पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -
१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.
दरवाजाच्या फ़टीतून डोळे लावून ती बाहेर पाहत होती. अंधार पडायला सुरुवात झालेली होती. जसजसा अंधार वाढत होता. तशी तिच्या जीवाची घालमेल देखील वाढत होती. दरवाजाच्या फटीमधून बाहेरचं जेवढं शक्यं असेल तेवढं ती पाहत होती. बाहेरची कोणतीही हलचाल अथवा कोणताही आवाज तिला न पाहता आणि ऐकता सोडायचा नव्हता.
"आई.." अचानक तिच्या मागून आवाज आला तशी ती गर्रकन मागे वळली.
"सोनू तू... अगं किती दचकले मी. तू इथे काय करतेयस. तुला मी आतल्या खोलीत जाऊन बसायला सांगितलं होतं ना" तिने दटावणीच्या सुरात विचारलं.
महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) पासून मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांचे परवाने (License/Permit) रद्द केले जातील, अशी घोषणा परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे.
रात्री साधारण दोन-अडीज वाजलेले. डाव्या कुशीवर खिडकीकडे तोंड करून झोपलेलो मी. थंडीचे दिवस. अंगावर रजई ओढलेली. कुशी बदलण्यापुरती जाग आली. या कुशीवरचा त्या कुशीवर झालो. उबदार रजईत अंग आकसून पुन्हा झोपायच्या बेतात आणि कानावर काहीतरी खसखसल्याचा आवाज. आंतरमनाला जाग आली. ‘हे काये?,’ असं मनातच म्हटलं पण डोळे अजून मिटलेलेच. कपाळाखालच्या खोबणीत रुतलेले डोळे सैल करत कसेबसे पण अर्धवटच उघडले. बाहेरचा पुरेल असा अंधूक प्रकाश खिडकीतून आत येऊन पसरलेला. डोळ्यासमोर पलंगाचा विस्तार संपताच पडद्याने अर्धी झाकलेली खिडकी आणि तिच्या काचेतून बाहेर पाहता येईल असा नजरेचा टप्पा.
अर्थातच आईही तितकीच दमते. पण इथं दमण्याचा विषय वेगळाच आहे.
आमच्या शेतात संकरित गायी आल्या त्या काळाची आठवण झाली. त्यांना आम्ही इंजेक्शनच्या गायी म्हणायचो. एकदा आईने वसुबारसेला इंजेक्शनच्या गायीचे पूजन केले. मला प्रश्न पडला की या गायी काही आपल्या भारतीय नाहीत. हे तर परदेशी प्रकरण आहे. मग या असल्या गायीची पूजा केलेली धर्माला कशी चालते? माझ्यासाठी तो सांस्कृतिक धक्का होता. पुढे पुढे बाजरी ज्वारी गहू उस सगळच संकरित बियाण सर्रास यायला लागल अन त्यानंतर तर जीवनच संकरित झाले. तसेच या मीम्सच्या म्हणजे अभिव्यक्तिच्या संकारातून निर्माण झालेल्या गोष्टी काहींसाठी सांस्कृतिक धक्का असू शकतो. हे मी स्वानुभवावरुन सांगतो.
सुंदर असं पिवळं सोनारी पुरण, त्यात मस्त वेलची जायफळ पूड, ८-९ केशराच्या काड्या, त्यांचा मंद सुवास, छान तिंबलेली कणिक.. मोठा पुरणाचा गोळा त्या कणकेच्या पारित भरून हळुवार लाटलेली पोळी नाजुक हाताने तापलेल्या तव्यावर अलगद ठेवायची, जसजशी पोळी भाजली जाते एक अप्रतीम खरपूस सुवास अख्ख्या घरभर दरवळतो, दोन्ही बाजूंनी छान भाजलेली गरम गरम भरलेली पोळी अलगद आई पेपर किंवा जाळी वर ठेवते. त्यावर भरपूर तुपाची धार, लागलंच तर थोडं दूध. अहाहा मला सांगा स्वर्गाची व्याख्या ह्याहून वेगळी असेल का? पुरण पोळी करणे हे कोणा सोम्या गोम्याचे काम नव्हेच. पुरणाचे परफेक्ट प्रकरण जमायला हवे.
मुंबईकर असल्याने मुंबईबद्दल थोडीफार माहीत आहे. इथल्या घडामोडींबद्दलची माहिती आणि बातम्या सतत डोळ्यांसमोर येत असतात. त्या वाचताना काही प्रश्न पडले.
मुद्देसूद लिहिणं कठीण आहे इतके वेगवेगळे विषय यात गुंतले आहेत. तसंच विषयाशी संबंधित नेहमी वापरात येणार्या इंग्रजी
संज्ञांची मराठी रूपे मला कृत्रिम वाटतात म्हणून इथे वापरली नाहीत.