शहारे

चाहूल

Submitted by Amolondhe on 11 April, 2026 - 15:43

रात्री साधारण दोन-अडीज वाजलेले. डाव्या कुशीवर खिडकीकडे तोंड करून झोपलेलो मी. थंडीचे दिवस. अंगावर रजई ओढलेली. कुशी बदलण्यापुरती जाग आली. या कुशीवरचा त्या कुशीवर झालो. उबदार रजईत अंग आकसून पुन्हा झोपायच्या बेतात आणि कानावर काहीतरी खसखसल्याचा आवाज. आंतरमनाला जाग आली. ‘हे काये?,’ असं मनातच म्हटलं पण डोळे अजून मिटलेलेच. कपाळाखालच्या खोबणीत रुतलेले डोळे सैल करत कसेबसे पण अर्धवटच उघडले. बाहेरचा पुरेल असा अंधूक प्रकाश खिडकीतून आत येऊन पसरलेला. डोळ्यासमोर पलंगाचा विस्तार संपताच पडद्याने अर्धी झाकलेली खिडकी आणि तिच्या काचेतून बाहेर पाहता येईल असा नजरेचा टप्पा.

विषय: 

इशारे

Submitted by सारंग भणगे on 11 January, 2014 - 05:26

जयंत कुलकर्णी काकांच्या ‘होते जरी पहारे, पण पोचले इशारे’ ह्या गझलेची जमीन घेऊन मी गझल लिहायचा केलेला प्रयत्न!

आले मिळून सारे
माझे तुझे किनारे

शब्दात काय सांगू,
वाचा न हे शहारे.

तुज चुंबणे जणू कि,
ओठांवरी निखारे.

देतेस माझिया तू,
स्वप्नावरी पहारे.

त्या लाघवी स्वरांनी,
वाजे मनी नगारे.

आली उषा कपोली,
हेही पूरे इशारे.

तुज पाहतो बनूनी
मी सूर्य चंद्र तारे
--------------------
सारंग भणगे. (डिसेंबर २०१३)

Subscribe to RSS - शहारे