरकारनामा(१९९८), सात च्या आत घरात(२००४), सावरखेड एक गांव(२००४), श्वास(२००४), टिंग्या(२००८), जोगवा(२००९) इ. वास्तववादी मराठी सिनेमे येऊन गेलेत व आता आता तत्कालिन कालखंडात आलेले कोर्ट, एलिझाबेथ एकादशी(२०१४), हायवे, देऊळ(२०११), रेगे(२०१४) किल्ला(२०१५), ख्वाडा(२०१५) इ. सिनेमेही वास्तवा ची झलक दाखवितात अगदी बॉलीवूड मध्येही सलाम बॉम्बे, अंकुर, रोजा(१९९२), बॉम्बे(१९९५), फायर(१९९६), हैद्राबाद ब्लुज(१९९८), सरफरोश(१९९९), मि. अ‍ॅन्ड मिसेस अय्यर(२००२) युवा(२००४) हे मी पाहिलेले व आठवत असलेले चित्रपट वास्तवतेच्या जवळ जाणारे होते पण ही तुलना करण्याचा मोह तूर्तास टाळलाय !... नागराज मंजुळे च्याच चित्रपटा ची तुलना करुन त्यात एखादा समांतर धागा सापडतोय का ?... यासाठी हा खटाटोप ... मला जे मुद्दे गवसले ते पुढे मांडलेत बा़की चे मायबोली चे दिग्गज आहेत पोस्ट्मार्टेम करायला !.. आणि त्यांनी ती सढ्ळ हातांनी करावी ही नम्र व आग्रही विनंती !!..

* काही समानता ---

१) वा स्त व ता -
नागराज चा सिनेमा म्ह्टला की त्यात वास्तवता येणार आणि वास्तवा शी पाठराखण करणारा दिग्दर्शक आहे म्हणून एक खास प्रेक्षकवर्ग नागराज च्या सिनेमा ला जातो आणि जाणार... पिस्तुल्या, फॅन्ड्री व सैराट या तिन्ही कलाकृतित भयाण वास्तवता दाखविण्या त नागराज यशस्वी झालाय ... यात काही प्रश्न व्यवस्थेला केलेले आहेत काही ठ्ळ्क पणे दिसतात. समाजभान, कनिष्ठ वर्गा ची मुस्कटदाबी, बळि तो कान पिळी ही व्यवस्था, जाति संघर्ष हे सर्व वास्तवाच्या शृखंलेत चपखलपणे बसवलेत

२) प्रे मा ची गो ष्ट -
नागराज च्या पुढच्या सिनेमात एक वेळ गाणं नसेल पण प्रेम हे दिसेल च ! ... सैराट तर आर्ची-परश्या च्या प्रेमकहाणी वर बेतलेला सिनेमा आहे.... म्हणजे पहा फॅन्ड्री त शालू- जब्या, सैराट मध्ये आर्ची-परश्या तर लघुपट असुन पिस्तुल्या त लाली- पिस्तुल्या अश्या जोड्या दिसतात. थोडक्यात प्रेमा ची गोष्ट सांगणे हे तिन्ही पटात समान आहे. कदाचीत पिस्तुल्या बाब त मी चूकू शकतो कारण तो विषय १५ मिनिटात मांडलेला आहे.

३) अकुशल अभिनेत्यां चा वावर --
दिग्दर्शकां चे सर्वात मोठे आव्हान अभिनय करुन घेणे या आव्हाना साठी दिग्दर्शक कसलेले अभिनेते घेऊन चित्रपट काढतात यास नागराज दिग्दर्शक म्ह्णून अपवाद आहेत.... नवीन कलाकारांना घेऊन पिस्तुल्या, फॅन्ड्री व सैराट म धील पिस्तुल्या-जब्या-आर्ची ही महत्त्वपूर्ण पात्रे निवडली गेली. हे नवागत अनुक्रमे सूरज, सोमनाथ, रिंकू हे अभिनया च्या कसोटी वर पारखले तर अकुशल होते नागराज च्या ह्या अकुशल अभिनेत्यांना घेण्यात त्याकडे बोट दाखवावे तर तिघांनाही अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

४) सोलापुरी भाषा --
पिस्तुल्या, फॅन्ड्री व सैराट या तिन्ही चलपटात सोलापुरी भाषेचा वापर आहे. इतर कोणत्याही चित्रपटात सोलापुरी भाषेचा इतका बेमालुम वापर दिसून येत नाही. ' कडू' असणे हा खास सोलापुरी मराठी भाषेचा शब्द, तिन ही चित्रपटात वेग -वेगळ्या प्रसंगी येतो. मनमोकळी, कानाला गोड वाटणारी सोलापुरी भाषा ' पिस्तुल्या, फॅन्ड्री व सैराट च्या निमित्ताने मराठी चित्रपटाच्या इतिहासात कैद झाली.

५) सिनेमातील आई --
नागराज च्या सिनेमातील आई एक वेगळे आत्मभान आहे. सैराटमधील परश्या आई किंवा फॅन्ड्री तील जब्या ची आई आपल्या मुलांला बसलेला चोप सहन करु शकत नाही तसेच घरातून पळून गेलेल्या आपल्या मुलिशी संपर्क ठेवणारी, तिच्या मुलासाठी डिंकाचे लाडू/ टोपडं पाठ्वणारी आर्ची ची आई ही भावूक आई ची प्रतिके आहेत. पण याउलट पिस्तुल्यातील आई नवरा वारलेला असल्याने या मुलाला जाळा अथवा कापा पण आपला परंपरागत चोरीचा धंदा शिकवा म्हणणारी वास्तव व आक्रमक आई नागराजने उभी केलेली आहे.

ता. क . -- अजून काही साम्य स्थळे दाखविण्या चा मोह तूर्तास आवरता घेतलाय. वाचकां वर ती जबाबदारी दिलीय

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समांतर धागा म्हणजे त्याने जे काही आजूबाजूला पाहीलंय , त्याचं अनुभवविश्व आहे त्याच्याशीच प्रामाणिक राहून तो व्यक्त होतोय. व्यक्त होतानाची त्याची हुषारी सिनेमा न कळणा-यालाही थक्क करून टाकते.

उदा. फोटोग्राफीबद्दल मला फारसे कळत नाही.
पण पिस्तुल्या मधे पाटा वरवंटा विकायला उन्हातून घामाघूम झालेली बाई रस्त्याने येते हा सीन दाखवताना कॅमेरा एका सताड उघडं दार असलेल्या घरात आहे. या घरातून आपण तिला जवळ येताना पाहतो. तिच्याकडे लक्ष असताना फ्रेममधे एक चौकोनी वस्तू जाणवते पण तिच्याकडे लक्ष जातं ते ती सुरू झाल्यावर. ती वस्तू मिक्सर आहे. मिक्सरच्या मागे कॅमेरा ठेवून पाटा वरवंटा विकणारी दाखवल्याने हिला आता गि-हाईक कसं मिळणार ही शंका आपल्या मनात निर्माण होते.

जर कॅमे-याच्या माध्यमातून एव्हढं भाष्य करता येत असेल तर ट्वेन्टी ट्वेन्टी मधेही मोठा आशय मांडता येईल. दीड तासाच्या सिनेमाची काही आवश्यकताच नाही.

ध न्य वा द !.. चीकू, सहोदर्गल आणि गमभन

..
..

चीकू तुम्ही म्हटले ते बरोबर आहे ' सूरज पवार ' ने नागराज मंजुळे च्या तिन्ही सिनेमात पिस्तुल्या, पि-या व प्रिन्स या ...... " पि " नावाने च अभिनय केलाय हा ही एक समान धागा आहे.

..
सहोदर्गल तुम्ही मिक्सर चे दिलेले उदाहरण सर्वोत्तम !!!...

कॅमेरावर्कविषयी म्हणाल तर,
याड लागलं मध्ये चित्रित केलेला पक्ष्याच्या थव्याच चित्रण अफाट आहे.

मराठी वास्तववादी चित्रपटांच्या यादीत गगनविहारी बोराटेच्या 'सूर्योदय'चा उल्लेख राहुन गेला. तगडी स्टारकास्ट असलेला उसमजुरांच्या आयुष्यावर आणि अर्थातच राजकारणावर चित्रपट होता.

गगनविहारीने नंतर नक्षलवाद्यांवर 'लाल सलाम' हा चित्रपट काढला.