पुरणपोळीचे पुराण!
Submitted by TI on 26 February, 2026 - 12:35
सुंदर असं पिवळं सोनारी पुरण, त्यात मस्त वेलची जायफळ पूड, ८-९ केशराच्या काड्या, त्यांचा मंद सुवास, छान तिंबलेली कणिक.. मोठा पुरणाचा गोळा त्या कणकेच्या पारित भरून हळुवार लाटलेली पोळी नाजुक हाताने तापलेल्या तव्यावर अलगद ठेवायची, जसजशी पोळी भाजली जाते एक अप्रतीम खरपूस सुवास अख्ख्या घरभर दरवळतो, दोन्ही बाजूंनी छान भाजलेली गरम गरम भरलेली पोळी अलगद आई पेपर किंवा जाळी वर ठेवते. त्यावर भरपूर तुपाची धार, लागलंच तर थोडं दूध. अहाहा मला सांगा स्वर्गाची व्याख्या ह्याहून वेगळी असेल का? पुरण पोळी करणे हे कोणा सोम्या गोम्याचे काम नव्हेच. पुरणाचे परफेक्ट प्रकरण जमायला हवे.
शब्दखुणा: