अवांतर

दोष का कोणाचा...

Submitted by ManasiB on 5 July, 2020 - 04:38

दोष त्या विजेचा, गरजण्यास उशीर केला
बरसून गेली वर्षा, भिजण्यास उशीर झाला

दोष त्या जनांचा, टोचून जाती भाला
जखम वाहे उरी, समजण्यास उशीर झाला

दोष त्या क्षणांचा, न थबकताच गेला
विचार उमटे मनी, कळण्यास उशीर झाला

दोष त्या मनाचा, आठवे गत स्मृतीला
निसटून जाई आज, जगण्यास उशीर झाला

दोष त्या धुक्याचा, दवबिंदू मोती झाला
गोठून गेले मन, उमगण्यास उशीर झाला

पण

का दोष देसी कुणास, काळ मागे सरला
स्वीकार तू तुलाच, ना फार उशीर झाला !!

- मानसी बर्वे
४ July २०२०

विषय: 

|| विठ्ठल ||

Submitted by Lalitasabnis09 on 1 July, 2020 - 01:57

|| विठ्ठल ||
नयनरम्य रूप तुझे
ध्यानी मनी वसते
श्याम रंग सावळा
विठ्ठला तू गोजिरा

शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांच्या
तूच देव साजरा
रूप तुझे देखणे
नयनी भरून पावले

देहभान विसरून गेले
भाव मनी दाटून आले
अश्रु तुझ्या चरणी पडले
विठ्ठला तुला आळविते

पांडुरंगा पांडुरंगा
लहान मोठ्या साऱ्यांना
तुझ्या नामाचा ध्यास
आले देवा आले देवा
तुझ्या दर्शनास

विषय: 

चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 

अंत:प्रेरणा

Submitted by _सानिका_ on 28 June, 2020 - 11:44

अस म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे...पण ते अपयश आपल्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आलंय आणि आपण ते किती गांभीर्याने घेतो हे ही तितकंच महत्त्वाचं असत...
लहानपणी आपल्याला एखादी गोष्ट येत नाही.. एखाद गणित सुटत नाही...हे सुध्दा एक प्रकारचं अपयश च नाही का..पण आपण त्याकडे एवढ seriously बघत नाही.. किंवा ते आपण पटकन स्वीकारतो आणि पुढे जातो..लहानपणी जर अपयश आलं तर जास्तीत जास्त गंभीर विचार म्हणजे आपल्याला सगळे चिडवतील हाच असतो..पण जसे आपले विचार प्रगल्भ होतात तसे एखाद अपयश आपल्या जास्त जिव्हारी लागत...

विषय: 

अव्वाच्या सव्वा लाईट बिल

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 June, 2020 - 11:45

काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त

- वाशी, नवी मुंबई

आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...

तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"

हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...

विषय: 
शब्दखुणा: 

'बदलता संधिकाल आणि संवेदना'

Submitted by आर्ट आर्च on 26 June, 2020 - 07:27

दिवसभराच्या प्रवासाने थकलेला सूर्य समुद्रात निवला. तुळशी वृंदावनात तिनं दिवा लावला. वा-याच्या लयीत त्याची ज्योत डोलत असली तरी स्थिरतेच्या समेवर ती परतत होती. कातरवेळेच्या कात्रीत सापडलेल्या मनाला प्रकाशाची जितकी गरज होती तितकीच ती तेवत होती. मंदपणे पण ठामपणे. तिचा ठामपणा बोचरा नव्हता तर आधार देणारा होता, स्निग्ध होता. कुठे कुणी दूरवर सायंराग आळवत होतं. ओसरीतल्या शुभंकरोती, पाढे परवचांच्या नादात तिच्या पैंजणांचा आवाज मिसळून गेला होता.

विषय: 

घरातील उपकरणांच्या मेंटेनन्स साठीचे प्लॅन्स

Submitted by sneha1 on 24 June, 2020 - 11:15

नमस्कार,
मला थोडी माहिती हवी आहे. फ्रीज आणि ड्रायर ला पाच वर्षे झाली आहेत आणि आता वॉरंटी रिन्यू करायची आहे. Assurant ने पाच वर्षाचे ८०० डॉ. सांगितले आहेत. आता असे वाटते आहे की ते द्यावे, की दुसरा एखादा प्लॅन घ्यावा? अमेरिकन होम शील्ड चा अनुभव आजू बाजू च्या लोकांचा चांगला नाही. बरं, ऑलरेडी एसीचा आणि डिशवॉशरचा वेगळा प्लॅन आहेच.
घराला पाच वर्षे होतील काही महिन्यात.
इथली बाकीची मंडळी काय करतान जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद!

Pages

Subscribe to RSS - अवांतर